अख्ख्या महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना एकापाठोपाठ एक उघड्यावर येत असताना कायदा – सुव्यवस्थेचे धिंडवडे उडालेत आणि धोतर पेटणे, थोबाड फोडणे, कोथळा काढणे ही भाषा मात्र जोरात बोलली जात आहे…!! भाषा बोलणारे दोन्ही पक्षही हिंदुत्ववादी आहेत आणि महाराष्ट्रातल्या कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी ज्या पक्षाच्या गृहमंत्र्यांवर आहे त्या पक्षाचे अध्यक्ष आणि गृहमंत्री “वेगळ्याच उद्योगात” मग्न आहेत. किंबहुना बऱ्याच गोष्टी करून सावरून नामानिराळे होत आहेत. मुंबई, पुणे, डोंबिवली, नाशिक आणि आता महाबळेश्वर इथल्या बलात्काराच्या घटना मनाला सुन्न करताहेत आणि त्यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील मूग गिळून गप्प बसले आहेत. उलट शिवसेना आणि भाजपचे दुसऱ्या-तिसऱ्या फळीतले नेते एकमेकांवर वार – प्रहार करत सुटले आहेत. हा दोन्ही पक्षांच्या नेत्यांचा टोकाला गेलेला अहंकार आणि बौद्धिक दिवाळखोरी आहे. To burn the dhoti, to blow the thobad; Dhindwade of law and order … !!; Maharashtra’s Home Minister, however, swallowed the green … !!
महाराष्ट्राचे काय बारा वाजायचे ते वाजोत पण दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये उभी आणि कायमची फूट पाडायची हा तर “दहा वाजून दहा मिनिटांचे घड्याळ” चालविणार्या बाबांचा डाव आहे. हे दोन्ही आक्रस्ताळ्या हिंदुत्ववादी पक्षांना समजत नाही काय…??
महाराष्ट्रातल्या बलात्काराच्या घटनांवरून भाजपचे नेते शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांवर तोंडसुख घेत आहेत आणि भाजपच्या बोरिवलीच्या महिला नगरसेविका नगरसेविकेच्या कार्यालयात झालेल्या कथित अत्याचाराच्या प्रकरणावरून मुंबईच्या शिवसेनेच्या महापौर किशोरी पेडणेकर भाजप नेत्यांवर तोंडसुख घेत आहेत. पण या सगळ्यांमध्ये महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्यांवर मात्र या दोन्ही हिंदुत्ववादी पक्षांचे दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले नेते चकार शब्द काढायला तयार नाहीत. यावरून त्यांची राजकीय बौद्धिक कुवत लक्षात येते. जिथे दोन हिंदुत्ववादी पक्षांच्या प्रमुख नेत्यांचीच राजकीय बुद्धी नाठली आहे, तिथे दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतल्या नेत्यांना बोल लावण्यात तरी काय मतलब आहे??
राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी आधी नेमलेले गृहमंत्री अनिल देशमुख शंभर कोटीच्या खंडणी प्रकरणात गायब आहेत. ते कुठे गेलेत त्याचा कोणालाच पत्ता नाही. ते गृहमंत्रीपदी असताना मोठ्या राणा भीमदेवी थाटात पोलिसांच्या काठ्यांना तेल लावून ठेवायला सांगत होते. तेव्हा मराठी माध्यमे आनंदाने उसळून रिपोर्टिंग करत होती, पण आता ते पळून गेल्यानंतर त्यांच्या तोंडाला बूच बसले आहे. आता त्यांना कुठल्या “पॉवरफुल खेळी”ची आठवण होत नाही. “पॉवरफूल खेळी” करणाऱ्या नेत्यांना मुलाखतीत ते पळून गेलेल्या गृहमंत्र्यांवर प्रश्न विचारत नाहीत. आणि इकडे राष्ट्रवादीच्या विद्यमान गृहमंत्र्यांना सळो-की-पळो करायचे सोडून आणि त्यांना तोंडावर आपटण्याचे सोडून दोन हिंदुत्ववादी पक्षांचे नेते एकमेकांवर तुटून पडलेत, हे हिंदुत्ववादी मतदारांचे खरे दुर्दैव आहे…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App