राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना रिलीफ पॅकेज पाठवण्यात आले असल्याची माहिती दिली. तसेच सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत बोगस मतदान होत असल्याचा आरोप केला होता. यावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधींनी महाराष्ट्राचे पप्पू बनू नये, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तसेच वसंतदादा शुगर इन्स्टीट्युटची कुठलीही चौकशी नसल्याची माहिती दिली.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ येताच सर्वच पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. अशात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केलेले एक विधान चांगलेच चर्चेत आले आहे. निवडणूक लढवण्यासाठी नुसता इच्छुक असून उपयोग नाही, तर त्यासाठी तुमच्याकडे किती दारूगोळा आहे याची माहिती द्यावी लागेल. निवडणुकीत शेवटच्या दोन दिवसात चपटी, कोंबडं, बकरं द्यावं लागतं, असे प्रकाश सोळंके म्हणाले.
राज्यात आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाच्या मंत्र्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमध्येच लढवण्याचे स्पष्ट आदेश दिलेत. तसेच जिथे जुळून येत नसेल, तिथे शेवटचा पर्याय म्हणून मैत्रीपूर्ण लढण्याचेही आदेश शिंदेंनी मंत्र्यांना दिलेत.
लावणी ते चपटी; “पवार संस्कारित” राष्ट्रवाद्यांनी केली महाराष्ट्रात सांस्कृतिक राजकीय “क्रांती”!!, असं म्हणायची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या वर्तणुकीमुळे आली.
अखेर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचा बारच ठरला फुसका; पण तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बसला मोठा धसका!!, अशीच अवस्था शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची झाली.
शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि चौकशीच्या स्कॅनर खाली… पण तिची चौकशी करणार कोण आणि तिचा अहवाल देणार कसा??, कसा याविषयी ठळक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या वादग्रस्त जमीन विक्री प्रकरणाने आता नवीन वळण घेतले आहे. जागा विकत घेणारे गोखले बिल्डर्स यांनी ‘नैतिकतेच्या’ मुद्द्यावर या व्यवहारातून माघार घेत असल्याची घोषणा केली असली, तरी करारानुसार व्यवहार रद्द झाल्यास, बोर्डिंगचे ट्रस्ट पैसे परत देण्यासाठी बांधील नाहीत. यामुळे बिल्डर विशाल गोखले यांनी दिलेले 230 कोटी रुपये अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आरोप – प्रत्यारोपांच्या पलीकडे विकासाची पहाट समुद्रावर उगवे!!, असे खरंच मुंबईत घडून आले. मुंबई – पुण्यातल्या जमीन खरेदी गैरव्यवहारांच्या बातम्यांनी सगळी माध्यमे भरली.
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे ‘प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजने’अंतर्गत खोल समुद्रातील मासेमारी करणाऱ्या नौकांचे उदघाटन आणि वितरण करण्यात आले.
मुंबईतील भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाच्या जागेवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘आम्ही काचेच्या घरात राहत नाही, त्यामुळे आमच्यावर दगड फेकण्याचा प्रयत्न करू नका,’ असा स्पष्ट इशारा फडणवीस यांनी विरोधकांना दिला आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या पूर्वीच्या लहान कार्यालयातील अडचणी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी तेथे बसून केलेली निवडणूक तयारी याची आठवण सांगितली, तसेच पक्षाने हे कार्यालय घेण्यासाठी सर्व नियम पाळून, स्वतःच्या पैशाने जागा विकत घेतल्याचे ठामपणे स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी आपल्या मायमराठीचा अभिमान व स्वाभिमान जपण्यासाठी जनतेला घरात अन् महाराष्ट्रात सर्वत्र मराठीतच बोलण्याचे आवाहन केले. हिंदी भारतात अनेक राज्यांत चालणारी भाषा आहे. ती आलीच पाहिजे. पण मराठी आपली मातृभाषा आहे. ती आपल्याला उत्कृष्टपणे बोलता आली पाहिजे, असे ते म्हणालेत.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस धुमाकूळ घालायची शक्यताय. हवामान विभागाने वर्तवलेल्या ताजा अंदाजानुसार चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यांना 29 ऑक्टोबर रोजी बुधवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
एकीकडे अजितदादा म्हणाले, काम करू दर्जेदार; तर दुसरीकडे कार्यकर्त्यांनी नागपूर कार्यालयात उडविला लावणीचा बार!!, असला प्रकार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधून समोर आला.
पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जागेवरून सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. बिल्डर विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंग ट्रस्टसोबतचा जागेचा व्यवहार रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय त्यांनी ई-मेलद्वारे जैन ट्रस्टला कळवला आहे.
पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनीचे कथित गैरव्यवहार प्रकरण चांगलेच तापले असून, यात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी मोहोळ यांनी नुकतीच जैनमुनींची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी, ‘माझा या प्रकरणात कोणताही सहभाग नाही आणि मी हे पुराव्यानिशी वारंवार स्पष्ट केले आहे. मी तुम्हाला न्याय मिळवून देईल, हा प्रश्न काही दिवसांत संपेल,’ असे आश्वासन दिले होते. मात्र, मोहोळ यांच्या या विधानानंतर आता जैनमुनींनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.
महाराष्ट्राच्या आणि विशेषतः मुंबई आणि पुण्यातल्या गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये बातम्या पाहिल्या तर सत्तेवर नेमके कोण आहे??, असा सवाल मनात आल्यापासून राहत नाही. कारण या दोन दिवसांमधल्या बातम्यांच्या भडीमारा मधून 2014 पूर्वीच्या राजकीय दिवसांची आठवण ढवळून वर आली.
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या तरुण महिला डॉक्टरच्या मृत्यूने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव समोर आले होते. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचे निंबाळकरांवरील आरोप फेटाळून लावले आहेत. डॉक्टर आत्महत्या प्रकरणात रणजितसिंह निंबाळकरांचा काहीही संबंध नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण, सातारा येथे कृतज्ञता मेळाव्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक भूमीत मोठ्या प्रमाणात होत असलेल्या विकासकामांचा आढावा घेत, मुख्यमंत्री फडणवीस यांनी फलटण आणि माणदेश भागातील सर्वांगीण प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले.
मी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलले नाही. लोकसभा निवडणुकीतील माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला, असे विधान मंत्री पंकजा मुंडे यांनी केले आहे. त्या म्हणाल्या, मी जरांगे यांना देखील सांगू इच्छिते. आपल्या समाजामधील दरी मिटवूयात. जे गोपीनाथ मुंडेंचे व्यक्तिमत्व आहे तेच माझे व्यक्तिमत्त्व आहे, असेही मुंडे म्हणाल्या. परळी येथे आयोजित दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
पुण्यातील जैन बोर्डिंग भूखंडाच्या व्यवहारावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. या प्रकरणावरून धंगेकर चांगलेच आक्रमक झाले असून, त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आता या वादात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे विधान केले आहे. धंगेकर हे अन्यायाविरोधात लढणारे कार्यकर्ते असून, त्यांना “महायुतीमध्ये दंगा करायचा नाही,” असा सल्ला दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी नुकताच राजकीय निवृत्तीचा सूर लावल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. शिरसाट यांच्या या वक्तव्याचा आमदार रोहित पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे. त्यांनी थेट सिडको जमीन घोटाळ्याचा संदर्भ देत शिरसाट यांना जबरदस्त टोला लगावला. सिडकोत मलिदा खाताना कुठेतरी थांबावे असा विचार का आला नाही? आता मंत्रिपदावरून गच्छंतीची वेळ येताच राजकीय निवृत्तीचे वेध लागले. आता वय पुढे करून पळ काढू नका, असे रोहित पवार म्हणालेत.
बॉलीवूडची खानावळ नाही राहिली “उपयोगी”; म्हणून पाकिस्तानने वाढवली “दहशतवाद्यांची” यादी!!,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी आज एकाच दिवशी सातारा जिल्ह्यात जाऊन वेगवेगळी राजकीय पेरणी केली.
राज्यातील विरोधकांनी आता निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरून लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. मतदार यादीतील अनियमितता, बनावट मतदार आणि आयोगाच्या निष्क्रियतेविरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत विराट मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळत असून, यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थ निवासस्थानी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती.
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. तर विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर आरोप केले जात आहेत. या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून, तरूण महिला डॉक्टरचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे. यामध्ये जे कोणी सहभागी असतील, त्यांना कठोरता कोठोर शिक्षा दिली जाईल, असे ते म्हणाले. याबरोबरच त्यांनी अशा संवेदनशील विषयाचे राजकारण करणे अत्यंत असंवेदनशील असल्याचेही म्हणत विरोधकांवर निशाणा साधला.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App