राहुल गांधी म्हणतात, नरेंद्र मोदींनी फक्त चमच्यांनाच इंटरव्ह्यू दिले; पण हे “चमचे” आहेत तरी कोण??

BJP will be the largest party in the south

काँग्रेसचे वायनाड आणि रायबरेली या दोन लोकसभा मतदारसंघांमधले काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी नरेंद्र मोदींवर टप्प्याटप्प्याने वेगवेगळे हल्लाबोल करत असताना त्यांनी आपल्या हल्लाबोलाचा विषय गेल्या दोन-तीन दिवसांपासून नरेंद्र मोदींनी फक्त चमच्यांनाच इंटरव्ह्यू दिले, असा केला आहे. त्यामुळे अर्थातच नरेंद्र मोदींचे इंटरव्ह्यू स्वतः त्यांनी त्या मुलाखतींमध्ये केलेल्या वक्तव्यांपेक्षा राहुल गांधींनी केलेल्या टीकेमुळे अधिक चर्चेचे ठरले आहेत. Rahul Gandhi says, Modi gives interview to “chamchas” only, are interviewers are “chamchas” of Modi??

वास्तविक नरेंद्र मोदींनी आत्तापर्यंत 70 च्या आसपास मुलाखती दिल्या. सुमारे 180 जाहीर सभा केल्या. साधारण 60 च्या आसपास वेगवेगळी संमेलने केली आणि ते कन्याकुमारीच्या विवेकानंद रॉक वर ध्यानधारणेसाठी निघून गेले. परंतु राहुल गांधींची “चमचों वाला इंटरव्यू” ही टीका – संकल्पना देशाच्या वातावरणात जशीच्या तशीच राहिली.

मग नरेंद्र मोदींनी दिलेले 70 इंटरव्हयू हे सगळेच “चमचों वाले इंटरव्ह्यू” आहेत का??, ते तसे असतील, तर ज्यांनी ते इंटरव्ह्यू
घेतले, त्यांना आपण नरेंद्र मोदींचे “चमचे” आहोत हे मान्य आहे का?? आणि त्या पलीकडे जाऊन त्यांच्या मान्यतेपेक्षा वास्तवात ते “चमचे” आहेत का??, असे एकापाठोपाठ एक सवाल समोर येतात.

निवडणूक सुरू झाल्यापासून नरेंद्र मोदींनी ज्यांना इंटरव्ह्यू दिले, त्या वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनेल त्यांची नुसती नावे जरी पाहिली, तरी बरेच खुलासे होऊ शकतात. नरेंद्र मोदींनी लोकमत, सकाळ, जागरण, भास्कर, हिंदुस्तान टाइम्स या मोठ्या वृत्तपत्र समूहांना मुलाखती दिल्या. एबीपी, रिपब्लिक, टाइम्स नाऊ, आज तक, न्यूज नेशन, एनडीटीव्ही, आदी न्यूज चॅनेल्स, एएनआय, पीटीआय, आयएनएस या वृत्तसंस्थांनाही मुलाखती दिल्या. बंगाल ओडिषा आणि दक्षिण भारतातल्या राज्यांमध्ये काही वृत्तपत्रांचा आणि न्यूज चॅनेलचा नरेंद्र मोदींनी आपल्या मुलाखतींच्या मालिकेमध्ये आवर्जून समावेश केला. तो त्यांच्या स्ट्रॅटेजीचा भाग होता.

पण हे सगळे राहुल गांधींच्या नरेंद्र मोदी का “चमचों वाला इंटरव्ह्यू” याच टीकेच्या चष्म्यातून पाहिजे झाले तर वर उल्लेख केलेले आणि उल्लेख न केलेले सगळे इंटरव्ह्यू हे चमच्यांनी घेतले, असे त्यांना म्हणायचे आहे का??, हा सवाल आहे. वर उल्लेख केलेल्या वृत्तसमुहांचे आणि न्यूज चॅनेलचे मालक आणि त्यांच्यातले पत्रकार यांच्या नावांचा थोडा जरी आढावा घेतला तरी ते मोदींचे “चमचे” आहेत की नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पार्टीचे ते विरोधक आहेत??, हे सहज लक्षात येईल.

लोकमत वृत्त समूहाचे मालक दर्डा हे मूळात राहुल गांधी प्रतिनिधित्व करत असलेल्या काँग्रेसचे नेते आहेत. ते माजी खासदार होते. माजी मंत्री होते. दर्डांवर कोळसा घोटाळ्याचा आरोप आहे. सकाळ वृत्त समूहाचे मालक पवार आहेत, जे नरेंद्र मोदीं बरोबर वैयक्तिक संबंध राखून आहेत, पण आपण त्यांच्या राजकीय विरोधात आहोत, असे ते वारंवार सांगत आले आहेत. पवार कायम भ्रष्टाचाराच्या आरोपात घेरलेले असतात.
ते काहीही असले तरी लोकमत आणि सकाळ ही दोन्ही वृत्तपत्रे नरेंद्र मोदींच्या राजकीय तत्त्वज्ञानाच्या विरोधातली वर्तमानपत्रे आहेत. भास्कर आणि जागरण हे दोन परस्पर स्पर्धक वृत्त समूह मोदी मोदींची बाजू आणि मोदींचा विरोध हे आपापल्या स्ट्रॅटेजीनुसार करतात.

बाकी सगळे न्यूज चॅनेल्स आपापल्या सोयीनुसार आपली धोरणे ठरवतात. यातला अगदी एनडीटीव्ही जरी आज गौतम अदानी यांनी जास्त शेअर घेऊन विकत घेतला असला, तरी त्याची मूळ “पॉलिटिकल अलाइनमेंट” ही मोदी विरोधातलीच आहे, हा इतिहास फार जुना नाही.

मोदींनी मुलाखती दिलेल्या दक्षिणी न्यूज चॅनेल आणि वृत्तपत्रे यांची “पॉलिटिकल अलाइनमेंट” बिलकुलच भाजपशी संलग्न नाही. त्यांच्या भूमिका 2014 नंतर थोड्याफार बदलल्या असल्या, तरी त्यांचा “पॉलिटिकल अलाइनमेंट”चा जुना इतिहास पुसता येणार नाही.

त्यामुळे राहुल गांधींनी नरेंद्र मोदींच्या कुठल्याही इंटरव्ह्यूला अनुलक्षून चमचों वाला इंटरव्ह्यू असे म्हटले असले, तरी प्रत्यक्षात नरेंद्र मोदींचे कुठलेच इंटरव्ह्यू चमच्यांनी घेतले नसल्याचे स्पष्ट आहेत.

आता इतकी सगळी भूमिका मांडूनही जर खुद्द त्या वृत्त समूहांच्या मालकांना त्यातल्या पत्रकारांना आणि न्यूज चॅनेलच्या मालक आणि पत्रकारांना आपण नरेंद्र मोदींचे “चमचे” आहोत हे मान्य असेल, तर त्यावर अन्य कुठलीच भूमिका मांडायचे कारण नाही. पण त्यांना ते मान्य नसेल, तर त्यांनी उघडपणे आपापल्या वृत्तपत्रांमधून किंवा आपापल्या न्यूज चॅनेल मधून राहुल गांधींच्या आरोपाला उत्तर द्यायला तर काहीच हरकत नव्हती. पण त्यांनी तशी उत्तरे दिल्याचा हवाला फारसा कुठे दिसला नाही किंवा त्यांच्या उत्तरांचा गवगवाही झालेला दिसला नाही.

दस्तुरखुद्द राहुल गांधींना वेगवेगळ्या न्यूज चॅनेल आणि वर्तमानपत्रांनी मुलाखतीसाठी विचारले होते, अशा काही बातम्या वृत्तपत्रांमध्ये छापूनही आल्या, पण त्यात फक्त राहुल गांधींनी एकच इंटरव्यू दिला असेही छापून आले. उलट आम्हीच नरेंद्र मोदींना जाहीर डिबेटचे आव्हान दिले आहे, ते अद्याप त्यांनी स्वीकारलेले नाही, असे उत्तर काँग्रेस कडून आले.

वास्तविक नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची अमेरिकन अध्यक्षांच्या निवडणुकीतल्या डिबेटनुसार डिबेट व्हावी, असा प्रस्ताव दोन न्यायाधीश मदन बी. लोकुर, बी. एम. शाह आणि एक माजी संपादक म्हणजेच एन. राम यांनी मांडला होता. तो मूळचा काँग्रेसचा प्रस्ताव सकृतदर्शनी तरी नव्हता, पण तरीदेखील भाजपने राहुल गांधींना “इक्विवेलेंट” ठरेल, असा एक नेता त्यांच्याशी डिबेट करायला नेमला होता. भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अभिनव प्रकाश हे त्यांचे नाव आहे. परंतु राहुल गांधींनी त्यांच्याशी डेबिट केल्याची कुठलीही बातमी आली नाही.

अशा स्थितीत स्वतः इंटरव्यू द्यायचे नाहीत. दिलाच, तर एखाद दुसरेच इंटरव्यू घ्यायचे आणि नरेंद्र मोदींच्या इंटरव्ह्यूला मात्र “चमचों वाला इंटरव्ह्यू” म्हणायचे की राहुल गांधींची विशिष्ट बुद्धीतून आलेली “रणनीती” आहे, यापेक्षा त्याचे दुसरे कुठले वर्णन करता येईल?? या “राहुल बुद्धी”च्या या “रणनीती”चे उत्तर 4 जूनला मिळेल, एवढेच फार तर सांगता येईल!!

Rahul Gandhi says, Modi gives interview to “chamchas” only, are interviewers are “chamchas” of Modi??

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात