मुंबईसह महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था एखाद्या लटकत्या खेळण्यासारखी झाली. काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला वंचित बहुजन आघाडीच्या पेक्षा सहा पट कमी लेखले.
महाराष्ट्रात फार मोठा राजकीय संगर होऊन ठाकरे बंधू ठरले लढवय्ये; पण शरद पवार ठरले पुतण्या पुढे शरणागत!!, हेच राजकीय वास्तव चित्र 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने आज समोर आले.
मुंबई, पुणे, नाशिक यांच्यासह बहुतेक महापालिका निवडणुकांमध्ये शरद पवारांच्या पक्षाचे कुठल्याही पक्षात विलीनीकरण झाले नाही, तर त्यांनी स्व हस्ते पक्षाची वाताहत करून घेतली. यशवंतराव चव्हाण यांनी दिग्गज नेत्या पंतप्रधान इंदिरा गांधींपुढे शरणागती पत्करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता
मुंबईत “ठाकरे राजा” उदार झाला; शरद पवारांच्या पक्षाला 10 जागा दिल्या!!, ही महत्त्वाची राजकीय घडामोड आज मुंबईत सायंकाळी घडली.
मुंबईत काँग्रेसची खेळी; वंचित बहुजन आघाडीला ठरविली शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पेक्षा सहा पट भारी!!, हे राजकीय वास्तव आज समोर आले.
शरद पवारांच्या बारामतीत गौतम अदानींचा कार्यक्रम झाला. त्यांनी दिलेल्या 25 कोटी रुपयांच्या देणगीतून विद्या प्रतिष्ठानने शरद पवार सेंटर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स उभारले.
एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण स्वतःच्या बोटावर फिरवण्याचा दावा करणारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अवस्था महापालिका निवडणुकीत एवढी बिकट झाली की पवारांच्या तुतारीला कुणीच कुठे विचारेना, महापालिकांच्या राजकारणात त्यांचा पक्ष फिट बसेना, अशी अवस्था येऊन ठेपली.
गाढव गेले आणि ब्रह्मचर्य ही गेले; पुतण्याच्या आवाजामुळे काकांचा आवाज दबला; घड्याळाच्या टिकटिकीपुढे तुतारीचा आवाज पिचकला!!,
भाजपची खेळी; पवार काका – पुतण्यांची युती सहज नाही सोपी; पुण्यात दोघांची जागावाटपात खेचाखेची!!, हे राजकीय चित्र पुणे महापालिका निवडणुकीच्या ऐन मध्यावर आज समोर आले
महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू ठामपणे एकत्र एकत्र आल्यानंतर त्यांच्या पक्षांच्या वाट्यात खोडा घालायचा डाव पवार काका – पुतण्यांनी खेळलाय.
महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुका ऐन मध्यावर आल्या असताना बारामतीत गौतम अदानींचा कार्यक्रम; भाजपच्या सत्तेशी जवळीक साधून पवारांची राज्यसभेसाठी धडपड!!, हेच राजकीय वास्तव समोर आलेय.
भाजप आणि दोन्ही पवारांनी चालविलेल्या वेगवेगळ्या बेरजेच्या राजकारणात कार्यकर्त्यांच्या वजाबाकीचा धोका उद्भवला, इतकेच नाहीतर मतदारांना गृहीत धरल्याचा फटका सुद्धा बसू शकतो, याची शक्यता वाढल्याच्या खुणा आज दिसल्या.
ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर नाशिक फार मोठे राजकीय नाट्य घडले. शिवसेना आणि मनसेच्या दोन माजी महापौरांनी काल मोठा जल्लोष केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ठाकरे म्हणजे मुंबई नाहीत; पण 22 वर्षांच्या मुलीने दाखवून दिले, पवार म्हणजे बारामती नाहीत!!, हे राजकीय वास्तव देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियेच्या पार्श्वभूमीवर समोर आले.
नाशिक : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित अशी ठाकरे बंधूंची युती आज जाहीर झाली, पण दोघांनीही जागावाटपाचा सस्पेन्स कायम ठेवला. युती जाहीर करण्यापूर्वी उद्धव ठाकरे मातोश्रीतून निघून राज […]
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी हे दोन पक्ष आघाडी करण्याची शक्यता बळावली असतानाच मराठी माध्यमांनी शरद पवार सत्तेत सामील व्हायची हवा करत आहेत, अशा दावा करणाऱ्या बातम्या दिल्या त्यासाठी वेगवेगळी आणि भली मोठी कारणे सुद्धा दिली.
शरद पवारांनी जे आयुष्यभर पुढचे मागचे खालचे वरचे राजकारण केले, त्याची फलश्रुती पवारांच्या राजकारणाच्या बालेकिल्ल्यांमध्येच दिसून आली. नाशिकमध्ये राष्ट्रवादीची भाजप मागे फरफट झाली, तर पुण्यामध्ये काका पुतणे एकत्र येऊन सुद्धा त्यांना काँग्रेसची गरज निर्माण झाली.
अजित पवार पुण्यात चक्क महाविकास आघाडी बरोबर जाणार. पवार काका – पुतणे काँग्रेसला बरोबर घेऊन एकत्र निवडणूक लढविणार, अशा बातम्या देऊन मराठी माध्यमांनी पुणे महापालिकेच्या निवडणुकीचे राजकीय उत्सुकता वाढवून ठेवली.
शरद पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना भाजपच्या मूळच्या कार्यकर्त्यांचा अचानक पुळका आला. पण त्यांना स्वतःच्याच पक्षात कार्यकर्ते टिकवता येईना!!, अशी राजकीय परिस्थिती पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये उद्भवली.
महायुतीमध्ये भाजपने एकाकी पाडलेल्या अजितदादांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडला दोन डगरींवर पाय ठेवायचे प्रयत्न चालवलेत खरे, पण यामुळेच ते घसरून पडणार नाहीत याची गॅरंटी कोण देणार??, असा सवाल तयार झालाय.
महाराष्ट्रातील नगर परिषद, नगर पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल केवळ स्थानिक राजकारणापुरते मर्यादित न राहता, राज्यातील एकूण राजकीय दिशादर्शक ठरले आहेत.
महाराष्ट्रातल्या नगरपालिका, नगरपंचायतीचे निकाल लागल्यानंतर कुणी कुठे बाजी मारली, याची वर्णने करताना मराठी माध्यमांनी पुणे जिल्ह्यात अजितदादांचा जलवा 17 पैकी 10 नगरपरिषद मध्ये राष्ट्रवादीचा झेंडा!!, असे वर्णन केले.
महाराष्ट्राच्या नगरपालिका, नगरपरिषदेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कष्ट केले, तर काय होते, हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवून दिले. एकनाथ शिंदे यांनी या निवडणुकांमध्ये जे मोठे यश मिळवले, 54 नगराध्यक्ष निवडून आणले
शरद पवारांच्या घराणेशाहीतल्या दोन तरुण शिलेदार यांचे कथित बालेकिल्ले त्यांच्या गावांमधल्या मतदारांनी उद्ध्वस्त केले.
दिल्लीतून महाराष्ट्रात आपल्या स्वार्थाचे राजकारण साधू पाहणाऱ्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना गल्लीत मात्र मतदारांनी जोरदार धक्का दिला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांना आपापल्या नगरपरिषदेतली सत्ता सुद्धा राखता आली नाही.
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App