भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकालात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीच्या मुहूर्तावर 28 मे 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या संसद भवनाचे उद्घाटन करणार आहेत. त्याच दिवशी ते पंडित जवाहरलाल नेहरूंनी 14 ऑगस्ट 1947 रोजी स्वीकारलेला सेंगोल अर्थात राजदंडाची प्रतिष्ठापना लोकसभा सभापतींच्या आसनानजीक करणार आहेत. मात्र, पंतप्रधान मोदींनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाचा मुहूर्त (न सांगता) सावरकर जयंतीचा निवडल्याने संतप्त झालेल्या तुषार गांधी यांनी नव्या संसद भवनाला “सावरकर सदन” हेच नाव देऊन टाका, अशी संतप्त सूचना केली आहे. त्यामुळे विरोधकांच्या एकूण संतापाचा पारा किती वर चढला आहे, हेच यातून दिसत आहे.If new parliament is “Savarkar Sadan”, then is the old parliament Gandhi – Nehru Bhavan??
आधीच काँग्रेस सह सर्व विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या संसद भवनाचे उद्घाटन करणार म्हणून त्यावर बहिष्कार घातला आहे. पण त्याचवेळी गेल्या 75 वर्षांच्या राजवटीत काँग्रेसच्या किती पंतप्रधानांनी, अध्यक्षांनी आणि मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपती, राज्यपालांना डावलून विधिमंडळांची उद्घाटने केली, पायाभरण्या केल्या, याकडे काँग्रेस नेत्यांनी आणि बाकीच्या विरोधकांनी त्यांच्या सोयीनुसार काणाडोळा केला आहे.
पण पंतप्रधान मोदी हे सावरकर जयंतीच्या मुहूर्तावर नव्या संसद भवनाचे उद्घाटन करणार म्हटल्यानंतर विरोधकांचा पारा मे महिन्यातल्या उन्हापेक्षा वर गेला आहे. त्याच्यातच आता तुषार गांधींच्या जळफळाटी सूचनेची भर पडली आहे.
पण काही झाले तरी शेवटी तुषार गांधी हे महात्मा गांधींचे पणतू आहेत. त्यामुळे त्यांनी जरी संतापाने सूचना केली असली, तरी केंद्रातल्या मोदी सरकारने ती सूचना “गांभीर्याने” घ्यायला काय हरकत आहे??
… आणि तुषार गांधींचे ऐकून मोदी सरकारने जर खरंच नव्या संसद भवनाचे नाव सावरकर सदन ठेवायचे ठरवले, तर मग जुन्या गोलाकार संसद भवनाचे नाव गांधी – नेहरू भवन असे करायचे का?? तिथे नेहरू – गांधींची स्मारके नव्याने उभारायची का??, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतकालात भारताची राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक कुसच बदलत आहेत. भारताचा तथाकथित धर्मनिरपेक्षतेच्या बुरख्याखाली पांघरलेला मुस्लिम लांगुलचालनाचा कुजलेला डाव मोडून काढत आहेत. मग अशावेळी नव्या संसद भवनाला तेजस्वी क्रांतिकारकाचे म्हणजेच सावरकरांचे नाव दिले, तर मग जुन्या गोलाकार संसद भवनाला गांधी – नेहरूंचे नाव द्यायला काय हरकत आहे?? तसेही गांधी – नेहरूंचे विशेषत: नेहरूंचे राजकीय कर्तृत्व त्या गोलाकार संसद भवनातच बहरले होते ना?, मग त्यांची स्मृती तिथे त्यांच्या नावासह जपायला काय हरकत आहे??
गांधी – नेहरूंच्या “इतिहासाचे” जतन!!
कारण सावरकर हे जर भारताचे “वर्तमान” आणि “भविष्य” असतील, तर गांधी – नेहरू हे गेल्या 75 वर्षातला भारताचा “इतिहास” आहेत. मग तो इतिहास जुन्या गोलाकार संसद भवनात त्यांच्याच नावाने जतन केला, तर कोणी काही हरकत घेण्याचेही कारण नाही. तिथे गांधी – नेहरूंचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान “नव्याने अधोरेखित” करता येईल. गांधी – नेहरूंच्या धोरणांचे – निर्णयाचे परिणाम, फाळणी याविषयीचे वेगळे वस्तू संग्रहालय उभारता येईल. त्याचे माहितीपट दाखवण्याची व्यवस्था करता येईल. आणखी बऱ्याच गोष्टी करता येतील. कारण तो गेल्या 75 वर्षातला गांधी – नेहरू प्रभावाखालचा भारताचा “इतिहास” आहे. मग तो जुन्या गोलाकार संसदेत जपायला तुषार गांधी हरकत घेतील काय??, हा सवाल आहे!!, त्याचे उत्तर तुषार गांधी देतील काय??
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App