संस्कृती रक्षणासाठी पुढे येणारे हात तिच्या रक्षणाला का नाही पुढे आले?

भूवनेश्वरी

Women empowerment, feminism, respect the women याला support करणाऱ्या आणि त्याच्यावर बोलणाऱ्या लोकांच्या आत्ताच कशा दातखिळी बसल्या आहेत! Womens character is her own jewelary

बरोबर महिन्याभरापूर्वी स्त्रीचा आदर करा, स्त्रीला support करा, she do whatever she wants, she’s a free will. Happy women’s day असं wish करत नारे लावणाऱ्या लोकांच्या तोंडाला आत्ताच कुलूप कसे बसले. जेव्हा खऱ्या अर्थाने तिला मदत करण्याची गरज होती?

दिल्लीमध्ये घडलेल्या प्रकारात career women नीलूची हत्या पाहणारे, मूक गिळून गप्प बसणारे आणि अलिप्तपणे निघून जाणारे षंढ माणसांचे हात तिच्या बचावासाठी नाही आले तर तिच्या निर्घृण हत्येचा video काढण्यासाठी पुढे आले. आपल्या समाजाची ही भयानक मानसिकता किती रसातळाला पोहचली आहे. हेच यातून दिसते.

स्वतःचा मार्ग independent way ने स्वीकारु पाहणाऱ्या बाईचा स्वाभिमान हा आजही पुरुषाचा ego दुखवतो. समाजातून घातली गेलेली बंधने, घरातून काळजीचे येणारे pressure आणि धर्माने लादलेल्या अटी हे सगळं सांभाळत ती जेव्हा उठायचा प्रयत्न करते तेव्हा तिच्या character वर बोटं ठेवली जातात. आणि जेव्हा ती हे सगळे ठामपणे नाकारून उठण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तिला मदतीचा हात देण्याऐवजी तिची हत्या केली जाते.

“Women’s character is her own jewelry” हा tag तिच्या जन्मसोबतच तिला लागून येतो. पण जन्मतः गळ्यात अडकवून फिरणाऱ्या पुरुषत्वाचा माज हा त्याने काहीही केले तरी “तो पुरुष आहे, त्याचा पाय घसरणारचं” असे म्हणून सगळा समाज पुढे निघून जातो. तेव्हा आपल्याच समाजाच्या दांभिकतेचा प्रचंड संताप येतो.

आई बाप जेव्हा विश्वासाने तिचा हात त्याचा हातात देतात आणि जेव्हा तो त्याच हातांनी She deserves it” असं म्हणत चार- चौघात सपासप सुरे चालवून तिला मारतो. तेव्हा हेच चार- चौघे internal matter आहे असे सांगत हात वर करत video काढत निघून जातात, धाडकन दुकानाचे shutter बंद करतात. तेव्हा यांचा equality जपणारा धर्म कुठे जातो?

मुलं होत नाहीत असे म्हणत एखाद्या तांत्रिकाकडे किंवा ढोंगी बाबाकडे नेऊन तिला torture करत तिला आत्महत्येला प्रवृत्त करतात तेव्हा त्यांची दांभिकता आणि अंधश्रद्धा असाच संताप निर्माण करते.

आणि या वेळेस जाणवते द्रौपदीने भीष्माचार्य, कृपाचार्य आणि श्रीकृष्ण यांना विचारलेला प्रश्नाचे महत्व. “शास्त्र जर स्त्रियांनी रचले असते, तर आता होणारी स्त्रियांची ही विटंबना झाली असती का?” आणि या तिच्या प्रश्नांवर तीनही गुरूंना मौन स्वीकारावे लागले होते. ही घटना समाजासमोर धर्माचा आरसा धरते आणि त्यात समाजाचे विद्रुप प्रतिबिंब दिसते. महाभारत होऊन जरी पाच हजार वर्षे झाली असली तरी स्त्रीच्या अंतर्मनात सतत सुरू असलेले “हे महाभारत” कधी संपणार हा प्रश्न अता मनाला अजून गांभीर्याने भेडसावतो.

Womens character is her own jewelary