ओझोन घटकांचे मुख्य कार्य म्हणजे ते सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांपासून आपला बचाव करतात. ओझोनच्या थरामधे ऑक्सिजन वायू दोन अवस्थांमधे उपस्थित असतो. ९९ टक्के अतिनील किरणांना पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहचण्यापासून हे थर परावृत्त करते. अतिनील किरणे तीन प्रकारांमध्ये विभागलेली आहेत. कमी तरंगलांबी असलेले किरणे सर्वात जास्त हानिकारक असतात. परंतु ओझोन थरामुळे ही किरणे पृथ्वीपर्यंत पोहोचू शकत नाहीत. मध्यम तरंग लांबीची किरणे जैविकदृष्ट्या सक्रिय असतात. पण आपल्या त्वचेच्या आरपार ती जाऊ शकत नाही. The secret of science: how high above the earth is the ozone layer, why is this ozone layer so important?
सौम्य प्रमाणात त्वचेचा रंग बदलण्यास ही किरणे कारणीभूत असतात. या किरणांमुळे अकाली वृद्धत्व आणि त्वचेच्या कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात. ओझोन थराला छेदून जी काही अतिनील किरणे पृथ्वीच्या भुपृष्ठापर्यंत पोहोचतात त्यापैकी ९५ टक्के किरणे ही जास्त तरंग लांबी असलेल्या या प्रकारात मोडतात. ही किरणे आपल्या त्वचेच्या खोलवर शिरून तीव्र आघात करतात. ज्यामुळे मोतीबिंदु, त्वचा जळणे, सुरकुत्या पडणे यासारखे परिणाम होतात.
पर्यावरणाचा विचार केला असता, ओझोन थर नष्ट झाल्यास त्याचा परिणाम झाडांच्या वाढीवर होईलच, तसेच आहेत ती झाडे देखील जळून जातील. हा सिद्धांत पिके आणि कृषी उत्पन्नाला देखील लागू होतो. या सगळ्याचा सरळ संबंध अर्थ व्यवस्थेसोबत जोडता येईल. ओझोनचा थर पृथ्वीच्या वातावरणातला अत्यंत महत्वाचा घटक आहे. भूपृष्ठापासून पासून साधारण ९ ते २२ मैल उंचीवर स्थितांबर मध्ये ओझोनचा थर आढळून येतो. ओझोन थर एकाएकी गायब होणार नाही, ही एक टप्प्याटप्प्याने होणारी प्रक्रिया आहे. ज्याचे मुख्य कारण आहे कार्बन उत्सर्जन आणि वायू प्रदूषण. जोपर्यंत संपूर्ण थर गायब होईल तोपर्यंत बहुतांश जीवसृष्टी नष्ट झालेली असेल. तिथून पुढे एक वर्ष जर ओझोन थराविना पकडले तर पृथ्वी कदाचित वास्तव्यासाठी योग्य राहणार नाही. आणि ओझोन थर पूर्ववत होण्यासाठी अनेक दशकांचा किंवा शतकांचा काळ लागेल. हा संपूर्ण कालावधी बहुदा मानवजातीला समुळ नष्ट करण्यास पुरेसा असेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App