“अंदमान”, “ने मजसी ने”च्या पलिकडचे सावरकर; Transfer of Power च्या Negotiations मध्ये ब्रिटिशांना टक्कर देणारे…!!


या लेखाचे शीर्षक कदाचित सावरकरप्रेमींना खटकेल. पण ही वस्तूस्थिती आहे, की सावरकरांना सावरकरप्रेमींनी “अंदमान आणि “ने मजसी ने”मध्ये अडकवून ठेवलेय आणि विरोधकांनी “माफीनाम्यात आणि गांधी हत्येच्या कटा”त अडकवून ठेवलेय. सावरकरांची दोन्हीकडून झालेली ही प्रतिमाहानी आहे. अर्थात सावरकरप्रेमींनी अज्ञानातून किंवा अतिप्रेमातून हे केलेय तर सावरकरविरोधकांनी अतिशय धूर्तपणे सावरकरांना “माफीनामा” आणि “गांधीहत्येच्या कटा”त अडकवून ठेवलेय. पण सावरकर त्या पलिकडे कितीतरी विशाल भूमिकेचे आणि प्रतिमेपलिकडचे नेते आहेत. सावरकरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या या काहीशा अज्ञात आणि दुर्लक्षित पैलूंवर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न… भाग १. Veer Savarkar, Tough Negotiator in Transfer of Power Negotiations with the British


“माझी मार्सेलिसची उडी एकवेळ विसरलात तरी चालेल पण माझे सामाजिक विचार विसरू नका,” हे स्वतः सावरकरांनी लिहून ठेवलेय याचा बराच खोल अर्थ आहे. सावरकरांच्या सामाजिक विचारांची व्याप्ती राष्ट्रीयत्वापर्यंत आणि भारताच्या अखंडत्वापर्यंत पोहोचते. आजच्या कॉर्पोरेट भाषेत बोलायचे झाले, तर हाच त्यातला Big Thought आणि Take Away आहे. आणि तो “अंदमान” आणि “ने मजसी ने”च्या पलिकडे जाऊन पोहोचलेला आहे.

सावरकर Tough Negotiator होते. ब्रिटिशांशी Transfer of Power च्या वाटाघाटी करताना गांधी, नेहरू, पटेल यांच्या इतकाच सावरकरांचाही मोलाचा वाटा होता. या पैलूकडे इतिहासकारांचे दुर्लक्ष झाले आहे. भारताच्या सत्तातंराच्या प्रयत्नांमध्ये सावरकरांनी वास्तववादी आणि रोखठोक भूमिका घेतली होती. हे त्यांच्या निवेदनांमधून, लेखनातून आणि मुलाखतींमधून स्पष्ट होते. पण आजवर त्याकडे दुर्लक्ष झाले आहे किंबहुना त्यावर डाव्या इतिहासकारांनी पडदा टाकून ठेवला आहे. पण तो आता मूळ कागदपत्रे, विविध सचिवांचे लेखन, त्यावेळच्या British Movietone, Indian Movietone यांच्या film clips यातून उलगडतो आहे. यातली अनेक कागदपत्रे नवी दिल्लीच्या नेहरू मेमोरिअलमध्ये संशोधकांसाठी उपलब्ध आहेत.

१९६६ साली निधन झालेल्या सावरकरांचे चित्रीकरण उपलब्ध नाही, ही बाब खटकणारी होतीच. पण त्यामुळे इतिहासावर देखील नेमका प्रकाश पडत नव्हता. पण सावरकरांच्या आता काही film clips उपलब्ध झाल्या आहेत. यातून सावरकर हे Transfer of Power च्या Negotiations मध्ये ते किती सक्रीय होते, यावर प्रकाश पडतो.

यातला Take Away असा की सावरकर हे अखंड भारताच्या भूमिकेविषयी तडजोड करायला तयार नव्हते. प्रांतांची स्वायत्तता त्यांना भारतीय राज्यघटनेच्या चौकटीतच मान्य होती. प्रांतांनी स्वतंत्र कारभार करायला त्यांची हरकत नव्हती. पण कोणत्याही प्रांताला भारतीय संघराज्यातून फुटून निघण्याचा अधिकार सावरकरांना मान्य नव्हता. याची साक्ष स्वतः सावरकरांच्या निवेदनातून मिळतेच, पण सरदार वल्लभभाई पटेल यांचे सचिव व्ही. पी. मेनन यांच्या लेखनातूनही मिळते आहे. १९४२ मध्ये क्रिप्स मिशनबरोबर झालेल्या वाटाघाटींचा तपशील जो व्ही. पी. मेनन यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिला आहे, त्यामध्ये सावरकरांच्या भूमिकेविषयी सविस्तर उहापोह करण्यात आला आहे. सावरकरांनी सर स्ट्रॅफोर्ड क्रिप्सला लिहिलेल्या पत्रातील मुद्द्यांवर मेनन यांनी “भारताची वास्तववादी राष्ट्रीय भूमिका” म्हणून भाष्य केले आहे.

याखेरीज क्रिप्स मिशनच्या केलेल्या वाटाघाटींच्या चित्रीकरणात सावरकरांची भूमिका अधोरेखित होते. British Movietone चा समालोचक सावरकरांचा उल्लेख सावरकर, Redoubtable Champion of Hindu Mahasabha असा करताना आढळतो. याचे संपूर्ण चित्रीकरण Huntley archives वर उपलब्ध आहे.

भारताच्या Transfer of Power च्या Negotiations मध्ये फक्त काँग्रेस आणि मुस्लीम लीग हे दोनच पक्ष नव्हते, तर हिंदू महासभा हा पक्षही तितकाच महत्त्वाचा घटक होता. भारताच्या अखंडत्वाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड या पक्षाला मान्य नव्हती. हे या चित्रीकरणातून देखील दिसते.

सावरकरांनी दिल्ली आणि लखनौमध्ये Unitiy Conferences म्हणजे अखंड भारत परिषदा भरविल्या होत्या. या दोन्हीची चित्रीकरणे British Movietone च्या News reels मध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये सहभागी झालेल्या नेत्यांची नावे जरी बघितली तरी त्यांची मोठी राजकीय व्याप्ती लक्षात येते. या परिषदांमध्ये चक्रवर्ती राजगोपालाचारी, डॉ. अन्सारी, सिंध प्रांतांचे मुख्यमंत्री अल्लाबक्ष सुम्रो, कन्हैयालाल मुन्शी, पंजाबचे नेते मास्टर तारासिंग, रायबहादूर मेहेरचंद खन्ना, श्यामा प्रसाद मुखर्जी, डॉ. मुंजे, भाई परमानंद, बॅ. एन. सी. चटर्जी, बंगालचे मुख्यमंत्री फजलूल हक, राजा महेश्वर दयाळ, तेजबहादूर सप्रू, कामगार नेते एन. एम. जोशी आदी नेते सहभागी झाले होते. सावरकर या परिषदांचे प्रमुख नेते होते.

या परिषदांची नुसती वर्णने सावरकर चरित्रात होती. पण त्याचे सविस्तर तपशील आता डिजिटली film clips च्या रूपात उपलब्ध झाल्याने त्यांचे राजकीय आणि ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होते आहे. काँग्रेसी आणि डाव्या इतिहासकारांनी मात्र, नंतर इतिहास लिहिताना त्यातून सावरकर आणि हिंदू महासभा यांना राजकीय चतुराईने वगळून टाकले आहे. तर सावरकरप्रेमी इतिहासकारांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.

Veer Savarkar, Tough Negotiator in Transfer of Power Negotiations with the British

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात