Sharad Pawar and Ajit Pawar दिन दिन दिवाळी, “निवडणूक” ओवाळी; काका – पुतण्यांनी बाहेर काढली राष्ट्रवादीची अंडी पिल्ली!!


नाशिक : दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, अशा गीत पंक्ती आहेत, पण आता त्याचे रूपांतर दिन दिन दिवाळी, “निवडणूक” ओवाळी; काका – पुतण्या काढू लागले राष्ट्रवादीची अंडी पिल्ली!! असे झाले. कारण काका – पुतण्यांनी आज वेगवेगळ्या ठिकाणी खरंच राष्ट्रवादीची जुनी अंडी पिल्ली स्वतःच्याच भाषणांमधून बाहेर काढली. Sharad pawar and ajit pawar uncle – nephew mudslinging

युगेंद्र पवारांच्या बारामतीतल्या जाहीर सभेत शरद पवारांनी अजित पवारांच्या रडण्याची नक्कल केली. त्यावेळी त्यांच्या समर्थकांनी टाळ्या आणि शिट्ट्यांचा गजर केला, पण त्यापलीकडे जाऊन पवारांनी अजितदादांची सगळी जुनी अंडी पिल्ली बाहेर काढली.

शरद पवार म्हणाले :

ते घर फोडलं म्हणतात, पण कोणी घर फोडलं?? मला कोणाचं घर फोडायचं मला कधी शिकवलं नाही. उलट माझ्या सगळ्या भावांचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता. सगळे भाऊ घरातला कारभार आणि शेती बघायचे आणि मी राजकारण करत गावभर फिरायचो. मी देशभर गेलो. ते तुमच्या सगळ्यांच्या आणि माझ्या भावांच्या आशीर्वादामुळे.

पण आता पाहतोय तर ते वेगळेचं बोलतायत. मी कधी कोणावर अन्याय केला नाही. अजितदादांना चार – चार वेळा उपमुख्यमंत्री केलं. सुप्रियाला कुठलं पद दिलं नाही. तिनेही मागितलं नाही. पण यांनी काय केलं?? मला कोर्टात उभं केलं. त्यांच्या मुलानं खटला दाखल केला. मी स्थापन केलेला पक्ष माझ्याकडूनच काढून घेतला. चिन्ह काढून घेतलं. माझ्या आयुष्यात कधी कोणी मला कोर्टात उभं केलं नव्हतं, पण त्यांच्या मुलानं मला कोर्टात उभं केलं.

बारामतीत आता अलीकडे ऐकतोय, मलिदा गॅंग फिरती आहे. ती कुणाची गॅंग आहे??, कोण तिला चालवतोय??, हे सगळं बारामतीकरांना माहिती आहे. पण आम्ही या मलिदा गॅंगचा बंदोबस्त करू.


Karnataka government ‘कर्नाटक सरकार लँड जिहाद करतंय’, भाजपचा आरोप


 आबांवर अजितदारांचे आरोप

तिकडे तासगावात अजितदादांनी राष्ट्रवादीची जुनी अंडी पिल्ली बाहेर काढली. सिंचनावरचा 1960 पासूनचा सगळा खर्च 42000 कोटी रुपयांचा असताना माझ्यावर 70000 कोटींचे आरोप केले आणि त्याची स्वतंत्र फाईल तयार झाल्यावर त्या फायलीवर गृहमंत्री म्हणून आर. आर. आबांनी सही केली. केसांनी माझा गळा कापला, असा आरोप अजितदादांनी तासगावात केला. अजितदादांच्या नव्या आरोपामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली.

त्यावेळचा घटनाक्रमच अजितदादांनी भाषणात सांगितला. आम्हीच आबांना गृहमंत्री केले. त्यांना पाहिजे होते ते खाते दिले, पण ज्यावेळी सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला, 1960 पासून सिंचनावरचा खर्च 42000 कोटी रुपये होता, पण आरोप 70000 कोटींचा केला. त्यावेळी गृहमंत्री म्हणून आर. आर. आबांनीच त्या फायलीवर अजित पवारांची ओपन इन्क्वायरी करावी म्हणून सही केली, पण त्यावेळी पृथ्वीराज बाबांचा पाठिंबा राष्ट्रवादीने काढून घेतला. त्यामुळे सरकार गेलं. राष्ट्रपती राजवट आली. त्या वेळच्या राज्यपालांनी त्या फाईलवर सही केली नाही. लोकशाहीत नवा येणारा मुख्यमंत्री त्या फाईलवर निर्णय घेईल, असे ते म्हणाले.

2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं. त्यांच्याकडे ती फाईल सहीला गेली. मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी त्या फाईलवर सही केली, पण त्यावेळी मला घरी बोलावलं आणि दाखवलं, तुमची ओपन इन्क्वायरी करावी, हे गृहमंत्री म्हणून आर. आर. आबांनीच फाईलवर सही करून ठेवली आहे. आणि खरंच त्या फाईलवर आबांचीच सही होती. हा केसानं गळा कापण्याचा प्रकार आबांनी केला होता, असा आरोप अजितदादांनी केला. आबांच्या तंबाखूचे किस्सेही त्यांनी रंगवून सांगितले.

पण या सगळ्यांमध्ये बारामती आणि तासगाव मधून राष्ट्रवादीची सगळी जुनी अंडी पिल्ली काका – पुतण्यांनी स्वतःच्या तोंडून बाहेर काढली. राष्ट्रवादीने सिंचन घोटाळा कसा केला, एकमेकांना अडकवण्यासाठी आणि एकमेकांचे पाय कापण्यासाठी त्या घोटाळ्याचा वापर कसा केला, त्याचबरोबर बारामती सारख्या विकासाची टिमकी वाजवणाऱ्या शहरात मलिदा गॅंग कशी वाढली, याच्या रसभरीत कहाण्या आणि राष्ट्रवादीची सगळी अंडी पिल्ली पवार काका – पुतण्यांच्याच तोंडून बाहेर आली. काका – पुतण्यांनी त्यासाठी दिवाळीचा मुहूर्त गाठला!!

Sharad Pawar and Ajit Pawar uncle – nephew mudslinging

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात