घळघळीत बहुमताची भाषा; माध्यमनिर्मित चाणक्यांच्या फौजा लागल्या कामाला!!


नाशिक : महाराष्ट्राचे राजकारण कसे स्वाभिमानावर आधारित आहे, इथे जात आधारित स्वाभिमान आणि आर्थिक हितसंबंध यांचे कसे समीकरण जुळले आहे आणि ते कसे माध्यमनिर्मित चाणक्यांच्या बाजूने झुकले आहे. त्यामुळे कुठल्यातरी एका बाजूला घळघळीत बहुमत मिळेल, असे विश्लेषण करणाऱ्या माध्यमनिर्मित चाणक्यांच्या फौजा कामाला लागल्या आहेत. जणू काही एकट्या महाराष्ट्रालाच स्वाभिमान आहे आणि बाकीची सगळी राज्ये स्वाभिमान गहाण टाकून राजकारण करतात आणि आपापल्या राजकीय उपजीविका चालवतात, असा आव माध्यमनिर्मित चाणक्यांच्या फौजांनी आणला आहे.

महाराष्ट्रातले राजकारण सहकारावर आधारित आहे आणि सहकार सत्तेच्या बाजूने झुकून काम करतो. कारण त्याला त्याशिवाय पर्याय नाही म्हणून सहकारातले नेते भाजपकडे गेले. पण तिथे आपला मान सन्मान टिकला का??, तिथे आपले आर्थिक हितसंबंध जपले गेले का??, याचा विचार आता सहकारातला मराठा समाज करू लागला आहे. सोलापूर जिल्ह्यातले मोहिते पाटलांचे घराणे त्याचे उदाहरण आहे, पण ते केवळ एकमेव उदाहरण नाही, तर अशी अनेक छोटी मोठी उदाहरणे प्रत्येक जिल्ह्यात सापडतील, असा दावा माध्यमनिर्मित चाणक्यांच्या फौजांनी चालविला आहे.

चाणक्यांना सोलापूर जिल्हा फार आवडतो. ते तिथेच नेहमी “चाणक्य खेळ्या” करत असतात. त्यापलीकडे पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर अशा जिल्ह्यांमध्ये थोड्याफार “चाणक्य खेळ्या” होतात किंवा “डाव” टाकले जातात, पण उर्वरित महाराष्ट्रात ती संधीच मिळत नाही. किंवा मिळाली, तर ती बीड सारख्या एखाद दुसऱ्या ठिकाणी मिळते. त्यामुळे चाणक्यांच्या फौजांनी त्यांच्या प्रत्येक खेळीला बौद्धिक मुलामा आणि स्वाभिमानाची डूब देत विश्लेषण चालविले आहे.

Congress : राजस्थानमध्ये काँग्रेसची दोन पक्षांसोबतची युती संपुष्टात!

माध्यमनिर्मित चाणक्य आणि भाजप यांनी म्हणे, समान रचना केली आहे. त्यांच्याकडे त्या दोघांकडेही ओबीसी आणि मराठा आहेत. ओबीसी आणि मराठा मते दोन्हीही फुटणार आहेत. मनोज जरांगे यांना विशिष्ट टप्प्यात यश मिळेल, पण ते यश गाभ्याचा भाग असणार नाही, असा दावाही चाणक्यांच्या फौजांनी चालवला आहे.

मूळात माध्यमनिर्मित चाणक्यांची स्वाभिमानावर आधारित पक्षनिर्मिती आणि पक्ष संघटना किती मर्यादित आहे आणि जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून ते कुठे – कुठे निशाणा लावून बसले आहेत, याविषयी मात्र चाणक्याच्या फौजा मूग गिळून गप्प आहेत. जरांगेंचे आंदोलन गरजवंत मराठ्यांचे म्हणून सुरू झाले, ते आता प्रस्थापित मराठ्यांचे होऊन बसले आहे. जरांगे जर उमेदवार देणार असतील, तर त्यांच्या मागे प्रस्थापित मराठ्यांचीच आर्थिक शक्ती असेल, याचा तर मागमूसही माध्यमनिर्मित चाणक्यांच्या फौजांच्या विश्लेषणात नाही.

महायुतीची व्यूहरचना

याखेरीज भाजपने आणि महायुतीच्या बाकीच्या पक्षांनी 288 मतदारसंघात वेगवेगळ्या आधारांवर कुठे कशी पेरणी केली आहे, छोट्या जात समूहांना सर्वसमावेशक आधार देत संघटनात्मक पातळीवर जोडून घेऊन कशी व्यूहरचना केली आहे, संघाच्या फौजा मतदार प्रबोधनाच्याद्वारे किती ठिकाणी आत मध्ये घुसून काम करू लागल्या आहेत, त्याचबरोबर लोकसभेची निवडणूक ज्या नॅरेटिव्ह सेटिंगच्या आधारे झाली, ते जात वर्चस्वाचे नॅरेटिव्ह तोडून संपूर्ण निवडणूक “बटेंगे तो कटेंगे” या हिंदुत्वाच्या आधारावर कशी घेऊन चालले आहेत, याची साधी भनक देखील माध्यमनिर्मित चाणक्यांना आणि त्यांच्या “बौद्धिक” फौजांना लागलेली दिसत नाही. ते अजूनही जुन्या पान्या सहकार आणि जात वर्चस्वाच्या विश्लेषणातच गुंतले आहेत. त्यातूनच घळघळीत बहुमताचे दिवास्वप्न ते पाहू लागले आहेत.

Pro pawar analysts claims full fledge majority in maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात