महाराष्ट्रात 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात घट; पुढील 10 दिवस हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता!!
जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आतापर्यंत सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. विशेषतः खानदेश (धुळे आणि नंदुरबार), मध्य महाराष्ट्र (अहिल्यानगर आणि सोलापूर), पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे, असे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाने केले.