उठा उठा निवडणूक आली, कर माफीची चढाओढ सुरू झाली, शिवसेनेने (पहिली) आघाडी घेतली!!


नाशिक : “उठा उठा महापालिकेची निवडणूक आली, विविध कर माफीची चढाओढ सुरू झाली”, असे म्हणायची वेळ आली आहे. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्ही फक्त तोंडाच्या वाफा दवडत नाही. प्रत्यक्ष काम करून दाखवतो, असा भाजपला चिमटा काढत मुंबईत 500 स्क्वेअर फुटांच्या घरांसाठी मालमत्ता कर माफीची घोषणा केली. त्यापाठोपाठ ठाणे महापालिकेने देखील 500 स्क्वेअर फुटांच्या घरांसाठी मालमत्ता कर माफीची माफीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यातून 150 कोटींचा तोटा सहन करण्याची ठाणे महापालिकेची तयारी आहे.Rise up, election has come, tax waiver has started, Shiv Sena has taken the lead

हा प्रस्ताव ताबडतोब महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारकडे पाठवण्यात आला असून आघाडी सरकारने त्यावर प्रशासकीय काम देखील सुरू केले आहे. राज्यपालांकडे पाठवून ताबडतोब मंजूर करून घेण्यात येईल. मुंबई आणि ठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे आहे दोन्ही महापालिकांमध्ये मालमत्ता कर माफीची घोषणा करून शिवसेनेने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय आघाडी घेतली आहे. त्यांच्यापाठोपाठ भाजपची सत्ता असलेली नाशिक महापालिकाही रांगेत आहे. नाशिकमध्ये देखील याच स्वरूपाची कर माफी देण्याच्या हालचाली भाजप नेत्यांनी सुरू केले आहेत.



महाराष्ट्रात एकूण 18 महापालिकांच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात अपेक्षित आहेत. राज्यातील कोरोनची लाट लक्षात घेता त्या नेमक्या केव्हा होतील? म याची नेमकी माहिती राजकीय निर्णय घेणार्यांच्या पलिकडे अद्याप कोणाला नाही. सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांचा शक्‍यतो निवडणुकीत शक्तिप्रदर्शन टाळण्याकडे कल आहे, असे बोलले जाते.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत महाविकास आघाडी एकत्र येऊन देखील भाजपने दणक्यात महाविकास आघाडीचा पराभव केला. मुंबई ठाणे, औरंगाबाद, पुणे या महापालिकांच्या निवडणुकांचे या दृष्टीने हा निकाल महाविकास आघाडी साठी “गंभीर इशारा” मानला जात आहे. अशा स्थितीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष निवडणूक टाळण्याकडेच आपले “राजकीय वजन” वापरण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे.

काँग्रेसला काँग्रेसचा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या निवडणूक टाळण्याच्या निर्णयाला विरोध असू शकतो कारण मुंबई महापालिकेत त्यांची काँग्रेसची विशिष्ट ताकद आहे ती दाखवून देऊन आपले राजकीय वजन वाढविण्याचा त्यांचा मनसूबा आहे. पण निवडणूक टळली तर ते शक्य होईलच असे नाही. कारण यामध्ये घटनात्मक आणि कायदेशीर देखील अडचणी असू शकतात. राज्यपालांचीही भूमिका याबाबत “महत्त्वाची” आहे.

या सर्व शक्यता लक्षात घेता निवडणूक झालीच तर आपण कुठेही कमी पडायला नको या हेतूने शिवसेनेने आघाडी घेत मुंबई आणि ठाणे महापालिकेमध्ये मालमत्ता कर माफी संदर्भात निर्णय घेऊन तो जाहीरही केला आहे. त्यापाठोपाठ नाशिकमध्ये देखील तशाच हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत. महापालिका निवडणुकीची चाहूल लागल्याचे हे लक्षण आहे. निवडणुका होतील की न होतील हा पुढचा भाग असला तरी निवडणुकीच्या तयारीत शिवसेना मागे राहिली नसल्याचे यातून दिसून येत आहे.

Rise up, election has come, tax waiver has started, Shiv Sena has taken the lead

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात