विशेष प्रतिनिधी
मुंबई : HSRP राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत आज (३० जून) संपत आहे. “आम्ही आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ दिली आहे, त्यामुळे आता पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही. उद्यापासून (१ जुलै) विना HSRP नंबर प्लेट धावणाऱ्या वाहनांवर परिवहन विभागाकडून ठोस आणि कडक कारवाई केली जाईल,” अशी स्पष्ट घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज केली आहे.HSRP
देशविरोधी कारवायांना चाप लावण्यासाठी निर्णय
या नंबर प्लेट्सचे महत्त्व अधोरेखित करताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, “ज्या पद्धतीने राज्यात आणि देशात देशविरोधी कारवाया घडतात, ते पाहता सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने HSRP नंबर प्लेट्स अत्यंत आवश्यक आहेत. मुंबईसह अनेक राज्यांमध्ये देशविरोधी घटकांनी केलेल्या हल्ल्यांनंतरच प्रत्येक वाहनावर ही हाय-सिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे संशयास्पद वाहनांची ओळख पटवणे आणि राज्याची सुरक्षा व्यवस्था मजबूत करणे सोपे होते.”HSRP
एजंटच्या आमिषाला बळी पडू नये
वाहनधारकांनी केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच HSRP साठी नोंदणी करावी आणि कोणत्याही अनधिकृत व्यक्ती अथवा एजंटच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहनही परिवहन मंत्र्यांनी केले आहे. राज्यातील सर्व वाहनधारकांनी वाहन सुरक्षेच्या दृष्टीने ही प्रक्रिया गांभीर्याने घेत शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
उद्यापासून दंडात्मक कारवाईचा बडगा
आज ३० जून रोजी ही मुदत संपुष्टात येत असल्याने उद्यापासून परिवहन विभाग आणि ट्रॅफिक पोलिसांकडून राज्यभर धडक मोहीम हाती घेतली जाणार आहे. ज्या वाहनधारकांनी अजूनही HSRP नंबर प्लेट बसवलेली नाही, त्यांना आता मोठ्या दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी तातडीने ऑनलाइन नोंदणी करून नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
HSRP Number Plate Mandatory in Maharashtra: Strict Action from July 1
महत्वाच्या बातम्या
- चवदार तळ्याचा सत्याग्रह हा सामाजिक न्यायासाठी केलेला संघर्ष : केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू
- भारत डिजिटल झाल्याला ११ वर्षे पूर्ण; कशी आणि कोणती केली कामगिरी??, वाचा तपशील!!
- CBSE : CBSE चा निर्णय, तिसऱ्या भाषेत बोर्ड परीक्षा होणार नाही; त्रि-भाषा धोरणासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली
- सचिन अहिरांनी शिंदे सेनेत येऊन उद्धव ठाकरेंना दिल्या त्यांच्या पक्षाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा!!; नेमके कारण काय??