V of day

मोढेराच्या सूर्यमंदिराचा अप्रतिम देखावा; मोदींनी व्हिडिओ केला शेअर गुजरातमधील प्राचीन मोढेरा सूर्य मंदिराचा पावसाळ्यातील अप्रतिम देखाव्याचा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केला आहे. मेहसाणा जिल्ह्यातील पाटणपासून ३० किलोमीटर अंतरावर मोढेरा येथे १० व्या शतकात सोळंकी वंशाचे महाराज भीमदेव यांनी बांधले. सध्या भारतीय पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात असलेले हे मंदिर पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे पर्यटनासह सर्व व्यवसायांना मंदीचे वातावरण सहन करावे लागत आहे. पण लवकरच अपेक्षित असलेल्या अनलॉकच्या पार्श्वभूमीवर मोदींनी शेअर केलेला हा व्हिडिओ पर्यटनासाठी एक सकारात्मक संदेश घेऊन येईल, असे मानले जात आहे.

आयआयटी मुंबईमध्ये व्हर्चुअल दीक्षांत समारंभ; जगासाठी नवाचार  आयआयटी मुंबईत कोरोना महामारीच्या संकटात व्हर्चुअल आणि डिजिटल अवतारात दीक्षांत समारंभ संपन्न झाला. यात स्नातक, सन्माननीय पाहुणे सोशल डिस्टंसिंग न पाळता सहभागी झाले खरे, पण ते डिजिटली. मुंबई आयआयटी मध्ये गेल्या वर्षीच्या पदवीदान समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना नव्या युगासाठी नवीन आचारपद्धती विकसित करण्याचे आवाहन केले होते. यंदा त्याच नवीन आचारपद्धतीचे नवे रूप दीक्षांत समारंभात पाहायला मिळाले. पाहुण्यांपासून स्नातकांपर्यंत सर्वजण व्हर्चुअली आणि डिजीटली या अनोख्या समारंभात सहभागी झाले.