डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ “पंचतीर्थ”!!

प्रकाश गाडे

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या सन्मानार्थ केंद्रातील मोदी सरकारने “पंचतीर्थ” विकसित केली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी निगडित अशा 5 स्थळांना विकसित करण्याचे काम नरेंद्र मोदी सरकारने हाती घेतले. त्यातली काही पूर्ण देखील झाली आहेत. बाबासाहेबांच्या जीवनाशी निगडित “पंचतीर्थे” अशी :Dr. “Panchteerth” in honor of Babasaheb Ambedkar

१. भीमजन्मभूमी, महू मध्यप्रदेश.

२०१६ साली १२५ व्या आंबेडकर जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे आले होते. २०१८ मध्ये १२७ व्या आंबेडकर जयंतीदिनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महूला भेट देऊन बाबासाहेबांना अभिवादन केले आहे.

२. भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, दिल्ली.

डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारक हे २६ अलीपूर रोड, दिल्ली येथील राष्ट्रीय स्मारक आहे. हे स्मारक बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित आहे. हे बाबासाहेबांचे निवासस्थान होते. येथेच त्यांचे सन १९५६ मध्ये महापरिनिर्वाण झाले होते, त्यामुळे याला महापरिनिर्वाण स्थळ म्हणूनही ओळखले जाते.

१३ एप्रिल २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. स्मारकातील इमारतीची रचना उघडलेल्या भारतीय संविधानाच्या पुस्तकाप्रमाणे असून हा आकार “ज्ञानाच्या शोधाचे” प्रतीक आहे.

३. दीक्षाभूमी हे भारतीय बौद्धांचे विशेषतः आंबेडकरवादी बौद्ध धर्मीयांचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पवित्र ठिकाणी येऊन बाबासाहेबांना अभिवादन केले.

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दिक्षाभूमीला भेट देऊन बाबासाहेबाना अभिवादन केले आहे.

४. चैत्यभूमी, दादर आणि इंदू मिल स्मारक

चैत्यभूमी या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक स्थळाला फडणवीस सरकारने यांनी “अ” वर्ग पर्यटन आणि तीर्थ स्थळाचा दर्जा दिला. महाराष्ट्र शासनाने २ डिसेंबर २०१६ रोजी याची अंमलबजावणी केली.

इंदू मिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समतेचा पुतळा (स्टॅचू ऑफ इक्वालिटी) हे मुंबई, महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आहे.

हे स्मारक भारताचे पहिले कायदा मंत्री आणि भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ आहे. येथे १३७.३ मीटर (४५० फुट) उंच बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारला जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ ऑक्टोबर २०१५ रोजी स्मारकाचे भूमिपूजन केले. बाबासाहेब आंबेडकर हे समतेचे पुरस्कर्ते असल्यामुळे व समतेसाठी त्यांनी केलेल्या संघर्षासाठी या स्मारकाला “स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी” अर्थात “समतेचा पुतळा” म्हटले आहे. आंबेडकरांचे समाधीस्थळ चैत्यभूमी येथून जवळच आहे.

५. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर जागतिक स्मारक लंडन :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक युनायटेड किंग्डमच्या वायव्य लंडनमधील १० किंग हेनरी मार्गावर असलेले आंतरराष्ट्रीय स्मारक आहे. हे स्मारक बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १४ नोव्हेंबर २०१५ रोजी स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिकत असताना त्यांनी इ.स. १९२१-२२ दरम्यान येथे वास्तव केलेले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निवास केलेली ही ऐतिहासिक वास्तू फडणवीस सरकारने ३५ कोटी रूपयांना खरेदी केली आणि या वास्तूचे एक जागतिक स्मारक म्हणून उद्घाटन किंवा लोकार्पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक १४ नोव्हेंबर २०१५ रोजी करण्यात आले.

तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा आपल्या भावना व्हिजिटर बुकमध्ये नोंदविल्या, “एक ऐतिहासिक दिवस. भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वास्तव केलेले हे घर, जेथे राहून त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण ग्रहण केले. ते घर आज स्मारक म्हणून जनतेकरिता खुले झाले आहे. समता आणि बंधुत्व या आधारावर समाज आणि देश प्रगती करु शकतो हे आपल्या संविधानाच्या माध्यमातून मा. बाबासाहेबांनी अधोरेखित केले आहे.”

महू, दिल्ली, मुंबई आणि लंडन येथील स्मारके फक्त केंद्रातल्या आणि राज्यातल्या भाजप सरकारच्या काळातील आहेत. दीक्षाभूमी ही बौद्ध अनुयायांनी उभी केली आहे. त्या दीक्षाभूमीत काँग्रेसच्या गांधी घराण्यातील व्यक्तींनी आजपर्यंत एकदाही भेट दिली नाही.

131 व्या जयंतीनिमित्त महामानवाला विनम्र अभिवादन!

#राष्ट्रनायक_अम्बेडकर. सप्रेम जय भीम!

(सौजन्य : फेसबुक)

Dr. “Panchteerth” in honor of Babasaheb Ambedkar

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात