राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेची समाप्ती मुंबईतल्या शिवाजी पार्कवर होत असताना तिथे INDI आघाडीतल्या घटक पक्षांचे वेगवेगळे नेते हजर राहणार आहेत त्यामुळे तिथे कोलकत्यातल्या 2019 च्या फोटोशूटचे “तोकडे” “लघूरुप” (thumbnail) दिसेल, पण त्यामुळे 2024 चा निकाल काय लागेल??, हा सवाल तयार झाला आहे. Unlike photoshoot of 2019, opposition will fragment in 2024 again
नेमके काय झाले होते 2019 मध्ये??, कोलकत्यातले फोटोशूट काय सांगत होते?? त्याचा थोडा विचार केला आणि त्याची तुलना मुंबईतल्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या आजच्या फोटोशूटशी केली, तर 2024 चा निकाल काय लागेल??, याची थोडी तरी चुणूक आपल्याला बघायला मिळेल.
2019 मध्ये कोलकत्यात त्यावेळच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पुढाकाराने त्या वेळच्या “यूपीए” आघाडीची महारॅली झाली होती. त्या रॅलीतले फोटोशूट त्यावेळी प्रचंड गाजले होते. कारण त्या फोटोशूट मध्ये सोनिया गांधी +मायावती + ममता बॅनर्जी यांच्या सकट सगळे नेते हात उंचावत जनतेला सामोरे गेले होते. त्या हात उंचावण्याचे फोटो सगळीकडे व्हायरल झाले होते. त्यामुळे केंद्रातल्या मोदी सरकार विरुद्ध विरोधकांची प्रचंड मोठी एकजूट झाल्याचा आभास निर्माण करता आला होता. त्या फोटोशूट मध्ये शरद पवार होते, पण उद्धव ठाकरे नव्हते.
परंतु ते काही असले तरी 2019 चे ते फोटोशूट कोलकत्याच्या स्टेजवरच राहिले. फोटो पेपरांमध्ये छापून आले. लोकांच्या मोबाईलवर सेव्ह झाले, पण त्या फोटोशूट मधले नेते त्याचवेळी जे विखुरले, ते अजून एकवटले नाहीत. ते कायमचे विखरूनच गेले!!
आज मुंबईत होणाऱ्या राहुल गांधींच्या रॅलीमध्ये त्या फोटोशूट मधले सोनिया गांधी + मायावती + ममता बॅनर्जी हे नेते दिसणारच नाहीयेत, कारण ते नेते मुंबईत आलेलेच नाहीत. ममता बॅनर्जी आणि मायावतींनी काँग्रेसशी कायमचीच फारकत घेतली आहे. सोनिया गांधी जरी काँग्रेसच्या नेत्या असल्या, तरी त्या आजच्या महारॅलीचे प्रमुख आकर्षण नाहीत. त्यामुळे त्या मुंबईतच आलेल्या नाहीत. आजच्या फोटोशूट मध्ये शिवाजी पार्कवर दिसणार आहेत ते नेते असतील, राहुल गांधी + प्रियांका गांधी + शरद पवार + उद्धव ठाकरे एम. के. स्टालिन + अखिलेश यादव + संजय राऊत वगैरे वगैरे!! त्यापलीकडे फोटोशूट मध्ये एखादा बडा नेता असणार नाही. जे नेते असतील, ते महाराष्ट्रातले स्थानिक काँग्रेसचे नेते किंवा इकडून तिकडून आलेले बाकीचे काँग्रेसचे नेते.
ही स्थिती पाहून 2019 आणि 2024 च्या फोटोशूटची जरी नेमकी तुलना केली, तरी 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागेल?? हे सांगण्यासाठी फार मोठ्या भविष्यवेत्याची गरज नाही. 2019 मध्ये निदान हात हलवण्यापुरते तरी विरोधक एकत्र आले होते. त्यांची एकजूट मोठ्या स्टेजवर दिसून तिचा आभास देशभर पसरला होता. मुंबईतल्या फोटोशूट मधून तसा आभास देखील देशभर पसरण्याची शक्यता नाही. उलट उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींपुढे शरणागती पत्करल्याचे नॅरेटिव्ह भाजपला या निमित्ताने पसरवता येणार आहे. त्याची चुणूक भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या ट्विट मधूनच दिसून आली आहे.
उद्धव ठाकरे आज राहुल गांधी पुढे शरणागती पत्करणार का??, असा सवाल करणारे दीर्घ ट्विट बावनकुळे यांनी आपल्या ट्विटर हँडल वर केले. त्यात बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ शेअर केला. मी माझ्या शिवसेनेची कधीच काँग्रेस होऊ देणार नाही. शिवसेनेची काँग्रेस झाल्याचे दिसले, तर मी माझे दुकान बंद करीन, असे बाळासाहेब म्हणाले होते. तो व्हिडिओ शेअर करून बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना डिवचले आहे.
उद्धव ठाकरे जेव्हा राहुल गांधींसमावेत शिवाजी पार्कच्या स्टेजवर येऊन फोटोशूट साठी हात हलवतील, तेव्हा बावनकुळे यांच्या आजच्या ट्विटवर शिक्कामोर्तब झालेले दिसेल. त्यामुळे भाजपला आधीच सेट केलेला नॅरेटिव्ह पसरवायला जास्त मदत होईल. त्यामुळे आजच्या फोटोशूटची 2019 च्या फोटोशूटशी तुलना केली, तर 2024 चा फोटो “तोकडा” असल्याचे दिसेल, पण त्या पलीकडे जाऊन राहुल गांधी + उद्धव ठाकरे एकत्र दिसल्याने भाजपच्या नॅरेटिव्हला बळकटी मिळेल. या पलीकडे काही होणार नाही. त्यातून INDI आघाडीचा झालाच, तर तोटाच होईल. फायदा होण्याची सुताराम शक्यता नाही!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App