सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात “मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा”च्या बरोबर उलटे घडताना दिसत आहे… त्यामुळेच या विषयाचे शीर्षक “वायले सूर हमारे तुम्हारे तो सुर बने बिखरे”, असे दिले आहे…!! Violet sur our yours; So the tune became scattered!!
शिवसेना – राणा दाम्पत्यांच्या संघर्ष अख्ख्या शिवसेनेचा एकच आक्रस्ताळा सूर वाजत असताना राष्ट्रवादीचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र आपले वेगळेच म्हणजे वायले सूर लावले आहेत… दिलीप वळसे पाटील यांचा सूर नेहमीप्रमाणे सौम्य आहे. किरीट सोमय्यांनी राणा दाम्पत्याला भेटायला जायला नको होते. शिवसैनिकांनी दगड हातात घ्यायला नको होता. राणा दाम्पत्याने यांनी चिथावणीखोर भाषण करायला नको होते वगैरे “सौम्य सूर” दिलीप वळसे पाटील यांनी परवापासून लावला आहे.
तसाच काहीसा वेगळा सूर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लावला आहे. जे घडायला नको होते तेच घडले… प्रत्येक वेळी कायद्याचा बांबू घातलाच पाहिजे असे नाही, असा सूर अजितदादांनी आळवला आहे. हा सूर सरळ-सरळ राष्ट्रवादीचा नेत्यांच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या विरोधातला आहे…!!
एकीकडे महाविकास आघाडीत दिलीप वळसे पाटील आणि अजित दादांचा असे वायले सूर निघाले असताना दुसरीकडे केंद्रातल्या सत्ताधारी भाजपबरोबर मंत्रीपद भोगणाऱ्या रामदास आठवले यांनी वायला सूर मनसेबाबत काढला आहे. मनसे आणि भाजप नेत्यांच्या उघड आणि छुप्या युतीची चर्चा सुरू असताना रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात सूर लावला आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका मांडली आहे ना… मग आम्ही मशिदींवरच्या भोंग्यांचे संरक्षण करू. अजानला विरोध करण्याचे कारण नाही. मनसे आणि भाजपची युती शक्य नाही. त्यापेक्षा भाजपने रिपब्लिकन पक्षाची युती करून मुंबईचे उपमहापौर पद आम्हाला द्यावे, अशी मागणी करणारा सूर रामदास आठवले यांनी लावला आहे.
त्याच वेळी रामदास आठवले यांनी एक वायला उपसूर शरद पवारांचा संदर्भात देखील लावला आहे. शरद पवार स्वतः जातिवादी नाहीत पण त्यांच्या भोवती जातिवादी माणसे आहेत, असा “शोध सूर” रामदास आठवले यांनी लावला आहे. इतकेच नव्हे तर अमोल मिटकरी ब्राह्मण विरोधात गरळ ओकायला नको होते, असाही सूर रामदास आठवले यांनी लावला आहे.
केंद्रापासून गावापर्यंत सगळीकडे भाजपला विरोध करायचे ठरवून आम आदमी पार्टीने शिवसेनेच्या बाजूने सूर लावला आहे. राणा दाम्पत्याला आपल्या तक्रारींमुळे अटक केल्याचा दावाही आम आदमी पार्टीच्या सुरात मिसळला आहे.
एकूण महाराष्ट्राच्या महाघमासानात सत्ताधारी आणि विरोधी या दोन्ही गटांमध्ये “मिले सूर मेरा तुम्हारा”च्या ऐवजी “वायले सूर हमारे तुम्हारे तो सूर बने बिखरे!!” हेच सध्या सुरू असल्याचे दिसत आहे…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App