नाशिक : Uddhav thackeray महाविकास आघाडीच्या दमछाक करणाऱ्या वाटाघाटींमध्ये शरद पवारांनी काँग्रेसला 85 च्या खोड्यात अडकवल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी भरपूर दिल्या. शिवसेना आणि काँग्रेस यांच्या वादात पवारांनी स्वतःचा फायदा कसा करून घेतला, याची बहारदार वर्णन केली. परंतु तरीदेखील प्रत्यक्षात जागावाटपाच्या वाटाघाटींमध्ये पवारांपेक्षा काँग्रेसला ठाकरेच “जड” गेले, कारण काँग्रेसला माहिती आहे की, पवारांनी कितीही उड्या मारल्या तरी त्या काँग्रेसी कुंपणातच पडतील!!
पवारांचे राजकीय उपद्रव मूल्य जास्त आहे. पण त्यापेक्षा निवडून आणण्याची क्षमता फारच कमी आहे. त्याचबरोबर पवार चोरून मारूनच भाजपला मदत करू शकतील. उघडपणे ते भाजपा बरोबर जाऊ शकणार नाहीत आणि तसे ते गेले, तर भाजपला जरी ते हवे असले, तरी पवार मात्र कायमचे तोट्यात जातील. शिवाय अजितदादांसारख्या सहकार्याला भाजपला गमवावे लागेल. या सगळ्या पवारांच्या “मर्यादा” काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांना निश्चित माहिती आहेत. त्यामुळे पवारांची वाटाघाटींची क्षमता आणि उपद्रव मूल्य कसे “मॅनेज” करायचे किंबहुना शेवटच्या क्षणी पवारांना कसे वागवायचे, यामध्ये काँग्रेसचे केंद्रीय नेते माहीर आहेत. Uddhav thackeray
Congress काँग्रेसच्या यादीत राहुल गांधींनी घातले लक्ष, 100 पेक्षा कमी नाहीच, ठरवले लक्ष्य!!
पण उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत तसे नाही. उद्धव ठाकरेंना मूळात काँग्रेसी कुंपणाची मर्यादाच नाही. काँग्रेस किंवा पवारांनी आपले म्हणणे मान्य केले नाही, तर केव्हाही ते कुंपण ओलांडून पलीकडे जाऊ शकतात. किंवा स्वस्थ तरी बसू शकतात, पण त्यामुळे आपली निर्णायक क्षणी अडचण होईल याची जाणीव काँग्रेस नेत्यांना झाल्यावर त्यांचे मातोश्री वरचे हेलपाटे वाढले. कारण दुसरा पर्याय नव्हता.Uddhav thackeray
एकीकडे उद्धव ठाकरेंनी आपले जवळपास सगळे उमेदवार जाहीर केले असताना बाळासाहेब थोरात दोन वेळा मातोश्रीवर गेले. नंतर ते पवारांना पण भेटले, पण काँग्रेसला मातोश्रीचा जेवढा धाक आहे किंवा भीती वाटते, तेवढी पवारांची भीती काँग्रेसवाले बाळगत नाहीत. कारण काँग्रेसच्या सत्तेचा मुख्यमंत्रीपदाचा किंवा सत्तेच्या वाट्याला मार्ग सिल्वर ओक पेक्षा मातोश्रीतूनच बाहेर पडतो, हे काँग्रेस नेत्यांना आता पक्के माहिती झाले आहे.
“सिल्वर ओक” फारतर काँग्रेसच्या सत्तेच्या वाट्यात काड्या घालेल, तो वाटा कमी जास्त करू शकेल, पण काँग्रेसला पूर्णपणे सत्तेबाहेर ठेवणे हे “सिल्वर ओक”ला शक्य नाही, पण उद्धव ठाकरेंनी चिडून जर काही विपरीत निर्णय घेतला आणि ते काँग्रेसी कुंपण ओलांडून बाहेर पडले, तर मात्र काँग्रेस आणि पवार दोघेही सत्तेपासून वंचित राहतील, ही महाराष्ट्रातील वस्तुस्थिती काँग्रेस नेत्यांना माहिती आहे म्हणून “मातोश्री”वरचे हेलपाटे त्यांनी वाढविले आहेत. पवारांपेक्षा “जड” जाणारे ठाकरे काँग्रेस नेते सहन करत आहेत!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App