नाशिक : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितेला संगीतबद्ध केले म्हणून प्रख्यात संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांना ऑल इंडिया रेडिओच्या नोकरीतून काढल्याचा मुद्दा आज तिसऱ्या दिवशीही पुन्हा गाजतो आहे. Hridaynath removed from All India Radio during Congress rule; Shiv Sena’s Sanjay Raut involved in allegations
शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खोटे ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. कारण पंतप्रधान मोदींनी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या मुलाखतीच्या हवाल्याने राज्यसभेत ही कहाणी सांगितली होती. सावरकरांची ने मजसी ने कविता संगीतबद्ध केल्यामुळे हृदयनाथ मंगेशकर यांना आकाशवाणीच्या अर्थात ऑल इंडिया रेडिओच्या नोकरीतून काढून टाकण्यात आले होते, असे वक्तव्य मोदींनी केले आहे.
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी एबीपी माझाच्या कट्ट्यावर मुलाखत देताना संबंधित वक्तव्य केले होते. “ने मजसी ने परत मातृभूमीला” या काव्याला संगीत दिल्यानंतर मला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. मी त्यांना कारण दिले, “फार मोठा कवी फार मोठे काव्य” त्यांनी मला लगेच पत्र दिले, “फार मोठा रस्ता, निघा.” ऑल इंडिया रेडिओच्या तीन महिन्यांच्या नोकरी नंतर मला काढून टाकण्यात आले, असे हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितले होते. याच मुलाखतीचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत काँग्रेसचे वाभाडे काढले होते.
परंतु आता या मुद्यावरून काँग्रेसचे नेते मौनात आहेत. काँग्रेसचा एकही नेता प्रतिक्रिया व्यक्त करायला पुढे आलेला नाही. पंतप्रधान मोदींच्या भाषणातील बाकीच्या मुद्द्यांवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने जोरदार आंदोलन केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर टीकेची झोड उठवली. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राला कोरोनाचा सुपर स्प्रेडर ठरल्याचा आरोप काँग्रेसने केला. परंतु, हृदयनाथ मंगेशकर यांना नोकरीतून काढल्याच्या मुद्द्यावर काँग्रेसचे नेते मौन बाळगून आहेत.
त्याउलट काँग्रेसने जणू आपल्या खांद्यावर जबाबदारी टाकली आहे असा आव आणत संजय राऊत यांनी वादात उडी घेत पंतप्रधान मोदींवर खोटे बोलल्याचा आळ घेतला आहे. सावरकर – हृदयनाथ मंगेशकर या मुद्द्यावर काँग्रेसचे नेते का बोलत नाहीत? आणि शिवसेनेचे प्रवक्ते पुढाकार घेऊन का बोलतात? या विषयावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याचा अर्थ स्वतः हृदयनाथ मंगेशकर यांची मुलाखत आणि त्या हवाल्याने पंतप्रधानांचे निवेदन काँग्रेसला मान्य आहे, असे गृहीत धरायचे का? असा सूचक आणि खोचक प्रश्नही विचारण्यात येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App