विज्ञानाची गुपिते : रक्ताचे नेमके काय काम असते, पदार्थाचे वहन करते रक्त

रक्ताची महत्व सर्वांनाच माहिती असते. पण रक्ताचे नेमके काय काम असते. शरीरात रक्त काशाप्रकारे योगदान देते याची फारशी कोणाला माहिती नसते. शरीरात निरनिराळया पदार्थांची ने-आण करणे हे काम रक्तामार्फत होते याची अनेकांना खबरबात नसते. रक्ताची आणखीही काही कामे आहेत. शरीरात आलेल्या रोगजंतूंचा प्रतिकार करणे, शरीराचे तापमान सर्वत्र समान व कायम राखणे वगैरे. शरीरातील रक्ताचे काम इतके महत्त्वाचे आहे, की अपघातात जास्त रक्तस्राव झाला तर मृत्यू येऊ शकतो. What exactly is the function of blood, blood carries matter

रक्तदानाबद्दलही आपण ऐकले आहे. रक्तातला बराच भाग पाण्याचा असतो. याशिवाय रक्तामध्ये तीन प्रकारच्या पेशी व प्रथिने असतात. तसेच ने-आण होणा-या काही पदार्थाचे ठरावीक प्रमाण असते. उदा. प्राणवायू, कार्बवायू, युरीया, साखर वगैरे. रक्तातल्या तांबडया पेशी आणि पांढ-या पेशी वेगवेगळी कामे करतात. तांबडया पेशींमध्ये लोहयुक्त हिमोग्लोबिन (रक्तद्रव्य) असते ते प्राणवायू व कार्बवायू वाहून नेण्याचे काम करते. या रक्तद्रव्याचे प्रमाण दर 100 मि.ली. मध्ये सुमारे 15 ग्रॅम इतके असावे. ते जर कमी असेल तर रक्ताची प्राणवायू नेण्याची क्षमता दुबळी होते. आपल्या देशामध्ये कुपोषणामुळे रक्तद्रव्याचे हे प्रमाण फार कमी आढळते.

पांढ-या पेशींचे काम म्हणजे रोगजंतूंचा प्रतिकार करणे. यातही पाच प्रकार असतात. रोगजंतू पकडणे, नष्ट करणे, रोगजंतूंबद्दल माहिती घेऊन प्रतिकारशक्ती तयार करणे, जखम झाल्यास भरुन काढणे, रक्तस्राव थांबवणे अशी अनेक कामे पांढ-या पेशी करतात.आपल्या शरीरातील पोकळ हाडे (उदा. हातापायातली हाडे) व प्लीहा या रक्तपेशी तयार होण्याच्या जागा आहेत. बाकीचे घटक यकृत, पांथरी व इतर काही रसग्रंथी यांमध्ये तयार होतात. रक्ताच्या तपासणीत मुख्यतः रक्तद्रव्यांचे प्रमाण आणि पेशींचे प्रमाण तपासले जाते. प्रौढांच्या शरीरात एकूण रक्त सुमारे पाच लिटर असते. रक्तदान करताना यातले सुमारे 250 मि.लि. रक्त काढून घेतात आणि ते लवकर भरून येते.

What exactly is the function of blood, blood carries matter

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात