Nana patole : पवारांच्या पेटंट आयडियेवर नानांचा डल्ला; “पेशवाई” नॅरेटिव्ह शिजवायला काँग्रेस पक्ष सरसावला!!


नाशिक : शरद पवारांच्या पेटंट आयडियेवर नाना पटोलेंचा डल्ला; पेशवाई नॅरेटिव्ह शिजवायला काँग्रेस पक्ष सरसावला!!, हे मालवणच्या राजकोटमधल्या शिवपुतळा कोसळण्याच्या निमित्ताने घडले. यावेळी पवार किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी “पेशवाई” नॅरेटिव्ह शिजवायला घालण्याआधी तो नॅरेटिव्ह काँग्रेसच्या नाना पटोले यांनी शिजवायला घातला. Nana patole grabbed peshwai narrative from sharad pawar

एरवी कुठलीही निवडणूक जवळ आली, शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचे भाजप किंवा शिवसेनेवर टीका करण्याचे आगपाखड करण्याचे मुद्दे संपले, की पवार कुठलाही मुद्दा कुठूनही आणून तो पेशवाईशी बेमालूमपणे जोडायचे. विरोधकांना ठोकून काढायचे. तुम्ही जोशी – महाराजांच्या हातात सत्ता देणार का??, असा सवाल करायचे. पेशवाईच्या मुद्द्याच्या निमित्ताने जास्तीत जास्त जातीय ध्रुवीकरण करून आपल्या पक्षासाठी लाभ उपटून घ्यायचे. हा गेल्या किमान 4 – 5 निवडणुकांचा तरी इतिहास आहे. त्यामध्ये जेम्स लेनचा मुद्दा पवारांना सर्वाधिक लाभ देऊन गेला. पण नंतर पवारांची ही “पॉलिटिकल ट्रिक” सगळ्या महाराष्ट्राच्या लक्षात आली. त्यामुळे पवारांचा पेशवाईचा पेटंट मुद्दा हळूहळू बासनात गेला होता.

पण मालवणच्या राजकोट मधला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठे राजकारण उसळले. त्यामध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल वाढवणमध्ये येऊन माफी मागितली. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पवारांची पेटंट आयडिया अर्थात पेशवाईच्या मुद्द्यावर डल्ला मारला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शिल्पकाराच्या “आपटे” आडनावाच्या मुद्द्यावर ती संधी नानांनी साधून घेतली. पेशवाई काळात देखील शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान केला जात होताच. आता नव्या पेशवाईत परत एकदा शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अपमान होतो आहे, असे नाना म्हणाले.

पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते यामध्ये शिल्पकाराच्या “आपटे” आडनावावरून राजकारण साधू पाहत होतेच. परंतु, पवार किंवा त्यांच्या राष्ट्रवादी प्रवृत्तीच्या नेत्यांनी “पेशवाई” शब्द उच्चारला नव्हता, तो शब्द नानांनी उच्चारला. त्यामुळे जो काही “पॉलिटिकल एडवांटेज” खेचायचा, तो नानांना खेचायचा प्रयत्न केला. त्याला बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण या बाकीच्या काँग्रेस नेत्यांची जोडही मिळाली.


Rajnath Singh : ‘स्वातंत्र्यानंतर महिलांना देशाच्या विकासात योगदान देण्यापासून वंचित ठेवण्यात आले’


 ठाकरे – पवारांना मागे ढकलण्याचा इरादा

तसाही लोकसभा निवडणुकीतल्या परफॉर्मन्स नंतर काँग्रेस पक्षाचा हुरूप वाढून तो पक्ष महाविकास आघाडीत “दादागिरी” करू लागला आहेच. त्यासाठी त्याला पक्षांतर्गत सर्वेक्षणाचाही आधार मिळाला आहे. किंबहुना त्या पक्षाने तो आधार घेतला आहे. काँग्रेसने आपल्या सर्वेक्षणाच्या आधारे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तिसऱ्या क्रमांकावर ढकलून उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षेचे पंख कापलेच आहेत, पण आता त्या पुढे जाऊन “पेशवाई” या शरद पवारांच्या पेटंट आयडियेवर डल्ला मारून महाराष्ट्रात जास्तीत जास्त जातीय ध्रुवीकरण करून काँग्रेससाठी जास्तीत जास्त फायदा उपटून पवारांच्याही पक्षावर कुरघोडी करण्याचा काँग्रेसचा इरादा यातून उघड्यावर आला आहे.

 काँग्रेस आणि पवार मूलभूत अंतर

अर्थात पेशवाईच्या मुद्द्यावर पवारांना मिळालेले यश हे फारच मर्यादित ठरले. ते फक्त त्यांच्या मूलभूत राष्ट्रवादी प्रवृत्तीच्या जातीय राजकारणाला पोषक ठरले. परंतु, काँग्रेसच्या बाबतीत “पेशवाई” नॅरेटिव्ह खरंच किती उपयोगी ठरेल??, याविषयी दाट शंका आहे. कारण काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीची मूलभूत प्रवृत्ती यामध्ये मोठे अंतर आहे. काँग्रेस जातीय राजकारणाचा आधार घेते. परंतु त्या आधाराला काँग्रेससाठी फारच मर्यादा आहे. कारण काँग्रेसने सर्वसमावेशक राजकारण सोडून फक्त जातीचा आधार घेतला, तर त्याचा फटका बसतो, याचा अनुभव काँग्रेसने यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस विशिष्ट मर्यादेतच जातीचा आधार घेऊन राजकारण करू शकते. त्या पलीकडे जाऊन सर्वसमावेशक राजकारण करण्याशिवाय त्या पक्षाला पर्याय नाही. अन्यथा मोठा जनाधार गमावण्याचा त्या पक्षाला धोका आहे. त्यामुळे नानांनी जरी पवारांच्या आधी “पेशवाई” नॅरेटिव्ह शिजवायला घातला असला, तरी त्या नॅरेटिव्हचा पवारांना जेवढा फायदा झाला, तेवढा त्या नॅरेटिव्हचा काँग्रेसला फायदा होईल का??, याविषयी दाट शंका आहे.

Nana patole grabbed peshwai narrative from sharad pawar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात