पराभव कुणाचा?


२०० पेक्षा जास्त जागा जिंकून सत्ता स्थापन करण्याचा दावा करणारा भाजप आणि माझ्या सारखे भाजप समर्थक यांचा पराभव झाला आहे आणि तो जिव्हारी लागला आहे यात शंका नाही. आमच्या सोबत कोण कोण पराभूत झाले आहे ते पाहू. Whose defeat in West Bengal?

१. ममता बॅनर्जी‌. त्या नंदिग्राम मधे पराभूत झाल्या

२. डावे पक्ष आणि काॅंग्रेस.

३. बंगालची जनता. पुन्हा ममतांनाच आपली पसंती देऊन जनतेने पायावर धोंडा पाडून घेतला आहे कारण

अ. बंगाल ची अर्थव्यवस्था देशाच्या सरासरी पेक्षा कमी दराने वाढत असून शहरातील रोजगाराची अवस्था वाईट आहे.

ब. बंगालमधील गुन्हेगारी वाढली आहे

क. बंगाल मधे ४०% जनता दारिद्र्य रेषेखाली आहे

४. राष्ट्रवाद. बंगाल मध्ये राष्ट्रवाद पराभूत झाला. बंगाल मध्ये करोडो बांगलादेशी अवैधरित्या रहात आहेत. त्यातील अनेक मतदान करतात. अनेकजण अवैध धंदे (गो तस्करी) करतात. त्यांचा छडा लावण्यासाठी NRC ची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. मात्र ममतांनी त्याचा विरोध केला आहे. याच बांगलादेशी मतदारांच्या आधारावर तृणमूल ने विजय मिळवला आहे.



भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांना जर हे बांगलादेशी घुसखोर आपले वाटत असतील तर तो राष्ट्रवादाचा मोठा पराभव आहे. पंजाब मध्ये काॅंग्रेसनेच भिंद्रनवालेला पाठिंबा दिला. पुढे काय झाले ते आपणास माहीत आहे. तसेच अफगाणिस्तान मधे घुसलेल्या रशियाचा पराभव करण्यासाठी अमेरिकेने तालिबानला मदत केली. हेच तालिबानी अमेरिकेवर कसे उलटले आणि जगात त्यांनी काय धुमाकूळ घातला आहे ते वेगळे सांगण्याची गरज नाही.

आणि म्हणून बांगलादेशी घुसखोरांचे लाड करणारे सरकार बंगाल मधे असणे हा राष्ट्रवादाचा मोठा पराभव आहे. याची फार मोठी किंमत देशाला चुकवावी लागेल. तालिबानला बळ देण्याची अमेरिकेने आणि भिंद्रनवाले ला मदत करण्याची इंदिरा गांधी यांनी चुकविली तशीच.

भाजप का पराभूत झाला असावा?
१. मुस्लिम मते एकगठ्ठा तृणमूल कडे वळली

२. महिलांची मते भाजपकडे वळली नाहीत

३. खजिन्यातील तूट वाढवून फुकटची अनुदाने ग्रामीण भागात वाटून ममता यांनी मतदार आपल्या पक्षाशी बांधून ठेवला.

पुढे काय?
भाजपला आपल्या कार्यकर्त्यांचे संरक्षण करावे लागणार. भाजपच्या कार्यकर्त्यांना विविध मार्गांनी छळण्यात येईल.
विरोधी पक्ष म्हणून भाजपला फडणवीसांसारखे काम करावे लागेल.
संघटना मजबूत करावी लागेल.
राज्यांच्या विरोधाला न जुमानता NRC ची अंमलबजावणी करून मतदार याद्या अद्ययावत कराव्या लागतील.

बंगालमधील राष्ट्रद्रोही सरकार देशाच्या सार्वभौमत्वाला धोकादायक ठरू शकते हे विसरून चालणार नाही.

Whose defeat in West Bengal ?

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात