• Download App
    Ketan Agrawal Case केतन अग्रवाल हत्येची खिल्ली उडवणाऱ्या दंतवैद्य मुस्कान सोनीवर कारवाई:AIDSA कडून तब्बल 5 वर्षांसाठी निलंबन

    Ketan Agrawal Case : केतन अग्रवाल हत्येची खिल्ली उडवणाऱ्या दंतवैद्य मुस्कान सोनीवर कारवाई:AIDSA कडून तब्बल 5 वर्षांसाठी निलंबन

    Ketan Agrawal Case

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : Ketan Agrawal Case  पुण्यातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या हत्येची सोशल मीडियावर खिल्ली उडवल्याचा आरोप झालेल्या मध्य प्रदेशातील दंतवैद्य मुस्कान सोनी हिच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. ऑल इंडिया डेंटल स्टुडंट्स अँड सर्जन्स असोसिएशन (AIDSA) ने मुस्कान सोनीला संघटनेतून पाच वर्षांसाठी निलंबित केले आहे.Ketan Agrawal Case

    केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणावर आक्षेपार्ह टिप्पणी करतानाचा मुस्कान सोनीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर तिच्यावर सर्व स्तरातून तीव्र टीका झाली होती. व्हिडिओमध्ये मुस्कान सोनी हिने केतन अग्रवाल यांचे ‘विग’वरून वादग्रस्त विधान केले होते. यामुळे तिच्यावर सर्वच स्तरातून टीका होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर AIDSA ने तिच्यावर पाच वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे.Ketan Agrawal Case



    व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप

    सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मुस्कान सोनी हिने केतन अग्रवाल यांच्या हत्येची खिल्ली उडवल्याचा आरोप करण्यात आला. या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. सोशल मीडियावरही तिच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात येत होती.

    माफी मागितली, पण कारवाई कायम

    वाद वाढल्यानंतर मुस्कान सोनी हिने सार्वजनिकरित्या माफी मागितली. आपण केलेल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त करत ती टिप्पणी चुकीची होती, असे तिने मान्य केले. मात्र, माफी मागूनही तिच्यावरील कारवाई मागे घेण्यात आलेली नाही. ऑल इंडिया डेंटल स्टुडंट्स अँड सर्जन्स असोसिएशनने तिचे पाच वर्षांसाठी निलंबन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

    AIDSA कडून निलंबनाचे आदेश

    ऑल इंडिया डेंटल स्टुडंट्स अँड सर्जन्स असोसिएशनने (AIDSA) डॉ. मुस्कान सोनी यांना AIDSA च्या सर्व पदांवरून आणि सदस्यत्वावरून निलंबित केले आहे.

    “डॉ. मुस्कान सोनी यांनी AIDSA च्या घटनेचे, आचारसंहितेचे आणि नैतिक मूल्यांचे उल्लंघन करून, गैरशिस्तीचे कृत्य केले असून दिवंगत केतन अग्रवाल यांच्याबद्दल अत्यंत अनुचित, आक्षेपार्ह आणि अनादरपूर्ण टिप्पणी केल्याचे आढळून आले आहे… सक्षम प्राधिकरणाने यात बदल किंवा रद्द करेपर्यंत, हे निलंबन जारी झाल्याच्या तारखेपासून पाच (05) वर्षांसाठी प्रभावी राहील. हा आदेश तात्काळ प्रभावाने अंमलात येत आहे,” असे निलंबन आदेशात म्हटले आहे.

    या निर्णयामुळे वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांनी सार्वजनिक व्यासपीठावर जबाबदारीने वागण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

    Ketan Agrawal Case: Dentist Dr Muskan Soni Suspended for 5 Years by AIDSA

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Shambhuraj Desai : खासदारांचे विलीनीकरण पूर्णपणे घटनात्मक; ठाकरे गटाच्या सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर शंभुराज देसाईंचे प्रत्युत्तर

    Prakash Ambedkar : विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणाचे महाराष्ट्रात पडसाद; वंचितकडून 23 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; प्रकाश आंबेडकरांची घोषणा

    Uddhav Thackeray : जंतरमंतरवरील आंदोलनात उद्धव ठाकरेंची हजेरी; म्हणाले- देशाच्या भविष्यावर लाठ्या चालवणाऱ्या सरकारला उलथवून टाका