• Download App
    Uddhav Thackeray राम मंदिरातील चोरी विरोधात कठोर कारवाई; पण खासदारांच्या फुटी नंतर आणि देवेंद्र फडणवीसांनी नाकारल्यानंतर उद्धव ठाकरेंना आंदोलनाची "घाई"!!

    राम मंदिरातील चोरी विरोधात कठोर कारवाई; पण खासदारांच्या फुटी नंतर आणि देवेंद्र फडणवीसांनी नाकारल्यानंतर उद्धव ठाकरेंना आंदोलनाची “घाई”!!

    नाशिक : राम मंदिरातील चोरी विरोधात कठोर कायदेशीर कारवाई; पण खासदारांच्या फुटी नंतर आणि देवेंद्र फडणवीसांनी नाकारल्यानंतर उद्धव ठाकरेंना आंदोलनाची “घाई”!!, असला प्रकार आज समोर आला. Uddhav Thackeray

    चोरीच्या विरोधात कारवाई

    अयोध्येतील राम मंदिरामध्ये देणगीची चोरी होऊन महिना उलटला. त्यामध्ये योगी सरकारने स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम नेमून कठोर कारवाई सुरू केली. आठ आरोपींना पकडून जेलमध्ये घातले. चंपत राय, अनिल मिश्रा आणि गोपाळ राव यांना राजीनामे द्यायला लावले. अयोध्येतून त्यांच्या हकालपट्टीची किंबहुना त्यांना जेलमध्ये घालण्याची तयारी सुरू केली. योगी आदित्यनाथ यांनी स्पेशल टीमला मुदतवाढ सुद्धा दिली. राम मंदिरातील देणगी चोरांना कुठलीही सहानुभूती मिळता कामा नये, याची व्यवस्था तिथल्या योगी सरकारने आणि मोदी सरकारने केली. भाजपने व्यवस्थित डॅमेज कंट्रोल सुरू केले.



    उद्धव ठाकरेंना आंदोलन

    पण एवढे सगळे झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना आज राम मंदिरातल्या देणगी चोरी विरुद्ध आंदोलन करण्याची “घाई” झाली. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राम मंदिरातील चोरी विरोधात मुंबईतून राम रक्षा आंदोलन करण्याची घोषणा केली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर जोरदार तोंडसुख घेतले. ते भाजपच्या नेत्यांना वाट्टेल तसे बोलले.

    बैल गेला आणि झोपा केला

    पण हे सगळे उद्धव ठाकरे यांनी “बैल गेला आणि झोपा केला” या म्हणीला अनुसरून केले. राम मंदिरातील चोरी उघडकीस आल्याबरोबर त्यांना त्या चोरी विरोधात आंदोलन करावेसे वाटले नाही. त्यांनी त्यावेळी तशी पत्रकार परिषद घेतली नाही किंवा आंदोलनाची घोषणा सुद्धा केली नाही. पण उद्धव ठाकरेंचे सहा खासदार फुटले. ते एकनाथ शिंदेंना जाऊन मिळाले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पंतप्रधान पदाचे जाळे टाकून पाहिले. मराठी पंतप्रधानाला आम्ही पाठिंबा देऊ असे सांगून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे लांगुलचालन केले. देवेंद्र फडणवीस आणि त्यांनी एकाच विमानात प्रवास केला. त्यानंतर फडणवीस आणि ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली.

    देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतच्या बैठकीत आता वेळ निघून गेली जेव्हा प्रेम हवे होते, तेव्हा त्यांनी दिले नाही. आता ठाकरेंबरोबर भाजप जोडून घेण्याची शक्यता नाही असे स्पष्ट केले‌. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज 3 जुलै 2026 रोजी पत्रकार परिषद घेऊन अयोध्येतल्या राम मंदिरातल्या देणगी चोरी विरोधात मोठे आंदोलन उभारण्याची घोषणा केली त्या आंदोलनाला त्यांनी रामरक्षा आंदोलन असे नाव दिले.

    Uddhav Thackeray in a “hurry” to launch an agitation following the defection of MPs and Devendra Fadnavis’s refusal!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sanjay Shirsat : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय रंग दिला जातोय; संजय शिरसाट यांचा ठाकरे, राहुल गांधींसह विरोधकांवर निशाणा

    Chhagan Bhujbal : सरकारविरोधात मुद्दा मिळाला की विरोधक फायदा घेतात; ठाकरे बंधूंच्या आंदोलनावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया, पोलिसांच्या भूमिकेवरही भाष्य

    Thackeray Brothers : नीट पेपरफुटीविरोधात ठाकरे बंधूंचा एल्गार; 26 जुलैला विद्यार्थ्यांसोबत मुंबईत भव्य मोर्चा, पालकांनाही मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन