नाशिक : महाविकास आघाडीच्या 15 बैठका झाल्या. तब्बल 340 तास चर्चा झाली, तरी आघाडीच्या जागावाटपाची गाडी अडकूनच राहिली. कारण उद्धव ठाकरेंनी विदर्भात सेंधमारी केली. ती काँग्रेसला परवडणारी नाही. म्हणून खेचाखेची सुरूच राहिली. MVA leaders still stuck in seat sharing gamble
लोकसभा निवडणुकीनंतर जोशात आलेल्या महाविकास आघाडीची ही कहाणी भाजपची 99 उमेदवारांची यादी जाहीर होऊनी अधुरीच राहिली. महाविकास आघाडीच्या 15 बैठका झाल्या. तब्बल 340 तास चर्चा झाली. ही माहिती खुद्द संजय राऊत यांनी दिली. पण एवढी चर्चा होऊन देखील महाविकास आघाडीच्या जागावाटपावर तोडगा निघूच शकला नाही.
उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची तातडीची बैठक मातोश्रीवर घेतली. ती दोन तास चालली. त्या बैठकीनंतर संजय राऊत यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये जाऊन शरद पवार आणि जयंत पाटलांना भेटून आले. त्याआधी शिवसेनेच्या बैठकीदरम्यानच उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरे यांना शरद पवारांकडे चर्चेसाठी पाठविले. मात्र, पवारांची शिवसेनेबरोबर झालेली दोन वेळची “शिष्टाई” यशस्वी ठरल्याचे चित्र दिसले नाही. कारण काँग्रेसचे नेते दिल्लीत बसलेत. इकडे ठाकरे + पवार एवढ्याच वाटाघाटी झाल्या. त्यामुळे त्या वाटाघाटीतून “आउट कम” काही नाही आला.
Chandrachud : सरन्यायाधीश म्हणाले- ज्युनियरसोबतही विनम्रपणे वागा; मी सर्वोच्च न्यायालयाला लोक न्यायालय बनवण्याचा प्रयत्न केला
उद्धव ठाकरेंनी मुंबई, ठाणे, नवी मुंबई या परिसरातला शिवसेनेचा बालेकिल्ला सोडून विदर्भामध्ये काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर हल्लाबोल केल्याने जागावाटप अडल्याचे बोलले जात आहे. विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने तिथूनच सर्वाधिक ताकद मिळवण्याचा काँग्रेसचा इरादा आहे. अर्थातच विदर्भातल्या 62 जागांवर काँग्रेसने “कॉन्सन्ट्रेट” केले आहे. काँग्रेसने शिवसेनेला 8 जागा देऊ केल्या, पण शिवसेनेला 12 जागा हव्या आहेत. शिवसेना 12 आकड्यावर अडली आहे. शिवसेनेने फारच दबाव टाकला, तर काँग्रेसचे “तयार” नेते देखील विदर्भात “सांगली पॅटर्न” राबविण्याच्या तयारीत बसले आहेत.
पण त्या पलीकडचे राजकारण यामध्ये दडले आहे, ते म्हणजे काँग्रेसला जर विदर्भातून सर्वाधिक आमदारांचे बळ मिळाले, तर काँग्रेसचे संख्याबळ महाविकास आघाडीत सगळ्यात मोठे राहील आणि काँग्रेसलाच मुख्यमंत्रीपद द्यावे लागेल. उद्धव ठाकरेंची शिवसेना तर ठाकरेंनाच मुख्यमंत्री करायची जिद्द बाळगून बसली आहे. अशा स्थितीत काँग्रेसचे संख्याबळ परस्पर घटविण्याच्या दृष्टीने शिवसेनेने स्वतःचा बालेकिल्ला सोडून काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर जागावाटपाच्या बैठकीत “हल्लाबोल” केला आहे.
दमछाक करण्यात काँग्रेस नेते माहीर
पण उद्धव ठाकरेंची विदर्भातली ही सेंधमारी काँग्रेसला परवडणारी नाही, हे काँग्रेस नेत्यांना पक्के माहिती आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी देखील जागावाटपाच्या चर्चेत शिवसेनेला ताणून धरले आहे. तसेही जागा वाटपाच्या चर्चेत समोरच्याची दमछाक करण्यात काँग्रेसचे नेते फारच माहीर आहेत. त्यातच महाराष्ट्रात शिवसेना आणि काँग्रेस यांचा “बरोबरीचा” सामना असल्याने आणि काँग्रेसला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद पुन्हा पटकावयाची सर्वाधिक संधी असल्याने काँग्रेस सारख्या मुरब्बी पक्षाचे मुरब्बी नेते इतक्या सहजासहजी शिवसेनेसारख्या प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांपुढे झुकतील ही शक्यताच फार दुरापास्त आहे, तिथे शरद पवारांसारख्या नेत्यांनी “शिष्टाई” करून देखील फारसा उपयोग नाही. त्यामुळेच शरद पवार आज कुठलेही जाहीर वक्तव्य करायच्या फंदातच पडले नाहीत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App