• Download App
    सचिन अहिरविरोधात पत्रकारांसमोर फटकेबाजी; पण विधान परिषदेच्या उपसभापतींच्या निवडणुकीत माघारी!!; संदेश काय गेला?? – The Focus India

    सचिन अहिरविरोधात पत्रकारांसमोर फटकेबाजी; पण विधान परिषदेच्या उपसभापतींच्या निवडणुकीत माघारी!!; संदेश काय गेला??

    नाशिक : सचिन अहिरविरोधात पत्रकारांसमोर फटकेबाजी; पण विधान परिषदेच्या उपसभापतींच्या निवडणुकीत माघारी!!, असला प्रकार ठाकरे सेनेकडून विधान परिषदेत समोर आला.

    – आदित्य ठाकरेंची फटकेबाजी

    सचिन अहिर ठाकरे सेनेतून फुटले. ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले‌. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी संतापून सचिन अहिर यांच्या विरोधात पत्रकारांसमोर जोरदार फटकेबाजी केली. सचिन अहिर आणि त्यांच्या घरातल्यांना शिवसेनेने कुठली पदे केव्हा दिली याची यादीच त्यांनी वाचून दाखविली तरीसुद्धा सचिन अहिर फुटले म्हणून आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर आगपाखड केली‌.



    – उपसभापती पदाच्या निवडणुकीतून माघारी

    पण प्रत्यक्षात सचिन अहिर यांच्या विरोधात विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक लढवायची वेळ आली, त्यावेळी ठाकरे सेनेने विधान परिषदेच्या सभागृहात मात्र माघार घेतली. ठाकरे सेनेकडून जगन्नाथ अभ्यंकर यांनी उपसभापतींच्या निवडणुकीत अर्ज दाखल केला होता. त्यामुळे ही निवडणूक मतदानाद्वारे होणार, असे दिसत होते. पण प्रत्यक्षात ठाकरे सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे एकत्रित बळ जगन्नाथ अभ्यंकर यांना निवडून येण्यासाठी पुरेसे ठरत नव्हते.

    – अनिल परब यांची घोषणा

    विधान परिषदेत उपसभापतींची निवडणूक सुरू झाली त्यावेळी भाजपचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गोड गुलाबी भाषेत संपूर्ण सभागृहाचे मत असे आहे की विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक बिनविरोध व्हावी त्यामुळे जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज मागे घ्यावा, अशी विनंती केली. चंद्रकांतदादा पाटलांच्या विनंतीला ठाकरे सेनेचे आमदार अनिल परब यांनी मान देऊन जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज मागे घेण्याची घोषणा केली.

    – राजकीय संदेश

    पण यातून एक वेगळाच संदेश महाराष्ट्रात गेला. ठाकरे सेनेतून आमदार आणि खासदार फुटले, तर ठाकरे सेनेचे नेते बाहेर पत्रकारांसमोर मोठा आरडाओरडा करतात पण प्रत्यक्षात फुटलेल्या आमदार किंवा खासदारांच्या विरोधात लढायची वेळ आली तर सभागृहात मात्र माघार घेतात, असे चित्र ठाकरे सेनेच्या राजकीय कृतीतून समोर आले. वास्तविक ठाकरे सेना लढली असती, तर जगन्नाथ अभ्यंकर यांचा पराभव झाला असता पण ठाकरे सेना बाहेर जे बोलते तेच सभागृहातही करते असा राजकीय संदेश सगळ्या महाराष्ट्रात गेला असता, तर त्याचा भविष्यातल्या राजकारणासाठी ठाकरे सेनेला फायदाच झाला असता.

    Lashing out at Sachin Ahir in front of journalists

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    NEET exam : नीट परीक्षेतील गुण घोटाळ्याचे दावे पूर्णपणे निराधार; हायकोर्टाने 4 याचिका फेटाळल्या; बनावट कागदपत्रांमुळे विद्यार्थ्यांना ठोठावला दंड

    Maharashtra Loan Waiver Scheme : आयकरदाते 94 हजार शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरले; सहकार विभागाकडून 32 लाख बळीराजाची डेटा पडताळणी

    Earthquakes : नाशिकमध्ये गुरुवारी दोनदा भूकंपाचे धक्के; 6 दिवसांत 10 वा हादरा बसला; सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे केंद्र