मोदींना हटवून म्हणे फडणवीसांना पंतप्रधान व्हायचे होते, राऊतांचा “जावईशोध”; पण मोदी – फडणवीस ही काय नरसिंह राव – पवार जोडी आहे का??

Sanjay Raut claimed, fadnavis wanted remove Modi to become PM

आयजीच्या जीवावर बाईजी उदार, सासूच्या बळावर जावई सुभेदार!!, असले सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे राजकारण सुरू आहे. देवेंद्र फडणवीस म्हणे, आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करून केंद्रात मंत्री व्हायला चालले होते. इतकेच नाही तर ते मोदींना बाजूला सारून पंतप्रधान व्हायचा मनसूबा राखून होते, “जावईशोध” संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात लावून मोठी खळबळ उडवून दिली आहे. Sanjay Raut claimed, fadnavis wanted remove Modi to become PM

भाजप सारखा महाराष्ट्रातल्या पहिल्या नंबरचा पक्ष आपल्या सक्षम आमदारांना बाजूला करून आदित्य ठाकरेंसारख्या नवख्या आमदाराला मुख्यमंत्री करणार होता आणि देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षा तर एवढी फुलली होती की, ते थेट भाजप आणि संघ परिवाराने ठरवून केलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाजूला सारून स्वतः पंतप्रधान बनायचा तयारीत होते…!! याच्या एवढा तर “मोठ्ठा” “जावईशोध” गेल्या 75 वर्षांमध्ये भारतातल्या कुठल्याही राजकीय नेत्याने लावला नव्हता, तो शोध संजय राऊत यांनी लावून दाखविला!!

संजय राऊत यांची संशोधक वृत्ती एवढी प्रबळ आहे की त्यांना “जनाब बाळासाहेब ठाकरे” या शब्दांमध्ये सुद्धा “हिंदुत्व” दिसते आणि “हिंदुहृदयसम्राट” या शब्दांना धर्मांधतेचा वास येतो!! त्यामुळे एवढी सखोल संशोधन दृष्टी असणाऱ्या राऊतांच्या क्षमतेविषयी शंका घेण्याचे कारण नाही, पण राऊतांच्या संशोधनात क्षमतेच्या पलीकडेही काही राजकारण असतेच ना…!! त्यातून कदाचित फडणवीस यांची महत्त्वाकांक्षा फुलून त्यांना पंतप्रधान पदाचे धुमारे फुटले असावेत!!

पण संजय राऊत यांच्यासारख्या राजकीय “सखोल संशोधकांना” फडणवीसांची फुललेली महत्त्वाकांक्षा दिसली तरी कशी??, त्यामागे त्यांची कुठली संशोधक वृत्ती मागचा इतिहास धुंडाळून आली असावी??, याचा शोध घेतला असता थेट 1991 चे राजकीय चित्र डोळ्यासमोर आले. 1991 मध्ये काय घडले होते की संजय राऊत यांच्या नव्या “जावईशोधाचे” मूळ त्या वर्षात दडले असेल??1991 जून महिन्यात असेच काहीसे राजकीय घटीत – अघटीत घडले होते. त्यावेळी राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसमध्ये जो नेतृत्वाचा संघर्ष उडाला होता. त्या संघर्षात संजय राऊत यांचे “राजकीय गुरु” हिरीरीने उतरले होते. त्यांनी जोरदार पहिलवानी शड्डू ठोकून दिल्लीला आव्हान दिले होते. त्यामुळे महाराष्ट्राचा हा गडी दिल्लीत जाणार आणि दिल्लीचे सिंहासन काबीज करणार असे चित्र त्या पैलवानाच्या समर्थकांनी निर्माण केले होते. त्यावेळी महाराष्ट्रात प्रचंड उत्साहाचे वातावरण भरभरून वाहिले होते. आता काही दिवसांचाच अवकाश मराठा गडी यशाचा धनी बनून दिल्लीच्या गादीवर बसणार, याकडे अवघा महाराष्ट्र डोळे विस्फारून बघत होता!!

पण हाय रे दैवा घडले भलतेच…!! घडले उलटेच…!! ज्या महाराष्ट्राच्या गड्याने दिल्लीत जाऊन शड्डू ठोकले होते, ते शड्डू तिथल्या तिथेच विरले. दिल्लीच्या तख्ताची लढाई हरले आणि मुकाटपणे महाराष्ट्रात परत आले. 1991 पासून ज्या पैलवानाने पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा बाळगली, ते आता महाविकास आघाडीतल्या जागा वाटपात आपल्या पक्षाच्या वाट्याला आलेल्या फक्त 10 जागांवर निवडणूक लढवण्याचे मान्य करून प्रचार करू लागलेत. ते संजय राऊत यांचे “राजकीय गुरु” असल्याने त्यांनी पंतप्रधान पदाला दिलेले आव्हान राऊतांना अचानक आठवले आणि ते त्यांनी फडणवीसांना चिकटवले. त्यातूनच राऊतांचा नवा “जावईशोध” समोर आला, मोदींना बाजूला सारून फडणवीसांना पंतप्रधान व्हायचे होते, असे राऊत म्हणाले…!!

– नरसिंह राव आणि राऊतांचे गुरु

पण मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांची जोडगोळी म्हणजे राऊतांचे “राजकीय गुरू” आणि नरसिंह राव यांची जोडगोळी थोडीच आहे, की जी आपापसात स्पर्धा करून पंतप्रधान पद मिळवायचे ठरवेल!!…, तर अजिबातच नाही. नरसिंह राव आणि संजय राऊत यांचे “राजकीय गुरु” हे काँग्रेस संस्कृतीमध्ये मुरलेले नेते होते आणि आहेत. त्यामुळे त्यांनी नेतृत्व स्पर्धेत उतरणे, एकमेकांना खेचणे पाडणे, चढणे, उतरणे हा त्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. पण मोदी आणि फडणवीस ही जोडगोळी त्या काँग्रेस संस्कृतीचा भाग कधीही नव्हती. त्यामुळे देशाच्या नेतृत्वाचा प्रश्न हा मोदी आणि फडणवीसांच्या राजकीय संस्कृतीत संघ नावाचा परिवार ठरवतो आणि त्यानुसार मोदी आणि फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांना चालावे लागते तिथे दुसरा पर्याय नसतो. एकदा संघ परिवाराने ठरवले, नरेंद्र मोदी पंतप्रधान, की मग तिथे फडणवीस किंवा बाकीचे नेते स्वतःच्या महत्त्वाकांक्षा फुलवून त्याचे पिसारे लोकांना दाखवत फिरत नाहीत.

त्यामुळे संजय राऊत यांनी कितीही “सखोल” संशोधक वृत्ती दाखवून फडणवीसांना मोदींना बाजूला सारून पंतप्रधान व्हायचे होते, असे म्हटले असले तरी ती बिलकुलच वस्तुस्थिती नाही. आपण मोदींना आव्हान देऊ शकत नाही. आपण संघ परिवाराचे घटक आहोत, याची जाणीव फडणवीसांना निश्चित आहे आणि संघ परिवाराने आपल्याला देशाचे नेतृत्व करायला निवडले आहे हे मोदींना पक्के माहिती आहे. त्यामुळे प्रचंड बुद्धिमान संशोधक वृत्तीच्या संजय राऊतांचा “जावईशोध” फोल ठरला आहे!!

Sanjay Raut claimed, fadnavis wanted remove Modi to become PM

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात