राज ठाकरे यांचे हाताच्या बोटांवर मोजण्याइतपतही नेते निवडून येत नाहीत, असे शरद पवार कोल्हापूरच्या पत्रकार परिषदेत म्हणाले. पण ज्यांचे हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत नेते निवडून येत नाहीत. त्या राज ठाकरेंवर बोलायला मात्र पवार – ठाकरेंचे डझनभर नेते बोलायला बाहेर आले…!! यात स्वतः पवार सुप्रिया सुळे संजय राऊत यांच्यापासून ते शिवसेनेच्या प्रवक्त्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या पर्यंत डझनभर नेते समाविष्ट होते. Raj Thackeray: To see Raj Thackeray’s “fingers” bent, to keep your “covered” !! Fingers and dozens of leaders !!
शरद पवार म्हणाले ते खरेच आहे. राज ठाकरे आधी भूमिगत होतात नंतर अचानक येऊन लेक्चर देतात. हे अनेकदा घडले आहेच. त्याबद्दल दुमत नाहीच. राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेत सातत्य नाही हे देखील अनेकदा घडले आहे…!!
पण ज्या शरद पवारांनी राज ठाकरे यांच्यावर भूमिकेत सातत्य नसल्याची टीका केली, त्यांचे हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेही नेते निवडून येत नसल्याचे शरसंधान साधले… त्या शरद पवारांची तरी वेगळी काय अवस्था आहे…?? त्यांचे तरी 50 वर्षांच्या संसदीय कारकिर्दीत लोकसभेत हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच खासदार निवडून गेले ना…!! विधानसभेत डबल डिजिट पेक्षा ट्रिपल डिजिट आकडा निवडून आला नाहीत ना…!!
मग फक्त राज ठाकरे भूमिगत होतात आणि अचानक उठून लेक्चर देतात एवढा आरोप सोडला तर बाकीच्या कोणत्या आरोपांमध्ये तथ्य उरते…?? राज ठाकरेंनी भूमिकेत सातत्य ठेवले नाही हे खरेच… पण शरद पवारांनी तरी आपल्या राजकीय कारकिर्दीत आपल्या भूमिकेत सातत्य कुठे ठेवले आहे…?? कधी काँग्रेसशी घरोबा, तर कधी काँग्रेसला विरोध… कधी भाजपला डोळा मारणे तर कधी शिवसेनेला सोबत घेणे…, अशाच राजकीय कोलांट्याउड्या शरद पवारांनी मारल्या आहेत ना…!!
पण मराठी माध्यमांचे पॅकेजी वैशिष्ट्य ठरलेले आहे. पवारांनी केली की ती लगेच “पॉवरफुल खेळी” ठरवायची बाकीच्यांनी केली की कोलांटउडी, बेडूक उडी अशा शब्दांनी त्या खेळीची खिल्ली उडवायची. राज ठाकरेंनी भूमिका बदलली की त्याच्या हेडलाईन बनवायच्या आणि पवारांच्या मात्र “पॉवरफुल खेळी” ठरवायच्या… पवारांच्या नातवाने पावभाजी केल्याच्या बातम्या छापायच्या. पवारांच्या मुलीने राष्ट्रीय मुद्दे उपस्थित केल्याचे ग्लोरीफाय करून सांगायचे…!!
राज ठाकरे आणि पवार यांचे राजकीय कर्तृत्व आपापल्या पातळीवर सिंगल डिजिट सारखेच असले, त्यांच्या भूमिका मध्ये सातत्य नसले तरी राज ठाकरे यांना “रंग बदलणारा सरडा” म्हणायचे आणि पवार यांच्याबद्दल त्या बदलत्या भूमिकांना मात्र “पॉवरफुल खेळी” म्हणत राहायचे ही खरेतर पवारांच्या खेळी पेक्षा माध्यमांची पॅकेजी खेळीच अधिक आहे…!!
बाकी शिवसेनेच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर तुटून पडणे हे स्वाभाविकच आहे. खुद्द त्यांच्या पक्षप्रमुखांच्या घरात ईडीने हात घातला आहे. तेव्हा ते खवळणे स्वाभाविक मानले पाहिजे. राज ठाकरेंवरचे टीकास्त्र ही शिवसेना स्टाईल असेच मानले पाहिजे. पण निदान शिवसेनेच्या नेत्यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवताना आपली शिवसेना स्टाईल तरी सोडलेली नाही. पण राज ठाकरे यांच्या हाताची बोटे “वाकून” पाहणाऱ्या पवारांनी मात्र हाताच्या बोटावर स्वतःची हाताची बोटे मात्र “झाकून” ठेवली आहेत…!!, हे मात्र निश्चित.
बाकी काही असले तरी राज ठाकरे यांच्या भाषणाचा निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मराठी म्हण उलटी फिरली…!! “एक लोहार की नंतर सौ सोनार की” सुरू झाली…!! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणाच्या पार्श्वभूमीवर हे घडले आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात “एक लोहार की” हाणली त्यानंतर आता महाराष्ट्रात “सौ सोनार की” सुरू झाली आहे…!!
“सौ सोनार की एक लोहार की”, अशी मूळ मराठी म्हण आहे. पण राज ठाकरे यांनी कालच्या भाषणात पवार ठाकरे यांच्यावर जोरदार ठाकरी तोफा डागत “एक लोहार की” हाणून घेतली. त्यानंतर त्यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांची “सौ सोनार की” सुरू झाली…!!
स्वतः शरद पवार यांच्यापासून ते जितेंद्र आव्हाड यांच्यापर्यंत राष्ट्रवादीचे नेते राज ठाकरेंवर तुटून पडले. आव्हाडांनी गीताचा आधार घेतला, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मगळतात संजय राऊत यांच्यापासून ते शिवसेनेच्या नव्या प्रवक्ता नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या पर्यंत सगळे शिवसेना नेते राज ठाकरे यांच्यावर तुटून पडले. भाजपचा भोंगा, अक्कलदाढ उशिरा आली, टाळ्यांची वाक्ये, शिवसेनेचा भगवा, आमचे विकासाचे राजकारण, या शब्दांचा भडीमार संजय राऊत यांनी केला. शीतल म्हात्रे या ईडीची नोटीस राज ठाकरेंना आल्यानंतर उद्धव ठाकरे त्यांच्या पाठीशी उभी राहील याची आठवण करून दिली. नकलाकार, सी टीमचे नेते, करंटे अशा शब्दांचा भडीमार शीतल म्हात्रे यांनी केला.
राज ठाकरेंवर शरसंधान साधणाऱ्यांमध्ये शिवसेनेच्या नेत्यांबरोबरच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री छगन भुजबळ यांचाही समावेश होता. तसेच शिवसेनेच्या मावळत्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार विनायक राऊत यांचाही समावेश होता. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज ठाकरेंएवढ्या कडक भाषेत नव्हे, पण आपापल्या शैलीमध्ये त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. यामध्ये अक्कलदाढ, लेक्चरबाजी, बी टीम – सी टीम, बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकांना घडवले पण हेच कसे काय बिघडले?, भाजपच्या मोरीतून गांडूळ बाहेर आले, वगैरे शब्दांची रेलचेल होती.
शरद पवार यांनी तर राज ठाकरे यांचे हाताच्या बोटावर मोजण्याइतकी देखील नेते निवडून येत नाहीत, असे कोल्हापुरात म्हटले. पण ज्यांचे नेते हाताच्या बोटावर मोजण्याइतके निवडून येत नाहीत, त्या नेत्याच्या भाषणावर प्रतिक्रिया द्यायला मात्र पवारांसकट राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षातले डझनभर नेते बाहेर आले. त्यामुळेच मूळ मराठी म्हण उलटी फिरली आणि ती “सौ सोनार की एक लोहार की” या ऐवजी “एक लोहारकी सौ सोनार की” अशी झाली…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App