तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे प्रमुख एम. के. स्टालिन यांना एकदम “नवे KCR” बनायचा मूड आलाय. या मूड मधूनच त्यांनी delimitation विरोधात छोट्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एकजूट करण्याचा घाट घातलाय!!
भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये मजबूत व्यापारी संबंध आहेत. 2023 मध्ये भारताने अमेरिकेत *$80.2 अब्ज (₹6.7 लाख कोटी)* किमतीच्या वस्तू आणि सेवांची निर्यात केली.
भाजप महायुतीच्या सरकारची गेल्या तीन महिन्यांमधली राजकीय वाटचाल पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पकडलेली दिशा भाजप शतप्रतिशत कडे निघाल्याचे सांगितले जात आहे.
संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राईट हॅन्ड वाल्मीक कराड सापडल्यानंतर धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतल्याच्या बातम्या आज मराठी माध्यमांनी चालविल्या.
नाशिक : धनंजय मुंडे यांचा राजीनामा “नैतिक” की वैद्यकीय कारणासाठी??; शाब्दिक खेळात अडकल्या “पवार संस्कारित” दोन राष्ट्रवादी!! त्याचे झाले असे : संतोष देशमुख प्रकरणात अजितदादांच्या […]
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांची झकापकी झाल्यानंतर झेलेन्स्की ब्रिटनमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान किर स्टार्मर यांच्याशी चर्चा केली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या व्हाईट हाऊस मधील ओव्हल ऑफिस मध्ये झालेल्या खडाजंगी नंतर युरोप मधले राष्ट्रप्रमुख “खुश” होऊन झेलेन्स्की यांना तोंडी पाठिंबा देऊन मोकळे झाले.
भारत आणि महाराष्ट्राप्रमाणेच बांगलादेशातही उदभवली नवी NCP!!… भारतात ज्याप्रमाणे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी राजकीय फारकत घेऊन शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी काँग्रेसचेच नेते आणि कार्यकर्ते फोडून 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्थात नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी NCP काढली होती
स्वारगेट पासून देवळ्यापर्यंत गुन्हेगारांचे कनेक्शन राष्ट्रवादीशी पण फडणवीस यांच्या गृहमंत्रालयाला आरोपीच्या पिंजऱ्यात ढकलण्याची घाई!! हे विचित्र चित्र महाराष्ट्रात दिसून आले.
रशियाविरुद्धच्या युद्धात अमेरिकेने युक्रेनला केलेल्या मदतीच्या बदल्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन मधल्या दुर्मिळ खनिजांवर अमेरिकेचा हक्क सांगितला. अमेरिकेने युक्रेनला दिलेल्या 350 अब्ज डॉलर्सच्या मदतीच्या बदल्यात युक्रेनने त्यांच्याकडील दुर्मिळ खनिजे अमेरिकेला द्यावीत अशी मागणी केली.
“पवार संस्कारित” माणसे मुकाटपणे कापताहेत सत्तेच्या सुमडीत कोंबड्या; “ठाकरे संस्कारित” माणसे काढताहेत एकमेकांच्या चड्ड्या!! हे महाराष्ट्रातल्या राजकारणाचे आजचे चित्र आहे.
मोदी + पवार गुळपीठावर मराठी साहित्यिकांची आणि संमेलन संयोजकांची तोंडे शिवली, पण त्यांनी शिंदे + गोऱ्हेंवर टीकेची तोफ डागली.
दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी रेखा गुप्ता यांची निवड करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा मीडियाला “सरप्राईज” दिले तर भाजप मधल्या अनेकांना ते “धक्कातंत्र” वाटले. मीडियाने रेसमध्ये ठेवलेल्या नावांपैकी मोदींनी सगळ्यात वरचा नव्हे, तर खालचा चॉईस निवडला.
USAID ते कुदळवाडी; सेम पॅटर्नची रडारडी!! हे शीर्षक वाचून कदाचित “कन्फ्युज्ड” झाल्यासारखे वाटेल. USAID अर्थात अमेरिकेची मदत आणि कुदळवाडी यांचा संबंध काय??, तो कशासाठी जोडलाय??, असे सवाल अनेकांना पडतील. अनेकांना हा संबंध बादरायणी देखील वाटेल. पण तो तसा नाही याचा खुलासा पुढे वाचल्याबरोबर होईल.
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन सुरू झाल्यानंतर अवघ्या दीड महिन्याच्या आत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेला भेट देऊन डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरच त्यांच्या प्रशासनाशी आणि अमेरिकन उद्योगपतींशी चर्चा केली
काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर मोठ्या प्रमाणावर बदल करून महाराष्ट्रात हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्या पाठोपाठ केंद्रीय पातळीवर देखील मोठे फेरबदल केले.
कुठल्याही आणि कशाही मार्गाने भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसण्यासाठी “पवार संस्कारित” नेत्यांची धडपड चालली असताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) अध्यक्ष शरद पवार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राजकीय डाव टाकले.
उद्धव ठाकरे हे शरद पवारांच्या नादी लागले, अडीच वर्षांत घरी गेले; मग एकनाथ शिंदे काय करतील आणि त्यांचे काय होईल??, असा सवाल शिंदेंच्या सत्कारानंतर समोर आला.
लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींची इमेज अवघ्या ९ महिन्यांमध्ये घटली. काँग्रेसच्या परफॉर्मन्सला साजेशी देखील नाही उरली!!
दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीचा पराभव झाला. भाजप 27 वर्षांनी दिल्लीच्या गादीवर परतली आणि काँग्रेसला शून्य भोपळा मिळाला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीचा दारूण पराभव झाला. या पराभवासाठी Indi आघाडीतल्या बेबनावाची वेगवेगळी कारणे सांगितली जात असली
EVM आणि मतदार याद्या या खोट्या मुद्द्यांवरून राहुल गांधींनी धोपटली भुई, जनता काँग्रेसच्या हातात 0 भोपळा देई!!, अशी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसची अवस्था झाली.
वर्षानुवर्षे कब्जा करून बसलेल्या शरद पवारांच्या वर्चस्वाला महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेत खीळ बसली, हेच खरे महाराष्ट्र केसरीच्या वादाचे मूळ असल्याचे आता उघड्यावर आले आहे.
वित्तीय तूट खाली खेचण्याची कसरत, तरीही मोदी सरकारचा सवलतींचा वर्षाव भरघोस!!, असेच केंद्रातल्या मोदी सरकारने मांडलेल्या आजच्या 2025 26 च्या अर्थसंकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य मानावे लागेल.
इंदिरा गांधींच्या काळात सर्व समावेशक धोरण अवलंबलेल्या काँग्रेसने 1990 नंतरच्या काळात चुकीची धोरणे अवलंबल्याने दलित, आदिवासी, अतिपिछडे आणि अल्पसंख्यांक काँग्रेस पासून दूर गेले, या चुका जर सुधारल्या, तर हे सगळे वर्ग काँग्रेसच्या पाठीशी पुन्हा उभे राहतील
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App