मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट- मनसे युतीची लिटमस टेस्ट मानल्या जात असलेल्या बेस्ट एम्प्लॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत दाेन्ही ठाकरे बंधूंना माेठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ‘उत्कर्ष’ पॅनलचा दारुण पराभव झाला. 21 पैकी एकही जागा मिळवता आलेली नाही. दुसरीकडे, शशांक राव यांच्या पॅनलने 14 जागा जिंकत एकहाती यश संपादन केले. महायुतीच्या पॅनलला 7 जागांवर समाधान मानावे लागले.
मुंबईमध्ये बेस्ट कामगारांच्या पतपेढीची निवडणूक जिंकल्यानंतर महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी बेस्टची निवडणूक जिंकणारे शशांक राव यांना आणि ज्यांच्या पॅनलला त्यांनी पराभूत केले
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला आज १२ वर्षे पूर्ण झाली. २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील ओंकारेश्वर मंदिराजवळील विठ्ठल रामजी शिंदे पुलावर त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात न्यायालयाने दोन जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तर उर्वरित तिघांची पुराव्या अभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना स्वतःचा राजकीय पक्ष काढण्याचा सल्ला दिला आहे. देशाचे निवडणूक आयुक्त एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यासारखे बोलत आहेत. त्यांची बोलण्याची पद्धत पाहता ते जनतेसाठी काम करतात असे वाटत नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष काढावा, असे ते म्हणालेत. दरम्यान, मी गांधी नाही, पण विचारांसाठी बलिदान स्वीकारण्याची माझी तयारी आहे, असेही ते यावेळी कीर्तनकारक संग्राम भंडारे यांनी दिलेल्या धमकीवर भाष्य करताना म्हणाले.
गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने पुण्याला चांगलेच झोडपले आहे. यामुळे पुण्यातील बऱ्याच भागात पाणी साचलेले आहे. परंतु याचा सर्वाधिक फटका सिंहगड रोडवरील एकता नगर भागाला बसला आहे.
0 + 0 = 0; पण आयातवीरांची बेरीजही अपूर्ण; हेच बेस्ट निवडणुकीच्या निकालाचे खरे चित्र!!, असे म्हणायची वेळ ठाकरे बंधूंच्या पराभवाने आणि त्या पाठोपाठ भाजपच्या आयातवीर नेत्यांनी केलेल्या जल्लोषामुळे आली आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखाना ते बेस्ट पतपेढी निवडणूक यामध्ये पवार आणि ठाकरे या दोन्ही ब्रँडचे स्वहस्ते विसर्जन झाले, असे जाहीर करायला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घ्यायला हरकत नाही!
महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील मतदार संख्येतील फरकाबाबत मोठा वाद निर्माण झाल्यानंतर अखेर लोकनीती-CSDS या नामांकित सर्वेक्षण संस्थेने माघार घेतली आहे. मतदार संख्या तुलना करताना संस्थेकडून गंभीर घोडचूक झाल्याचे स्पष्ट झाले असून, याची कबुली संस्थेचे सह-संचालक संजय कुमार यांनी स्वतः दिली आहे. त्यासाठी त्यांनी माफी देखील मागितली आहे. मात्र, आता राहुल गांधी माफी मागतील का? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
राज्यात एकीकडे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना, दुसरीकडे शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याच पार्श्वभूमीवर, महायुती सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा करतील, असे संकेत त्यांनी दिले आहेत. सोमवारी ते यवतमाळमधील पुसद येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गडबड झाली असल्याचा आरोप करत संपूर्ण विरोधी पक्ष रस्त्यावर उतरला आहे. मात्र, विरोधी पक्षाला या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. ही तक्रार महाराष्ट्र उच्च न्यायालयानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी योग्य मानली नाही. जूनमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते, जे सोमवारी फेटाळण्यात आले आहे.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन झाले आहे. ते 91 वर्षांचे होते. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमी, हिंदी सिने सृष्टी आणि मालिकांच्या जगतातील एक अत्यंत प्रगल्भ, अनुभवी व लोकप्रिय कलाकार हरपला आहे.
मागील कित्येक दिवसांपासून रखडलेला पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुल अखेर आता नागरिकांसाठी खुला केला जाणार आहे. मात्र सिंहगड उड्डाणपुलाबाबत पालिकेकडून अजूनही कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती मिळालेली नाहीये.
पुणे शहरात मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नऱ्हे परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका बसला भीषण आग लागली. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. बसमधील ३० वर सर्व प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली असून सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात हाहाकार माजवला आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात तब्बल ४२ वर्षांनंतर अशी विक्रमी अतिवृष्टी झाली आहे.
महाराष्ट्रातील मंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत शिरसाटांवर गंभीर आरोप केले. त्यांच्या मते, सिडकोचे अध्यक्षपद मिळताच संजय शिरसाट यांनी नियम धाब्यावर बसवून बिवलकर कुटुंबाला तब्बल ५ हजार कोटींची किंमत असलेली १५ एकर जमीन दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. अनेक राजकीय घडामोडी आणि पक्षप्रवेश होत आहेत. अशातच सोलापूरात भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का देण्यात आला आहे.
महायुतीमध्ये सुरू असलेला नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी धुळ्यातील एका कार्यक्रमात थेट “नाशिकचा पालकमंत्री मीच होणार,” असे ठामपणे सांगून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. तर गिरीश महाजन यांच्या या दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनीही नाशिकच्या पालकमंत्री पदावर आपल्या पक्षाचा हक्क असल्याचे म्हटले आहे. दोघांच्या विधानामुळे महायुती सरकारमधील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच रोहित पवार यांना उद्देशून केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. ‘जर भावकीचा विचार केला नसता तर तू आमदार झाला नसतास,’ असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. यावरून आता भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. अजित पवार आपल्याला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला.
वसंतदादा हे आमचे नेते होते, मात्र ते इंदिरा काँग्रेसमध्ये होते आणि आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी प्रेरित होतो. निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेस पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापनेचा प्रयत्न करत होते. मात्र आम्हा तरुणांचा त्या एकत्रीकरणाला विरोध होता. त्यामुळे आम्ही वसंतदादांचे सरकार घालवायचे ठरवले आणि ते घालवलं. त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो, अशी थेट कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीबद्दल मोठा खुलासा केला आहे. आमची भाजपसोबत जाण्याची इच्छा खूप आधीपासून होती, इतकेच नाही तर शरद पवार यांची देखील तीच इच्छा होती. 2014 च्या निवडणुकीत आम्ही काँग्रेसचा आणि भाजपने शिवसेनेचा हात सोडायचे ठरले होते, असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पुणे शहरातील खराडी येथील ड्रग्ज पार्टी प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल मनीष खेवलकर याच्याविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात महिलेचे नकळत व्हिडिओ काढल्याने आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात एका महिलेने डॉ.खेवलकर यांच्या विरोधात तक्रार दिली.
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे शनिवारी (१६ ऑगस्ट) दुःखद निधन झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना दुपारी चार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी अकरा वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. ज्योती चांदेकर या सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या आई होत.
राज्यातील अनेक जिल्ह्यांत शुक्रवारी व शनिवारी पावसाने जोरदार पुनरागमन केले. मराठवाड्यात सर्व जिल्ह्यांत गत दोन दिवस अतिवृष्टी झाली, तर मुंबईत अवघ्या तीन तासांत २०० मिमी पावसाने हाहाकार माजवला. कोकण विभागात गत चार दिवसांपासून आणि विदर्भातही गत २४ तासांपासून मुसळधार पाऊस झाला.
काही लोकांना वाटते की आपण लईच मोठे झालो आहोत. सगळ्या महाराष्ट्राचे नेतृत्व आपल्याकडे आले आहे. मात्र, त्यांनी त्यांच्या पक्षाचे बघावे. आम्ही आमच्या पक्षाचे बघतो. दुसऱ्यांच्या पक्षात नाक खुपसण्याची गरज नाही. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवार यांना सुनावले आहे. अजित पवार यांचा पक्ष सुनील तटकरे यांनी पक्ष हायजॅक केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. यावरून अजित पवार यांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाची जगात महती वाढवण्याचे काम करणाऱ्या माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे नाव घेत नाही ही गोष्ट अस्वस्थ करणारी आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App