उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाविकास आघाडीवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला. संभाजीनगरमधील मोर्चाला MIM चा पाठिंबा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गेल्या दोन दिवसांमध्ये उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र अशा दोन विभागांचा दौरा करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने भाजप नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दीर्घ बैठका घेतल्या.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काढलेल्या ‘हंबरडा’ मोर्चावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. सरकारच्या विरोधात मोर्चा काढणाऱ्यांनी आपण सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी नेमके काय केले, याचे आत्मपरीक्षण करावे, असा टोला त्यांनी लगावला. वडगाव येथील नवले लॉन्स येथे शनिवारी जनसंवाद कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यापूर्वी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
जमिनीच्या व्यवहारांसाठी सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवणाऱ्या आणि भूमी अभिलेख विभागाच्या ‘धीम्या’ गतीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक आणि ‘क्रांतिकारी’ बातमी आहे! महसूल विभागाने ‘जनहित’ साधणारा ऐतिहासिक निर्णय घेत, जमिनीच्या मोजणीचा निपटारा करण्यासाठी लागणारा १२० दिवसांचा दीर्घ कालावधी थेट केवळ ३० दिवसांवर आणला आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५,३५४ घरे आणि ७७ भूखंडांची संगणकीय सोडत काढण्याचा कार्यक्रम आज ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पार पडला.
पुण्यातील कुख्यात गुंडाच्या भावाला शस्त्र परवाना देण्याचा निर्णय घेतल्याप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम अडचणीत आले आहेत. गुंड नीलेश घायवळच्या भावाला म्हणजे सचिन घायवळला शस्त्र परवाना मंजूर केल्यामुळे योगेश कदम सध्या चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे पुणे पोलिसांनी नकारघंटा वाजवल्यानंतरही कदम यांनी ही फाईल पुढे रेटली. त्यामुळे आता त्यांच्यावर विरोधकांनी विशेषतः ठाकरे गटाने टीकेची झोड उठली आहे. या प्रकरणी त्यांचे वडील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी त्यांची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न केला. आता योगेश कदम यांनी स्वतः एक्सवर एक पोस्ट शेअर करत आपले मत व्यक्त केले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, दोघांचा उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा काढा; पण त्यामुळे भाजपच्या अंगावर कुठे उठतोय ओरखडा??, असा सवाल विचारायची वेळ उद्धव ठाकरे यांच्या आजच्या वक्तव्यामुळे आली.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ला हा ते दलित असल्यामुळेच झाला आहे, असा थेट आरोप केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे. भूषण गवई हे स्वतःच्या मेहनतीने सरन्यायाधीश झाले. पण सवर्ण समाजातील काही लोकांना हे रुचले नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, असे आठवले म्हणालेत. त्यांच्या या आरोपामुळे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. (MADC) आणि फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल यांच्यात नागपूरमध्ये जागतिक दर्जाचे प्रदर्शन
एआयएमआयएमचे प्रमुख नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी अहिल्यानगर येथील मुकुंदनगर येथे जाहीर सभा घेतली. या सभेतून ओवेसींनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. त्यांच्या भाषणादरम्यान अहमदनगर असा उल्लेख वारंवार झाला, तर शेवटी त्यांनी आय लव्ह मोहम्मदचा नारा देत भाषण संपवले. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओवेसींवर आणि एआयएमआयएम पक्षावर जोरदार हल्लाबोल करत जिहादी औलादांना गाडून त्यांच्या थडग्यावर भगवा फडकवू असा इशारा दिला आहे.
नागपूरमध्ये सकल ओबीसी समाजाने आयोजित केलेल्या भव्य महामोर्चातून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. मराठा आरक्षणासंदर्भातील 2 सप्टेंबरचा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्याची प्रमुख मागणी या मोर्चातून करण्यात आली. हा मोर्चा यशवंत स्टेडियमपासून सुरू होऊन संविधान चौकात सभेत रूपांतरित झाला.
प्रत्येक राज्यात बहुसंख्य असणाऱ्या समाजातील जातींच्या अस्मिता जाग्या करून त्यांना भडकवून हिंदू धर्मापासून तोडण्याचे षडयंत्र ओळखा
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आत्तापर्यंत फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेटवर ठेवलेल्या मनोज जरांगे यांनी आपली तोफ काँग्रेसकडे वळविली
महाराष्ट्रातल्या क्रीडा क्षेत्रात पवारांच्या कुटुंबीयांनी जे राजकीय वर्चस्व निर्माण केले, ते काँग्रेस पक्ष मोडून काढू शकला नाही. पण सत्ताधारी भाजपने मात्र त्या वर्चस्वाला व्यवस्थित सुरुंग लावला.
पवित्र गोदावरीच्या तीरावर आज श्रद्धा, करुणा आणि भक्तिभावाने ओथंबलेला एक अद्भुत क्षण साकार झाला. साडेतीनशेहून अधिक जैन माता-भगिनींच्या उपस्थितीत गोदावरी महाआरतीचा अलौकिक आणि भावस्पर्शी सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांवर प्रखर टीका केली आहे. समाजा-समाजात आज दुही, विसंवाद आणि संघर्ष निर्माण झाला आहे. त्या पापाचे धनी शरद पवारच आहेत, अशी टीका विखे पाटलांनी केली आहे. तसेच 1994 साली जर शरद पवारांनी मराठा समाजाचा समावेश केला असता, तर आजची परिस्थिती नसती, असेही विखे पाटील यांनी म्हटले आहे.
राज्यातील ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना निवास आणि अभ्यासासाठी योग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करून वसतिगृह उभारणीसाठी जागा निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. मंत्रालयातील त्यांच्या दालनात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
साताऱ्यातील टेरर फंडिंगप्रकरणी बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी दिवसभर एटीएसने पुण्यात १९ ठिकाणे छापे टाकले. त्यात १८ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. पुण्यात २०२३ मध्ये इसिसचे मॉड्यूल उघडकीस आले. पुणे, मुंबई, गुजरातमधील काही शहरात ड्रोन हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या काही दहशतवाद्यांना अटकही झाली होती.
सरन्यायाधीशांवरच्या बूट फेकीला देऊन राजकीय हवा काँग्रेस आणि पवारांचे नेते पोळ्या भाजताहेत पाहा!!, असला प्रकार महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांपासून ते राजधानी नवी दिल्लीपर्यंत दिसून आला. तीन दिवसांपूर्वी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर 72 वर्षीय वकील राकेश भूषण यांनी भर कोर्टात बूट फेकला. त्यामुळे देशभर मोठी खळबळ उडाली. संपूर्ण देशभरातून राकेश भूषण यांचा सार्वत्रिक निषेध झाला. सुप्रीम कोर्टाच्या बार कौन्सिलने राकेश भूषण यांच्यावर कारवाई केली. परंतु, खुद्द सरन्यायाधीश भूषण गवई यांनी राकेश भूषण यांच्याविरुद्ध कुठलीही कायदेशीर पोलीस तक्रार दाखल केली नाही.
दिल्ली उच्च न्यायालयात आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या याचिकेवर ८ ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली. दिल्ली उच्च न्यायालयाने नेटफ्लिक्स आणि शाहरुख खानच्या प्रॉडक्शन हाऊस, रेड चिलीज एंटरटेनमेंटला समन्स बजावले, ज्यात असा आरोप करण्यात आला आहे की रेड चिलीज निर्मित आणि नेटफ्लिक्सवर प्रसारित होणाऱ्या “बॅड्स ऑफ बॉलीवूड” या मालिकेमुळे समीर वानखेडेंची प्रतिमा मलिन झाली आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर भारत दौऱ्यावर आले असून त्यांनी दौऱ्याची सुरुवात राजधानी नवी दिल्ली ऐवजी मुंबईतून केली. त्यांच्या समवेत उद्योगपती व्यापारी आणि कुलगुरूंचे एक मोठे शिष्टमंडळ आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या ताज महाल पॅलेस येथे ब्रिटिश सीईओ शिष्टमंडळाची भेट घेतली. त्यांच्याशी उद्योग आणि व्यापार विषयक चर्चा केली.
शिवसेना पक्षचिन्ह वादावरील पुढील सुनावणी 12 नोव्हेंबर रोजी होणार आहे. आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. हे प्रकरण न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर 16 नंबरला सुनावणीसाठी आले होते. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी खंडपीठाकडे पुढील तारीख मागितली. सिब्बलांच्या मागणीनंतर सुप्रीम कोर्टाने अंतिम सुनावणीसाठी 12 नोव्हेंबर तारीख दिली.
ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी आज थेट आणि गंभीर आरोप करत हल्लाबोल केला आहे. ओबीसी समाजाला लहान भाऊ मानणाऱ्या मराठ्यांविरोधात भुजबळ यांनी विनाकारण एक ‘टोळी’ निर्माण केली असून, या टोळीच्या माध्यमातून मराठा समाजावर शत्रुत्वाची भूमिका पार पाडत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. तसेच अजित पवारांच्या पक्षाचे जास्त नेते मराठा समाजाच्या विरोधात काम करतात, असा आरोप त्यांनी केला. तुम्ही साप पोसले आहे, एक दिवस तुम्हाला आमचा शब्द खरा वाटेल, असा इशाराही मनोज जरांगेंनी अजित पवारांना दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेवरून अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने सुरू असते. त्यातच, मंगळवारी रात्री हॉटेल ट्रायडंट येथे अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षाच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हे नाराजीनाट्य उघडपणे पाहायला मिळाले आणि अजित पवारांनी आपली नाराजी जाहीर केल्याचे बोलले जात आहे. मात्र, या नाराजीसंदर्भात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी आपली आरक्षण लढ्यासंदर्भातील स्पष्ट भूमिका आपण यापूर्वीच अजित पवारांना सांगितल्याचे स्पष्ट केले. तसेच, अजित पवार मला काहीही बोलले नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. कमळाच्या आकाराच्या डिझाइन असलेल्या या टप्प्यात एक टर्मिनल आणि एक धावपट्टी असून, त्याची क्षमता दरवर्षी दोन कोटी प्रवाशांना हाताळण्याची आहे; येथून नियमित उड्डाणे डिसेंबरमध्ये सुरू होतील. दरम्यान, या कार्यक्रमावरून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर टीका केली आहे.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App