फेसबुक लाइव्ह करताना उद्धव ठाकरेंची का तंतरली?


शंका, कुशंका, खाचाखोचा तर बऱ्याच आहेत. अन्यथा दोन आठवडे अत्यंत confidence ने फेसबुक लाइव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांची भंबेरी आज अचानक फेसबुक लाइव्ह करताना दिसली नसती..!


विनय झोडगे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार ) दुपारी म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी फेसबुक लाइव्ह केले. पण पालघर प्रकरणावर खुलासे देतादेता त्यांची चांगलीच तंतरलेली दिसत होती. असे काय कारण घडले असावे? की दोन – तीन आठवडे नियमितपणे confidance ने फेसबुक लाइव्ह करणारे उद्धव ठाकरे आजच्या फेसबुक लाइव्हमध्ये मात्र गडबडलेले दिसले. किंबहुना आजचे फेसबुक लाइव्ह आवरते घेतानाही दिसले.

वास्तविक कोरोनाचा उद्भव भारतात, महाराष्ट्रात झाल्यानंतर उद्धव ठाकरे बरेच active झाल्याचे दिसले. पहिले १० – १५ दिवस तर त्यांनी प्रशासनावर पकड घेतल्याचेही जाणवले. त्यावेळी त्यांच्या प्रत्येक फेसबुक लाइव्ह गणिक त्यांचा आत्मविश्वास दुणावल्याचेही जाणवत होते. त्यांच्या संवादांशी महाराष्ट्राची जनताही सहमत होताना दिसत होती. एवढेच नाही तर याच काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील त्यांचा संवाद चांगला चालल्याचे जाणवत होते.

मग आताच असे काय झाले? की आजच्या फेसबुक लाइव्ह दरम्यान त्यांची गडबड व्हावी…!! पालघर प्रकरणावरून खुलासा देताना एवढी भंबेरी उडावी…!! पालघरमध्ये जे घडले ते वाईटच आहे. निंदनीयच आहे. पण त्याची निंदा करायला तीन दिवस का लागावेत? १७ तारखेला पकडलेल्या आरोपींची माहिती २० तारखेला मीडियाला का मिळावी? त्याचा उल्लेख हातात कागद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फेसबुक लाइव्हमध्ये का करा़यला लागावा? खरे तर या मागचे इंगित शोधले पाहिजे.

उद्धव ठाकरे यांच्या भंबेरीमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे फोन आहेत काय? योगी आदित्यनाथ यांनी फोनवर पालघरचा विषय काढला असणार हे उघड आहे. स्वत: उद्धव ठाकरे यांनी देखील तसे फेसबुक लाइव्हमध्ये सांगितले. पण… अमित शहांनी फोनवर फक्त आणि फक्त पालघरचाच विषय काढला असेल…?? अन्य कोणतेही विषय काढले नसतील? मुख्यमंत्र्यांची आमदार म्हणून राज्यपालांकडून नियुक्ती वगैरे…!! की कोरोनाग्रस्तांच्या मुंबईतील आकड्याचे गौडबंगाल…?? हा विषय तर अमित शहांनी काढला नसेल ना…?? कारण उद्धव ठाकरे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. पण शिवसेनेच्या पोपटाचा प्राण मुंबई महापालिकेतल्या सत्तेमध्ये आहे…!! अमित शहांकडून ती नस तर दाबली गेली नसेल ना.! की आणखी काही.!

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले तरी राज्याचे गृहमंत्री राष्ट्रवादीचे आहेत. सगळी कागदपत्रे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत असतील.? की आडमार्गाने scrutiny साठी वेगळ्या पत्यावर पोहोचून मग मुख्यमंत्र्यांच्या हातात पडत असतील..? त्या शिवाय पालघरमधील घटनेचे वेगवेगळे पदर उलगडायला तीन दिवस लागले नसते.

शंका, कुशंका, खाचाखोचा तर बऱ्याच आहेत. अन्यथा दोन आठवडे अत्यंत confidence ने फेसबुक लाइव्ह करणाऱ्या उद्धव ठाकरे यांची भंबेरी आज अचानक फेसबुक लाइव्ह करताना दिसली नसती…!!

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात