मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपूर येथील विधानभवन स्थित मंत्री परिषद सभागृहात शिखर समितीची बैठक झाली. यामध्ये स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ (तुळापूर) आणि समाधी स्थळ (वढू बुद्रुक) यांच्या सुधारित विकास आराखड्यास अंतिम मंजुरी देण्यात आली.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी आघाडी नकोच, अशी भूमिका शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केलेल्या भाषणावर आधारित भारतीय संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते संपन्न झाला
महाराष्ट्रातल्या महायुती सरकार मध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या “डबल गेमा” सुरू आहेत.
सरकारी नोकरीत असूनही ९५२६ महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेत नाव नोंदणी केली आणि वर्षभरात सुमारे १४ कोटी ५० लाख रुपये लाटले, अशी माहिती हिवाळी अधिवेशनात समोर आली. महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी विधान परिषदेत उपस्थित तारांकित प्रश्नाच्या उत्तरात म्हटले आहे की, १४,२९८ पुरुषांनीही बनावट कागदपत्रे सादर करून २१ कोटी ४४ लाख रुपये गिळंकृत केले आहेत.
गेल्या सहा महिन्यांत पुणे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगरसह अनेक भागांत बिबट्याने धुमाकूळ घालत ३७ जणांचा बळी घेतला. या बिबट्यांना मानवी वसाहतीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी बिबट्यांचा अधिवास असलेल्या क्षेत्रात जंगलात १ कोटी रुपये किमतीच्या शेळ्या-मेंढ्या सोडा, असे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी वन अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुंबईसह राज्यातील सर्व महापालिका भाजप-शिंदेसेना एकत्र लढणार आहे. सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. त्यात स्थानिक पातळीवर जागावाटपाचे सूत्र ठरवावे, असेही निश्चित झाले. दरम्यान, २९ मनपातील मतदारांची अंतिम यादी २७ डिसेंबरला प्रसिद्ध करण्याचे आदेश मनपा आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यामुळे १५ ते २० जानेवारीदरम्यान निवडणूक होण्याची चिन्हे आहेत.
मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी हिने पॉवर ऑफ ॲटर्नीचा गैरवापर करुन ४० एकर शासकीय जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया कंपनीस ३०० कोटी रुपयांना विक्री केली.
Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवन, नागपूर येथे राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखा आयोजित 51 व्या संसदीय अभ्यासवर्गाचे उदघाटन केले. महाराष्ट्रात टाचणी पडली तरी तिचा आवाज विधिमंडळात पोहोचतो हीच संविधानाची खरी ताकद आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
नागपूर येथील विधानसभेच्या समिती सभागृह येथे आज परिवहन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते “झेब्रू” या रस्ता सुरक्षा जनजागृती शुभंकरचे आज अनावरण करण्यात आले.
महाराष्ट्र विधानसभेतले आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते पद मिळावे म्हणून संख्याबळ कमी असलेले विरोधक फारच उतावळे झाले असताना भाजपने एक खेळी करून महाविकास आघाडीत पाचर मारली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अर्ध्याहून अधिक आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. हे आमदार ठाकरेंच्या कार्यपद्धतीला कंटाळले आहेत. त्यामुळे त्यांनी आमच्यासोबत येण्याचा मानस व्यक्त केला आहे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी आपल्याकडे या आमदारांची नावे असल्याचाही व प्रसंगी ते जाहीर करण्याचाही इ्शारा दिला.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात वेगळ्या विदर्भाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, वेगळ्या विदर्भावर आम्ही काम करत असून आमची त्याबाबतची भूमिका कायम आहे, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
विदर्भाचा वर्षानुवर्षांचा विकासाचा अनुशेष भरून काढायचा असेल, तर ‘वेगळा विदर्भ’ हाच एकमेव पर्याय आहे. जोपर्यंत सत्तेत योग्य वाटा मिळत नाही, तोपर्यंत विदर्भाला न्याय मिळणे कठीण आहे, अशी रोखठोक भूमिका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था, ओबीसी समाजावरील अन्याय आणि निधी वाटपातील तफावतीवरून सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षांनी विरोधी पक्ष नेत्यावर सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याने टीका केली आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षनेत्याची भीती वाटते, विरोधी पक्षनेता दिला तर सरकारमधील सहकारी त्याला माहिती देऊन आपल्याला अडचणीत आणतील अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे सरकार विरोधी पक्षनेत्यावर कोणताही निर्णय घेत नाही, अशी टीका जाधव यांनी केली आहे.
मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील आमगाव येथे एक प्रशिक्षणार्थी विमान 33 केव्ही उच्च दाबाच्या वीज वाहिनीला धडकून कोसळले. हा अपघात सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झाला. प्रशिक्षक पायलट अजित अँथनी आणि प्रशिक्षणार्थी पायलट अशोक छावडा जखमी झाले आहेत. तथापि, दोघेही धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाच्या लढ्यात आयुष्य वेचलेले, हमाल–रिक्षाचालकांचे आधारस्तंभ, ‘एक गाव, एक पाणवठा’ चळवळीचे प्रणेते आणि समाजवादी विचारसरणीचे अजोड मार्गदर्शक डॉ. बाबा आढाव यांचे सोमवारी रात्री 8.25 वाजता पुण्यातील पुना हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
राज्याची आर्थिक परिस्थिती जरी ओढाताणीची असली तरी राज्य कुठेही दिवाळखोरीकडे जात नाहीये. देशाच्या मोठ्या राज्यांमध्ये आजही सर्व निकषांमध्ये चढणारी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची आहे.
तृणमूल काँग्रेसमधून निलंबित केलेले आमदार हमायून कबीर यांनी आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी मोठी राजकीय चाल खेळली आहे.
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार टाकला आहे.
चित्रपट निर्माता विक्रम भट्ट यांना मुंबई आणि राजस्थान पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. त्यांच्यावर उदयपूरमधील एका व्यापाऱ्याची 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला 5 डिसेंबर 2025 रोजी एक वर्ष पूर्ण झाले असतानाच, राज्यातील राजकीय वातावरण मात्र विरोधी पक्षनेतेपदावरून चांगलेच तापले आहे.
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
संख्याबळ कमवा आणि विरोधी पक्षनेते पद मिळवा, अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला हाणला.
महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदावर एकही नेता नाही. त्यामुळे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सरकार विरोधी पक्षनेते पदाशिवाय पुढे रेटणार असल्याचा आरोप करून सगळ्या विरोधकांनी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी मोठा राजकीय गदारोळ माजविला. विरोधकांना मराठी माध्यमांनी सुद्धा साथ दिली. महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पद नसेल तर ती राज्याला लाज आणणारी जाणारी गोष्ट आहे, अशी मखलाशी काही मराठी माध्यमांनी केली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App