नाशिक : काँग्रेस, ठाकरेंची उरलेली शिवसेना आणि पवारांची उरलेली राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांना घ्यायचे का नाही, घेतले तर त्यांना किती जागा द्यायच्या?? याचे सूत्र ठरेना, पण त्या पलीकडे जाऊन माध्यमांना भाजप मधली खरी बातमी सांगण्यासाठी त्या पक्षातले सूत्रचं सापडेना!! अशी आजची 1 मार्च 2024 ची अवस्था आहे. MVA leaders unable to find amicable solution for seat sharing, but media unable to find appropriate sources to find BJP’s strategical news
लोकसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. महाविकास आघाडीतील चर्चेचे गुऱ्हाळ गेल्या किमान 3 महिन्यांपासून सुरू आहे. यात प्रकाश आंबेडकरांच्या बाराच्या फॉर्म्युल्यापासून 27 जागांच्या मागणीपर्यंत वाटेल ते आकडे समोर आले आहेत. प्रकाश आंबेडकरांनी 27 जागा मागितलेल्या नाहीत, तर 27 जागा लढाईची त्यांची तयारी आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
पण चर्चेच्या या सगळ्या गुऱ्हाळातून रोज वेगवेगळ्या आकड्यांचा रस बाहेर येतो आहे. त्यामध्ये शिवसेनेचा ठाकरे गट 23 जागांवर ठाम असल्याचे, काँग्रेसला 12 जागांवर बोळवण केल्याचे आणि शरद पवार यांना सिंगल डिजिटच जागा लढवायला दिल्याचे पहिले सूत्र समोर येते, त्याला छेद देणारे समसमान जागा वाटप असे दुसरे सूत्र पुढे येते पण जागा वाटपाच्या सूत्रातला नेमका आकडा समोर येत नाही, तो महाविकास आघाडीतलेच घटक पक्ष सांगू शकत नाहीत, तर माध्यमे तरी काय सांगणार??, हा खरा प्रश्न आहे.
पण निदान महाविकास आघाडीतले दुसऱ्या फळीतले वेगवेगळ्या पक्षांचे नेते म्हणजे संजय राऊत, नाना पटोले, जितेंद्र आव्हाड हे वेगवेगळे येऊन माध्यमांशी बोलतात तरी!! त्यातून माध्यमांना वेगवेगळे आकडे मिळाल्यामुळे ते बातम्यांमध्ये पेरता येतात तरी, पण माध्यमांची खरी गोची भाजप आणि महायुतीच्या आकडेवारी बाबत आहे. कारण महायुतीतले जागा वाटपाचे सूत्र कोणत्या आकड्यांभोवती खेळवत ठेवायचे??, याचा अंदाजच माध्यमांना येत नाही. कारण भाजप मधली खरी बातमी सांगण्यासाठी त्यांना खरी सूत्रचं सापडत नाहीत!!
महायुतीतले अंतिम जागावाटप मोदी – शाहाच करणार हे सांगायला माध्यमांची बिलकुल गरज नाही, पण महायुतीतला भाजपचा , शिंदेंच्या शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा आकडा नेमका मिळायलाच तयार नाही. भाजपच्या सर्वोच्च निवडणूक महासमितीची कालच म्हणजे 29 फेब्रुवारीला रात्री 11.00 वाजता सुरू झालेली बैठक 1 मार्चच्या पहाटे 3.20 वाजता संपल्याची बातमी आली. त्यात 100 ते 180 लोकसभा मतदारसंघांमध्ये नावे फिक्स झाल्याचेही वेगवेगळ्या माध्यमांमधून समोर आले, पण यातला नेमका खरा आकडा कुठला हे कुठल्याच सूत्रांच्या हवाल्याने कुठल्याच माध्यमांना खात्रीलायक सांगता आले नाही. कारण भाजपच्या सर्वोच्च नेतृत्व फळीपर्यंत पोहोचतील अशी सूत्रेच माध्यमांकडे उपलब्ध नाहीत!!
त्यामुळे जो काही आकड्याचा खेळ करायचा तो 542 पैकी वाटेल तो बेरीज – वजाबाकी – गुणाकार – भागाकार असले प्रकार करून माध्यमांना फेकावा लागतोय, पण प्रत्यक्षात महायुतीच्या बाबतीत माध्यमांचा कुठलाच आकडा खरा ठरायला तयार नाही. म्हणजेच एकीकडे सारख्या बैठका घेऊनही महाविकास आघाडीतले जागावाटपाचे सूत्र ठरत नाही, तर दुसरीकडे महायुतीतले नेमके जागावाटप सांगण्यासाठी माध्यमांना भाजप मधले सूत्रंच मिळत नाही, अशी वस्तुस्थिती आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App