• Download App
    आपला महाराष्ट्र – Page 9 – The Focus India

    आपला महाराष्ट्र

    Uddhav Thackeray : महाआरतीसाठी काँग्रेसची ‘NOC’ घेतली का? उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावरून शिंदे गटाचा जोरदार पलटवार

    अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामातील कथित अनियमितता आणि दानपेट्यांच्या चोरीच्या मुद्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाच तारखेला राज्यभरात ‘रामरक्षा आंदोलन’ आणि रविवारी ‘महाआरती’ करण्याची घोषणा केली आहे. “आता हिंदू सत्ताधाऱ्यांना माफ करणार नाहीत,” असा इशाराही त्यांनी दिला. त्यांच्या या घोषणेवर आता शिवसेना शिंदे गटाने अत्यंत आक्रमक शब्दांत पलटवार केला असून, उदय सामंत, शंभुराज देसाई आणि संजय शिरसाट यांनी ठाकरेंवर चौफेर टीका केली आहे.

    Read more

    Tukaram Mundhe : आता दूध व्यवसायावर तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय; भेसळ आढळल्यास थेट परवाना रद्द, राज्यभर कडक नियम लागू

    राज्यातील अन्न सुरक्षा अधिक कठोर करण्याच्या दिशेने अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी आणि पनीर उत्पादकांवरील धडक कारवाईनंतर आता त्यांनी राज्यातील दुग्ध व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले आहे. दुधामधील भेसळ, निकृष्ट दर्जाचे दुग्धजन्य पदार्थ आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी ‘फार्म टू प्लेट’ संकल्पनेवर आधारित राज्यव्यापी कडक नियमावली लागू करण्यात आली आहे.

    Read more

    Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 3 ते 7 जुलैदरम्यान अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

    राज्यात मान्सूनने पुन्हा जोर पकडला असून पुढील चार दिवस महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेषतः 3 ते 7 जुलै या कालावधीत कोकण, घाटमाथा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीकाठ, डोंगराळ भाग आणि सखल वस्त्यांमध्ये राहणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

    Read more

    राम मंदिरातील चोरी विरोधात कठोर कारवाई; पण खासदारांच्या फुटी नंतर आणि देवेंद्र फडणवीसांनी नाकारल्यानंतर उद्धव ठाकरेंना आंदोलनाची “घाई”!!

    राम मंदिरातील चोरी विरोधात कठोर कायदेशीर कारवाई; पण खासदारांच्या फुटी नंतर आणि देवेंद्र फडणवीसांनी नाकारल्यानंतर उद्धव ठाकरेंना आंदोलनाची “घाई”!!, असला प्रकार आज समोर आला.

    Read more

    Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- फाळणीनंतर भारतात आलेले लोक शरणार्थी नाहीत:त्यांनी संपत्ती नाही, देश निवडला

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, 1947 च्या फाळणीनंतर पाकिस्तानमधून भारतात आलेल्या लोकांना ‘शरणार्थी’ म्हणणे योग्य नाही. ते ‘संघर्षाचे योद्धे’ होते, ज्यांनी अनेक पिढ्यांनी कमावलेली जमीन, व्यवसाय आणि मालमत्ता सोडून भारताची निवड केली.

    Read more

    महाराष्ट्रात ब्लॉकचेन – एआयच्या मदतीने जात पडताळणी; आदिवासी विकासाला नवी गती!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य जनजाती सल्लागार परिषदेची 52 वी बैठक झाली.

    Read more

    Washim Court : वाशिम न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; कोठडीतील मृत्यू प्रकरणी 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा; 15 वर्षांनंतर पारधी कुटुंबाला न्याय

    वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने एका अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला आहे. सन २०११ मध्ये पोलिस कोठडीत असताना झालेल्या अमानुष मारहाणीत एका संशयित तरुणाचा मृत्यू झाला होता. या ‘कस्टोडियल डेथ’ प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने तत्कालीन ठाणेदारासह तब्बल नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा निकाल दिला असून, या निर्णयामुळे महाराष्ट्र पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

    Read more

    MLA Sajid Pathan : काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना पुन्हा बिश्नोई गँगची धमकी; फोन रेकॉर्डिंग व्हायरल, विधानसभेत गदारोळ

    पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच अकोल्याचे काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना पुन्हा एकदा बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास आलेल्या धमकीच्या फोनमध्ये खंडणीची मागणी करण्यात आली असून, पैसे न दिल्यास हत्या करण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

    Read more

    Bombay High Court : मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणाले- सरकारचा विरोध केल्यास गुन्हा का? लोकांना सरकारचे गुलाम बनवले जात आहे; पोलिस PM-CM यांचे नोकर नाहीत

    मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माधव जामदार यांनी गुरुवारी सांगितले की, पोलिस केवळ या कारणास्तव लोकांना शहर-भागातून बाहेर काढू शकत नाही, कारण त्यांनी सरकारच्या निर्णयांना विरोध केला आहे किंवा सरकारविरोधात घोषणा दिल्या आहेत. ते म्हणाले- विरोध करणे हा नागरिकांचा अधिकार आहे. याचिकाकर्त्याने ‘भाजप सरकार मुर्दाबाद’, ‘अमित शहा मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या आहेत. नागरिक अशा घोषणा का देऊ शकत नाहीत? अशा घोषणांसाठी हद्दपारीचा आदेश का?

    Read more

    CM Devendra Fadnavis : माहिती अधिकार कायद्यातील वादग्रस्त बदलांना स्थगिती; मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुढाकारानंतर राज्य माहिती आयोगाची माघार

    राज्य सरकारने माहिती अधिकार (RTI) कायद्यात केलेल्या वादग्रस्त बदलांना अखेर तूर्तास स्थगिती दिली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या बदलांविरोधात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेत राज्य माहिती आयोगाशी पत्रव्यवहार केला

    Read more

    Maharashtra Assembly : पावसाळी अधिवेशन:’महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026′ विधानसभेत मंजूर, मॅनहोल दुर्घटनेवरून सभागृहात गदारोळ

    राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आजचा दिवस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक ठरला आहे. विधानसभेत शेतकऱ्यांच्या हिताचे दोन मोठे निर्णय घेण्यात आले असून, एका बाजूला शेतीच्या कामासाठी लागणारे गौणखनिज मोफत करण्याचा मोठा निर्णय महसूलमंत्र्यांनी जाहीर केला आहे, तर दुसरीकडे महिलांना ‘स्वतंत्र शेतकरी’ म्हणून ओळख देणारे ऐतिहासिक विधेयक मांडण्यात आले आहे.

    Read more

    Bachchu Kadu : सचिन आलेत, आता त्यांची क्रिकेट टीमही येणार; ऑपरेशन टायगरवर बच्चू कडूंचा दावा, संजय राऊतांवरही जोरदार हल्लाबोल

    राज्याच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या सत्तानाट्य आणि नेत्यांच्या पक्षांतरावर शिवसेनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी अत्यंत खळबळजनक दावे केले आहेत. विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशावर बोलताना बच्चू कडू यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर थेट आणि अत्यंत शेलक्या शब्दांत हल्लाबोल केला आहे. ठाकरे गटावर आज जी बिकट वेळ आली आहे, त्याला केवळ राऊतच जबाबदार असल्याचा घणाघात त्यांनी केला.

    Read more

    Rain Alert : पुढील 48 तास मराठवाडा-विदर्भासाठी महत्त्वाचे! मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या पुढील 5 दिवसांचा अंदाज

    राज्यात मान्सूनने आता जोर पकडला असून मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर बुधवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. मात्र, दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भाग अजूनही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे खरीप हंगामातील पेरण्या मोठ्या प्रमाणात खोळंबल्या असून शेतकऱ्यांच्या नजरा आता पुढील 48 तासांतील हवामानाकडे लागल्या आहेत.

    Read more

    Mumbai Manhole : मुंबईत उघड्या मॅनहोलचा आणखी एक बळी! 25 फूट खोल गटारात पडून एकाचा मृत्यू; चार अधिकारी निलंबित

    मुंबईत पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निष्काळजी कारभारामुळे आणखी एका निष्पाप नागरिकाचा जीव गेला आहे. साकीनाका येथील खैराणी रोडवर उघड्या मॅनहोलमध्ये पडून 60 वर्षीय अस्लम इसाक शेख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर पालिका प्रशासनावर सर्व स्तरांतून संताप व्यक्त होत असून, चार अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणा केली आहे.

    Read more

    वारकऱ्यांच्या सेवेसाठी विकासाला वेग; देहूतील इंद्रायणीच्या घाटाचा कायापालट!!

    आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू नगरीतील इंद्रायणी घाट विकास प्रकल्प युद्धपातळीवर सुरू असून, वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी १३.०८ कोटींच्या विकासकामांना गती देण्यात आली आहे.

    Read more

    Ketan Agrawal Case : केतन अग्रवाल हत्येची खिल्ली उडवणाऱ्या दंतवैद्य मुस्कान सोनीवर कारवाई:AIDSA कडून तब्बल 5 वर्षांसाठी निलंबन

    पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या हत्येची सोशल मीडियावर खिल्ली उडवल्याचा आरोप झालेल्या मध्य प्रदेशातील दंतवैद्य मुस्कान सोनी हिच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. ऑल इंडिया डेंटल स्टुडंट्स अँड सर्जन्स असोसिएशन (AIDSA) ने मुस्कान सोनीला संघटनेतून पाच वर्षांसाठी निलंबित केले आहे.

    Read more

    Sachin Ahir : विधान परिषद उपसभापती निवडणूक, महाविकास आघाडीच्या उमेदवाराची ऐनवेळी माघार, महायुतीचे सचिन अहिर यांची बिनविरोध निवड

    महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदावर अखेर शिवसेना (शिंदे गट) नेते सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झाली. महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज दाखल केला होता, तर महाविकास आघाडीकडून शिवसेना (ठाकरे गट)चे जगन्नाथ अभ्यंकर रिंगणात होते.

    Read more

    Ramdas Athawale : ‘एकनाथ शिंदेच खरी शिवसेना पुढे नेत आहेत’, सचिन अहिरांच्या पक्षप्रवेशावर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

    उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का देत विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे हेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असल्याचे सांगत त्यांनी सचिन अहिर यांच्या निर्णयाचे समर्थन केले.

    Read more

    Maharashtra Assembly : पावसाळी अधिवेशन; डॉक्टर दिनी 1,400 नियुक्त्यांची घोषणा; सेवा केंद्रांच्या शुल्कावर पटोलेंचा सवाल, रिक्त पदांवर वडेट्टीवारांचा हल्लाबोल

    राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आजही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरून सभागृहात जोरदार चर्चा रंगली. राज्यातील विनापरवाना IVF केंद्रे, गर्भलिंग निदानातील गैरप्रकार, ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील रिक्त पदे, पीकविमा, तसेच जळगाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील जलद न्यायाच्या मागणीवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी IVF गैरप्रकारांवर MCOCA लागू करण्यासाठी पुढील अधिवेशनात कायदेशीर तरतूद करण्याची घोषणा करत सरकारची भूमिका स्पष्ट केली.

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरेंची शहांवर टीका:म्हणाले- महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या आणि घाणेरड्या राजकारणाला शहांचीच रणनीती जबाबदार

    मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील आणि देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अत्यंत तीव्र आणि रोखठोक शब्दांत प्रहार केला आहे. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे राज्याची संस्कृती खराब होत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.

    Read more

    Amol Kolhe : ‘मला एखादी ऑफर आली तर मी भविष्यात विचार करेन’, अमोल कोल्हेंचे सूचक विधान, मुख्यमंत्र्यांचेही ‘इन्फ्रा मॅन’ म्हणत केले कौतुक

    महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील तब्बल 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेतल्या आणि जोरदार टीका केली

    Read more

    Maharashtra Monsoon : राज्यात मान्सूनचे दमदार पुनरागमन; 6 जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’, तर मुंबईला ‘ऑरेंज अलर्ट’! पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता

    राज्यात यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळे सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा होती, मात्र जूनच्या अखेरीस पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आगामी काही दिवसांत संपूर्ण राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

    Read more

    सचिन अहिरविरोधात पत्रकारांसमोर फटकेबाजी; पण विधान परिषदेच्या उपसभापतींच्या निवडणुकीत माघारी!!; संदेश काय गेला??

    सचिन अहिरविरोधात पत्रकारांसमोर फटकेबाजी; पण विधान परिषदेच्या उपसभापतींच्या निवडणुकीत माघारी!!, असला प्रकार ठाकरे सेनेकडून विधान परिषदेत समोर आला.

    Read more

    गडचिरोलीत माओवाद्यांविरोधात आणखी एक निर्णायक कारवाई; बालबेडा जंगलात शस्त्रनिर्मितीचे साहित्य शोधून नष्ट!!

    महाराष्ट्राच्या फडणवीस सरकारने माओवादी हिंसाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अवलंबलेल्या झिरो टॉलरन्स धोरणांतर्गत गडचिरोलीत माओवाद्यांविरोधात आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली.

    Read more

    HSRP : HSRP नंबर प्लेट नसल्यास उद्यापासून थेट कारवाई; मुदतवाढ संपली, परिवहन मंत्र्यांचा इशारा

    राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत आज (३० जून) संपत आहे. “आम्ही आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ दिली आहे, त्यामुळे आता पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही. उद्यापासून (१ जुलै) विना HSRP नंबर प्लेट धावणाऱ्या वाहनांवर परिवहन विभागाकडून ठोस आणि कडक कारवाई केली जाईल,” अशी स्पष्ट घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज केली आहे.

    Read more