देशातील हिंसाचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का?? असा सवाल खडा करणाऱ्या विरोधी पक्षांच्या 13 नेत्यांनी जरी मोदींवर “पत्रबाण” सोडून निशाणा साधला असला, तरी प्रत्यक्षात त्या बाणने तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा पंक्चर करून टाकली आहे. कारण या 13 नेत्यांच्या पत्रामध्ये के. चंद्रशेखर राव यांना वगळण्यात आले आहे. या पत्रावर त्यांची स्वाक्षरी घेण्यात आलेली नाही. K. Chandrasekhar Rao’s “National Ambition” Mamata – Puncture by Pawar
या पत्रावर उद्धव ठाकरे यांची देखील स्वाक्षरी घेतलेली नाही. पण निदान उद्धव ठाकरे यांनी आपले राष्ट्रीय महत्त्वकांक्षा स्वतःच्या तोंडून बोलून दाखवलेली नाही. त्या महत्त्वाकांक्षेची वाच्यता संजय राऊत अधून मधून करत असतात. पण त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेकडे फारसे कोणी गांभीर्याने पाहत नाही. चंद्रशेखर राव यांचे तसे नाही त्यांनी स्वतः विरोधी ऐक्यासाठी पुढाकार घेतला आहे आणि मोदीविरोधी पत्राच्या स्वाक्षऱ्यांमधून त्यांनाच वगळल्याने त्याची देशातल्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
देशातील हिंसाचार हा जाणीवपूर्वक घडवण्यात येतो आहे. यामागे दंगली करण्याचा कुटील हेतू आहे, असा आरोप ममता बॅनर्जी, शरद पवार, डॉ. फारुख अब्दुल्ला, एम. के. स्टालिन, सीताराम येचुरी, तेजस्वी यादव, हेमंत सोरेन अशा 13 नेत्यांनी केला आहे. या 13 नेत्यांच्या यादीत केरळमधल्या इंडियन युनियन मुस्लिम लीग या पक्षाच्या नेत्याचा देखील समावेश ममता बॅनर्जी आणि शरद पवारांनी केला आहे, पण नेमकेपणाने या पत्राच्या स्वाक्षऱ्यांमधून के. चंद्रशेखर राव आणि जेडीएसचे नेते माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांना वगळले आहे… याला म्हणतात ममता आणि पवार यांचे “विरोधी ऐक्य”…!!
– चंद्राबाबूंनाही वगळले
इतकेच काय पण ममता आणि पवारांनी या पत्रावर तेलुगु देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांची देखील स्वाक्षरी घेतलेली नाही. याचाच अर्थ काहीच दिवसांपूर्वी आपली “राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा” जाहीर करणाऱ्या चंद्रशेखर राव यांची महत्त्वाकांक्षा ममता आणि पवार यांनी परस्पर पंक्चर करून टाकली आहे.
– मुंबईत पवार भेट गेली निष्फळ!!
वास्तविक पाहता के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या मोदी विरोधाची मोहीम तेलंगण बाहेर येऊन मुंबईतून सुरू केली होती. त्यांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली होती. परंतु, मोदीविरोधात आपला हल्ला प्रकार करताना ममता आणि पवार यांनी मात्र के. चंद्रशेखर राव यांना वगळून टाकले आहे. ममता बॅनर्जी यांनी देखील विरोधी पक्षांचे ऐक्य साधण्यासाठी 10 मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले होते. त्यात चंद्रशेखर राव यांचा समावेश केला होता. पण आता थेट मोदींवर “पत्रबाण” सोडताना मात्र चंद्रशेखर राव यांना वगळून ममता बॅनर्जी यांनी विरोधी ऐक्याची वेगळी वाट चोखाळली आहे. किंबहुना विरोधी ऐक्याच्या वाटेवरून चंद्रशेखर राव यांना दूर केले आहे. आता यापुढे चंद्रशेखर राव ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्या विषयी नेमकी काय भूमिका घेतात??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
– पवारांचे फ्लिप – फ्लॉप
अर्थात शरद पवार यांच्या भूमिका मात्र विरोधी ऐक्याबाबत सातत्याने बदलत राहिली आहे. एकीकडे ते अधून मधून मोदींची भेट घेतात आणि दुसरीकडे विरोधकांना देखील खुणावत राहतात. मोदींना पाठविलेल्या पत्रावर पवारांची स्वाक्षरी हे त्याचेच निदर्शक आहे. काहीच दिवसांपूर्वी पवारांनी संसदेतल्या कार्यालयात जाऊन मोदींची 20 मिनिटांसाठी भेट घेतली होती. त्या भेटीचा खुलासा पवारांनी संजय राऊत यांच्यावरच्या खोट्या आरोपात बाबत आणि 12 आमदारांच्या निवडणुकीबाबत भेटलो होतो असा केला आहे. याखेरीज पवारांनी कोणताही खुलासा केलेला नाही.
– भूमिकेबाबत संशय कायम
पण त्यामुळेच पवारांच्या विरोधी ऐक्याच्या भूमिकेबाबत दिल्लीच्या आणि महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात संशय निर्माण झाला आहे. आता त्या पलिकडे जाऊन आपल्यालाच भेटून गेलेल्या के. चंद्रशेखर राव यांना विरोधी ऐक्याच्या प्रयत्नातून वगळून टाकून यातून पवारांची देखील वेगळी खेळी बाहेर आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App