स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूक मूळ ओबीसींना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ओबीसींच्या सर्व जागा कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत आलेले मराठा समाजाचे उमेदवार घेऊन जातील. त्यामुळे त्यांच्या हाती काहीच उरणार नाही, अशी भीती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी व्यक्त केली. वडेट्टीवार यांच्या या दाव्याने ओबीसी समुदायात एकच खळबळ माजली आहे.
ठाणे शहर आणि जिल्ह्यात भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला स्वबळाचे आव्हान द्यायचा प्रयत्न केला असता तरी एकनाथ शिंदे ठाण्यावरची पकड सहजासहजी निसटू देणार नाहीत याची चुणूक त्यांनी दिवाळी मिलनाच्या निमित्ताने दाखवून दिली. दिवाळीच्या सणात त्यांनी ठाण्यात ठाण मांडले असून दररोज विकास कामांच्या लोकार्पणाचा धडाका लावला आहे. त्यातूनच शिंदे सेना इतरांना स्वबळाचा तडाखा द्यायच्या बेतात दिसत आहे.
शनिवारवाड्यात नमाज पठण केल्याच्या घटनेवरून मंत्री नीतेश राणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नमाज पठण करण्यास शनिवारवाडा सोडून दुसरी जागा नाही का? उद्या आम्ही हाजी अलीमध्ये हनुमान चालीसा म्हटला तर चालेल का? असा संतप्त सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यात 96 लाख मतदार खोटे असल्याच्या भूमिकेवरही उद्विग्नता व्यक्त केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यात 96 लाख बोगस मतदार असल्याच्या आरोपावर सत्ताधारी भाजपने जोरदार पलटवार केला आहे. राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत जाण्यापूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी व ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा वाण नाही, पण गुण लागला आहे. त्यांनी हे आरोप करण्यापूर्वी टीचभर तरी पुरावा द्यायला हवा होता, असे भाजपने म्हटले आहे.
अजितदादा तर भाजप समोर किस झाड की पत्ती आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी लगावला.
जत तालुक्यातील जनतेच्या कष्टातून उभारलेला राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना आता पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या कारखान्याची दिवाळखोरी आणि पुढील विक्री हा विषय पुन्हा पेटला असून, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणी जोरदार भूमिका घेत संघर्षाची हाक दिली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शब्दयुद्ध पेटले आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत भाजपवर आणि गुजरातसंबंधी धोरणांवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला. महाराष्ट्रातील प्रमुख शहरे अदानी, अंबानीला आंदण देण्यासाठी तयार केली जात आहेत. गुजरातचा वरवंटा जेव्हा महाराष्ट्रावर फिरेल, तेव्हा भाजपला मतदान करणारा मराठी माणूससुद्धा त्यात भरडला जाईल, असे राज ठाकरे म्हणाले. याचबरोबर त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी अस्मितेच्या प्रश्नावर भावनिक इशारा दिला. राज ठाकरेंच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंवर थेट निशाणा साधला आहे.
पुण्यातील ऐतिहासिक वास्तू शनिवार वाड्याच्या आवारातील नमाज पठणावरून झालेल्या वादात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांना थेट लक्ष्य केले आहे. पुरातत्व विभागाने संरक्षित केलेल्या शनिवार वाड्याच्या नियमांचे उल्लंघन झाले असल्यास, तिथे स्थानिक प्रशासन आहे. त्यामुळे ‘इतर कोणीही आपण सरकार आहोत, या थाटात वागू नये,’ असा सणसणीत टोला गोऱ्हे यांनी मेधा कुलकर्णी यांना लगावला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भाजपच्या कार्यकर्त्यांना आपल्या कृत्याकडे नीट डोळे उघडून पाहण्याचे आवाहन केले. इतिहासात आपल्या नावाची पापाचे धनी म्हणून नोंद होऊ देऊ नका. त्यामुळे आपण काय करत आहात व कोणते विष पोसत आहात याकडे एकदा डोळे उघडून नीट पाहा, असे उद्धव भाजप कार्यकर्त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना म्हणालेत.
राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवासंबंधी सर्व नोंदी पूर्णपणे डिजिटल करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. सामान्य प्रशासन विभागामार्फत ‘महा ई-ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टिम’ या नव्या प्रणालीअंतर्गत प्रशासकीय विभागांतील कर्मचाऱ्यांच्या भौतिक सेवापुस्तिकांचे डिजिटायझेशन करण्यास सुरुवात करत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांचे नियुक्तीपासून सेवानिवृत्तीपर्यंतचे सर्व सेवाविषयक व्यवहार एकाच प्रणालीद्वारे एका क्लिकवर उपलब्ध होतील.
पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील ‘जैन बोर्डिंग होस्टेल’ची जागा बेकायदेशीरपणे विकल्याच्या मुद्द्यावरून वातावरण ढवळून निघालेले असताना, आता धर्मादाय आयुक्तांनी पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहाराला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत जे व्यवहार झाले, ते जैसे थे ठेवण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले असून, एचएनडी जैन बोर्डिंगच्या जमीन विक्रीविरोधातील याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. त्यात धर्मादाय आयुक्त अमोघ कलोटी यांनी या प्रकरणावर ‘स्टेटस्को’ म्हणजेच परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिला आहे.
मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, विकासनगर, लेबर कॉलनी परिसरात आधुनिक आणि भव्य ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मारक व इमर्सिव्ह टेक्नॉलॉजी संग्रहालय’ उभारण्यासाठी ९२.९२ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘विकसित महाराष्ट्र 2047’ मसुद्यासंदर्भात सल्लागार समितीसह बैठक पार पडली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे की, भारतीयांना त्यांच्या ज्ञान परंपरेला समजून घेण्यासाठी आणि त्यांचे कौतुक करण्यासाठी ‘मॅकॉले नॉलेज सिस्टीम’च्या परकीय प्रभावापासून पूर्णपणे मुक्त व्हावे लागेल.
पुण्यातल्या ऐतिहासिक शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केले. त्या नमाज पठणाचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात स्थानिक भाजपचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देण्याची भाषा करीत असले
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील गोरेगाव नेस्को ग्राउंडवर आयोजित केलेल्या भव्य मेळाव्यात सत्ताधारी पक्षांवर आणि निवडणूक आयोगावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. राज्यातील सर्व मतदार यादी प्रमुख, गटप्रमुख आणि महत्त्वाचे पदाधिकारी या ‘ग्रँड मेळाव्या’साठी उपस्थित होते.
पुण्यातील शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठन केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेनंतर भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह पतितपावन संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता तिथे असलेली मजार काढण्याची मागणी त्यांनी लाऊन धरली आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त शनिवार वाड्याच्या प्रवेशद्वारावर करण्यात आला आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी आज बुलढाणा येथे बोलताना ‘देशात मतचोरी होत आहे’ या विरोधकांच्या आरोपाला पाठिंबा दिला. या मुद्द्यावर त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेशी आपण सहमत असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले. तसेच, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्यास शेतकऱ्यांनी संपावर जावे, असे आवाहनही त्यांनी केले.
ऐतिहासिक शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांन तिथे मोठे आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांना जाग आली पोलिसांनी नमाज पठण करणाऱ्या अज्ञात महिलांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास काम चालविले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्याकरिता ई – रिक्षा वाटप करण्यात आले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ओबीसी समाजासाठी आपल्या सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचला. मराठा आरक्षणावरून ओबीसी समाजात असलेली अस्वस्थता लक्षात घेऊन त्यांनी यावेळी महत्त्वपूर्ण विधान केले. फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ओबीसी वसतिगृहांची केवळ घोषणा झाली होती, मात्र आम्ही सत्तेत आल्यानंतर 60 नवीन ओबीसी वसतिगृहे सुरू केली. तसेच, 10 लाख ओबीसींना हक्काची घरे दिली आणि समाजासाठी असलेली आर्थिक महामंडळेही मजबूत केली.
राज ठाकरे हे कुशल संघटक आहेत. मात्र, त्यांच्या भूमिकेत सातत्य नाही, कधी ते मोदींची स्तुती करतात तर कधी लाव रे व्हिडिओ म्हणत मोदींवर टीका करतात असे मत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, त्यांचा राजकीय भरती-ओहोटीचा जो सिद्धांत आहे त्याप्रमाणे ते नवे आरोप करत असल्याची खोचक टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
राज्यात येत्या काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी बोगस मतदानाचा मुद्दा उपस्थित केला आहे. निवडणूक आयोगाकडे विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने याबद्दल तक्रार देखील दाखल केली आहे. आता 1 नोव्हेंबर रोजी मोठा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील देखील सहभागी होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे आज ‘महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर’च्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन संपन्न झाले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ओबीसी समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी राज्यात ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. या मंत्रालयाच्या माध्यमातून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तसेच ओबीसी समाजाच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी नवीन योजना राबवून नव्या पिढीला सक्षम करण्याच्या उद्देशाने महाज्योती संस्थेची स्थापना करण्यात आली.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App