नाशिक : मनोज जरांगे पाटलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवराळ भाषेत टार्गेट केल्यानंतर जरांगेंवर संपूर्ण महाराष्ट्रातून जे “बॅकफायर” झाले, त्यातून जरांगे आणि शरद पवार यांच्यातले संबंध “एक्सपोज” झाले. यातून जरांगेंना बॅकफूटवर जावे लागले आणि आंदोलन स्थगित करावे लागले हे सगळे चित्र राजकीय दृष्ट्या आपल्या अंगाशी येईल याची भीती वाटल्यानंतर पवार कॅम्पने “आयडियेची कल्पना” लढवत मनोज जरांगेंना एकनाथ शिंदे यांच्या कॅम्पमध्ये “ढकलून” स्वतः जरांगेंपासून “अलिप्त” होण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे चित्र महाराष्ट्रात दिसू लागले आहे!! Pawar camp trying to “push” manoj jarange into shinde camp to avoid backlash on pawar camp!!
जरांगेंचे एकेकाळचे समर्थक तरुण कार्यकर्ते त्यांच्या विरोधात गेले. त्यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमधून जरांगेंना आणखी “एक्सपोज” केले. शिंदे – फडणवीस सरकारने देखील कायद्याच्या कसोटीवर कठोर भूमिका घेतली आणि कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची भीती निर्माण झाल्यानंतर जरांगेंना बॅकफूट वर जावे लागले. शेवटी उपोषणाचे आंदोलन स्थगित करावे लागले. त्यावेळी त्यांची फडणवीसांविरुद्धची उर्मट भाषा जरी बदलली नसली, तरी संपूर्ण महाराष्ट्रात जरांगे सारखा माणूस बॅकफुटवर गेला, ते देखील पवारांशी संबंध “एस्टॅब्लिश” झाल्यामुळे त्यांना बॅकफूट वर जावे लागले असेच चित्र निर्माण झाले!!
पण हे चित्र निर्माण झाल्याबरोबर आणि जरांगेंचे आंदोलन आपल्याला राजकीय दृष्ट्या महागात पडेल, असे लक्षात आल्याबरोबर पवार कॅम्प सजग झाला आणि जरांगेंना एकनाथ शिंदे यांच्या कॅम्प मध्ये “ढकलून” स्वतः “अलिप्त” होण्याचे प्रयत्न करू लागला. महाराष्ट्रात काल सायंकाळपासून पवार कॅम्पमधून मनोज जरांगे हा “एकनाथ शिंदेंचा माणूस” असल्याचे नॅरेटिव्ह पसरवले जाऊ लागले आहे, यातले हे खरे राजकीय इंगित आहे!!
मनोज जरांगे यांना एकनाथ शिंदे यांनीच “हिरो” बनविले. जरांगेंच्या वेळोवेळी बदललेल्या मागण्या एकनाथ शिंदेंनी पूर्ण करून स्वतःची प्रतिमा मराठा समाजात उजळ केली. जरांगेंबरोबर मराठा आरक्षणाचा आरक्षणाचा गुलाल देखील उधळला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनीच मनोज जरांगेंचा वापर केला, असे नॅरेटिव्ह आता पवार कॅम्पमधून वेगवेगळ्या “बौद्धिक” मुलाखती देऊन पसरविले जात आहे.
विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा समाजाला आर्थिक आणि शैक्षणिक मागास म्हणून 10 % टक्के आरक्षण दिले. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न शिंदे – फडणवीस सरकारने सोडवून दाखविला. त्यामुळे मनोज जरांगे आपल्या मास्टर माईंडच्या आदेशानुसार बिथरले आणि गेल्या दोन दिवसांत वेगवेगळे एपिसोड सादर झाले.
यातून “तुतारी” वाजली रायगडावर, पण आवाज निघाला अंतर्वली सराटीतून, असे बोलले गेले.
पवार कॅम्पचे “विचारवंत” लागले कामाला
कारण मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपांचा सगळा “नॅरेटिव्ह” हा आधीच शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनीच “एस्टॅब्लिश” केल्याचे स्पष्ट झाले आणि जरांगे खऱ्या अर्थाने “उघडे” पडले. जरांगे – पवार संबंध असे “एक्सपोज” झाल्याने पवार कॅम्प सजग झाला आणि स्वतःला जरांगेंपासून “अलिप्त” करून घेण्यासाठी त्यांनी जुनाच नॅरेटिव्ह पुन्हा पुढे सुरू करण्याचा प्रयत्न केला, तो म्हणजे मनोज जरांगे हा “एकनाथ शिंदेंचाच माणूस” आहे आणि एकनाथ शिंदेंनी त्यांच्यासह मराठा आरक्षणावर खेळ करून स्वतःची प्रतिमा “मराठा नेता” म्हणून महाराष्ट्रात तयार करण्याचा प्रयत्न केला, हा नॅरेटिव्ह पवार कॅम्पने पसरवण्याचा प्रयत्न चालवला आहे. सोशल मीडियातील वेगवेगळ्या मुलाखतींमधून पवार कॅम्प मधले स्वघोषित विचारवंत आणि तज्ञ सध्या याच उद्योगाला लागल्याचे चित्र दिसत आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App