• Download App
    Maharashtra Assembly पावसाळी अधिवेशन:'महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026' विधानसभेत मंजूर, मॅनहोल दुर्घटनेवरून सभागृहात गदारोळ

    Maharashtra Assembly : पावसाळी अधिवेशन:’महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026′ विधानसभेत मंजूर, मॅनहोल दुर्घटनेवरून सभागृहात गदारोळ

    Maharashtra Assembly

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Maharashtra Assembly राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आजचा दिवस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक ठरला आहे. विधानसभेत शेतकऱ्यांच्या हिताचे दोन मोठे निर्णय घेण्यात आले असून, एका बाजूला शेतीच्या कामासाठी लागणारे गौणखनिज मोफत करण्याचा मोठा निर्णय महसूलमंत्र्यांनी जाहीर केला आहे, तर दुसरीकडे महिलांना ‘स्वतंत्र शेतकरी’ म्हणून ओळख देणारे ऐतिहासिक विधेयक मांडण्यात आले आहे.Maharashtra Assembly

    निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे आणि अटी:

    कशासाठी मिळणार सवलत?: ही मुभा केवळ शेतातील रस्ते दुरुस्ती आणि शेतीच्या आवश्यक कामांसाठीच लागू राहणार आहे. या गौणखनिजाच्या ‘व्यावसायिक वापरास’ सक्त मनाई असेल.Maharashtra Assembly

    परवानगी कशी मिळणार?: या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना संबंधित मंडळ अधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल. अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांना या कामासाठी १५ दिवसांची अधिकृत परवानगी दिली जाईल.Maharashtra Assembly



    ट्रॅक्टरवर कारवाई नाही: शेतीच्या कामासाठी आणि गौणखनिजाच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, असे महसूलमंत्र्यांनी सभागृहात स्पष्ट केले आहे.

    सत्ताधारी आणि विरोधकांकडून निर्णयाचे स्वागत

    शेतीसाठी लागणारे गौणखनिज रॉयल्टीमुक्त उपलब्ध करून देण्याच्या राज्य सरकारच्या या निर्णयाचे विधानसभेत सर्वपक्षीय नेत्यांनी जोरदार स्वागत केले. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आणि त्यांना मोठा दिलासा देणारा असल्याचे सांगत राज्य सरकारचे अभिनंदन केले. तर, काँग्रेसचे नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनीही या निर्णयाचे स्वागत करत, या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक भार हलका होईल, अशी प्रतिक्रिया दिली.

    ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’ विधानसभेत

    राज्यातील कृषी क्षेत्रात ८१ टक्क्यांहून अधिक महिला राबत असल्या, तरी त्यांना आजवर ‘शेतकरी’ म्हणून कायदेशीर दर्जा नव्हता. कुटुंबाच्या जमिनीवर घाम गाळणाऱ्या लाखो महिलांना हक्क मिळवून देण्यासाठी आज ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’ विधानसभेत मांडले गेले.

    विधेयकातील प्रमुख तरतुदी:

    महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र कायदेशीर ओळख मिळणार.
    अचूक लाभासाठी महिला शेतकऱ्यांचा स्वतंत्र डिजिटल डेटाबेस तयार केला जाणार.
    विकासासाठी खास ‘महाराष्ट्र राज्य महिला शेतकरी निधी’ स्थापन होणार.
    शासकीय योजना, हक्क आणि नवीन संधींचा थेट लाभ लाखो महिला शेतकऱ्यांना मिळणार.

    मॅनहोल दुर्घटनेवरून सभागृहात गदारोळ

    मुंबईतील कुर्ला-साकीनाका परिसरातील खैराणी रोडवर मोबाईलवर बोलत चाललेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला. असलम अन्सारी असे या मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेचे पडसाद आज पावसाळी अधिवेशनात पाहायला मिळाले.

    काँग्रेस नेते नाना पटोले यांनी या प्रकरणी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, परवाच एका बसवर झाड पडून एका मुलाचा मृत्यू झाला. आज मॅनहोल पडून एका माणसाचा मृत्यू झाला. महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारामुळे आणखी किती मुंबईकरांचा जीव घ्यायचा आहे? मुंबई शहरात भीतीचे वातावरण आहे. या दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मुंबईत झालेल्या घटनांची जागतिक स्तरावर चर्चा जाते. मुंबई शहरात पाणी साचलेले आहे, रस्त्यांवर वाहतूक कोंडी आहे. मुंबई शहरात चाललं काय? मुंबई महानगरपालिकेत जे काळं-बेरे चाललेले आहे, याला सरळ करण्यासाठी सरकार अजून काय उपायोजना करणार? केवळ चार अधिकाऱ्यांवर कारवाई करून चालणार नाही. हे सगळे थांबवण्यासाठी काय करू शकता? असा सवाल नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केला.

    ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026’वर सभागृहात चर्चा

    राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६’ मांडले. या विधेयकावर झालेल्या चर्चेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आदित्य ठाकरे, पंकजा मुंडे, आदिती तटकरे, ज्योती गायकवाड, श्वेता महाले, मनिषा चौधरी, सुलभा खोडके, माधुरी मिसाळ, भास्करराव जाधव, चंद्रदीप नरके, स्नेहा दुबे, सुलभा गायकवाड, प्रकाश सोळंके, सना मलिक, नाना पटोले, जयंत पाटील, कैलास पाटील, सुरेश धस, हेमंत ओगले, सुमित वानखेडे, गोपीचंद पडळकर, भापूसाहेब पटारे, अभिजीत पाटील, आशुतोष काळे, नारायण पाटील यांसह अनेक सदस्यांनी सहभाग घेतला.

    महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026′ विधानसभेत मंजूर

    महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक २०२६ विधानसभेत मंजूर करण्यात आले. आवाजी मतदान घेऊन एकमताने हे विधेयक संमत झाले. हे विधेयक एकमताने मंजूर केल्याबद्दल कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले.

    Maharashtra Assembly Passes Women Farmers Empowerment Bill 2026 Amid Ruckus

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Bombay High Court : मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणाले- सरकारचा विरोध केल्यास गुन्हा का? लोकांना सरकारचे गुलाम बनवले जात आहे; पोलिस PM-CM यांचे नोकर नाहीत

    CM Devendra Fadnavis : माहिती अधिकार कायद्यातील वादग्रस्त बदलांना स्थगिती; मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुढाकारानंतर राज्य माहिती आयोगाची माघार

    Bachchu Kadu : सचिन आलेत, आता त्यांची क्रिकेट टीमही येणार; ऑपरेशन टायगरवर बच्चू कडूंचा दावा, संजय राऊतांवरही जोरदार हल्लाबोल