2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणुका जाहीर होण्यापूर्वी भाजपने उमेदवारांच्या पहिल्या दोन याद्या जाहीर केल्या. त्या याद्यांमधून भाजपने जेवढ्या खासदारांची तिकिटे कापली, तेवढी तिकिटे वाटण्याची काँग्रेस सोडून इतर प्रादेशिक पक्षांची क्षमता तरी आहे का??, हे विचारायची वेळ यासाठी आली आहे की, याच प्रादेशिक पक्षांचे नेते आपल्या दंडात नसलेल्या बेटकुळ्या काढून भाजपला फार मोठे आव्हान निर्माण करण्याची भाषा करत आहेत!! (येथे प्रादेशिक पक्षांची जिंकून येण्याची क्षमता आहे का??, हा प्रश्न विचारलेला नाही.)BJP cut tickets of 63 MPs, so regional parties have guts to field that much candidates in a fray??
लोकसभेच्या निवडणुका प्रत्यक्ष जाहीर होण्यापूर्वी भाजपने उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या. भाजपची पहिली यादी 195 उमेदवारांची होती आणि दुसरी यादी 72 उमेदवारांची होती. यापैकी पहिल्या यादीत भाजपने 33 खासदारांची तिकिटे कापली होती, तर दुसऱ्या यादीत 30 खासदारांची तिकिटे कापलेली आढळली. याचा अर्थ भाजपने एकूण 267 उमेदवार जाहीर केले. त्यापैकी 63 उमेदवार नवे असे प्रमाण ठेवले. याचा अर्थ विद्यमान 63 खासदारांची तिकिटे भाजपने कापली. त्यातून भाजप विरोधातला बंडखोरीचा सूर अद्याप तरी कुठूनही निघालेला नाही. पण तो भाग अलहिदा.
भाजपने 63 खासदारांची तिकिटे कापली याचा अर्थ विरोधकांनी भाजपवर जे अँटी इन्कमबन्सीचे हत्यार चालवायचे, ते हत्यार भाजपने स्वतःहून आपल्याच खासदारांवर चालविले. पण विरोधकांच्या हातातले अँटी इन्कमबन्सीचे हत्यार पूर्ण काढून घेतले.
काहीच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत मंडपम मधून संपूर्ण देशभरातल्या भाजपच्या बूथप्रमुखांशी त्यामध्ये त्यांनी सूचक उद्गार काढले होते. भाजपचे कमळ चिन्ह हाच उमेदवार समजून तुम्ही काम सुरू करा. कमळ चिन्ह हाच उमेदवार आहे. यावर लक्ष केंद्रित करा, हे ते उद्गार होते. याचा अर्थच उमेदवार कोण आहे?? यापेक्षा चिन्ह कोणते आहे??, यावर नरेंद्र मोदींनी भर दिला. अर्थातच लोकसभेची निवडणूक त्यांनी उमेदवार केंद्रीत उरूच दिली नाही. त्यामुळे स्वतःचे विशिष्ट महत्त्व राखून मतदारसंघांमध्ये रुबाब गाजवणाऱ्या पण पक्षासाठी धोका उत्पन्न केलेल्या खासदारांना धक्का देणे भाजपला शक्य झाले. पण त्याच वेळी त्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये खासदारांविषयीच्या नाराजीचे रूपांतर सरकार वरच्या नाराजी मध्ये करण्याची विरोधकांची संधी भाजपने काढून घेतली.
भाजपने पहिल्या दोन याद्यांमध्ये 63 खासदारांची तिकीटे कापली. तेवढे उमेदवार जाहीर करण्याची कुठल्याच प्रादेशिक पक्षांची क्षमता नाही. (मायावतींचा बहुजन समाज पक्ष यात गृहीत धरलेला नाही कारण त्यांच्या पक्ष “राष्ट्रीय” आहे.)
देशातला सर्वांत मोठा प्रादेशिक पक्ष अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशात 22 जागांची उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. अजून फार तर ते 30 जागांची यादी जाहीर करू शकतात. ममता बॅनर्जींच्या तृणमूळ काँग्रेसने पश्चिम बंगाल मधल्या 42 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्याखेरीज ममता बॅनर्जी ईशान्यकडच्या एक-दोन राज्यांमध्ये तृणामूळ काँग्रेसचे उमेदवार उभे करणार आहेत, पण ती संख्या 63 पर्यंत जाण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण तेवढी तृणमूळ काँग्रेसची ताकदच नाही. बाकीचे सगळे प्रादेशिक पक्ष समाजवादी पार्टी किंवा तृणमूळ काँग्रेसच्या ताकदीच्या जवळपासही पोचू शकत नाहीत.
उदाहरणार्थ तामिळनाडूतला द्रविड मुन्नेत्र कळघम, दिल्ली आणि पंजाब मधली आम आदमी पार्टी, ओडिशातला बिजू जनता दल, बिहार मधला राष्ट्रीय जनता दल, झारखंड मधला झारखंड मुक्ती मोर्चा, महाराष्ट्रातले शिवसेनेचे दोन्ही गट आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट हे पक्ष विशिष्ट ताकद राखून असले तरी त्यांची ताकद भाजप आणि काँग्रेसच्या आसपास जाणे सोडाच, तृणमूळ काँग्रेसच्या एकूण ताकदीच्या जवळपासही पोहोचत नाही. कारण यापैकी एकही पक्ष 25 ते 30 आकड्या पलीकडचे उमेदवार जाहीर करण्याच्या क्षमतेचाही नाही. त्यातही महाराष्ट्रातले उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फुटल्याने त्यांची क्षमता दोन्ही मिळून 25 उमेदवार जाहीर करण्याचीही नाही.
पण या प्रादेशिक पक्षांच्या सगळ्या नेत्यांची भाषा मात्र पंतप्रधान मोदींच्या भाजप समोर प्रचंड मोठ्या आव्हान निर्माण करण्याचे आहे. अर्थातच लोकसभा निवडणुकांचा निकाल काय लागेल??, यासाठी फार मोठ्या सेफॉलॉजीचा किंवा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करण्याची गरज नाही. प्रादेशिक पक्षांच्या नेमक्या क्षमतेचा अभ्यास केला, तर त्याचे उत्तर सहज मिळू शकेल. त्यासाठी काँग्रेसच्या क्षमतेचा वेगळा अभ्यास करण्याचीही गरज नाही!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App