मनी मॅटर्स : कोणत्याही परिस्थीतीत म्युच्युअल फंडातील गुंतवणूक थांबवू नका


कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे जगात पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे. जगभरातील शेअर बाजारात रोज याचे पडसाद उमटत आहेत. अशा वेळी आहे ते पैसे नीट पद्धतीने टिकवून ठेवणे फार गरजेचे आहे.Under no circumstances should you stop investing in a mutual fund

ज्यांच्याकडे अतिरिक्त निधी आहे त्यांनी त्याचा वापर अत्यंत काटेकोरपणे करायला हवा. त्यातही ज्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करायची आहे त्या प्रत्येकाने सध्याच्या परिस्थितीत या बाबी तपासण्याची व त्यानुसार पावले टाकण्याची गरज आहे. तुमच्याकडे अतिरिक्त निधी उपलब्ध असेल तर टप्प्याटप्प्याने बाजारात गुंतवणूक करण्याचा नक्कीच विचार करू शकता.

बाजारातील प्रत्येक पडझडीत खरेदी करा. मात्र मालमत्ता विभाजन म्हणजेच अॅसेट अॅलोकेशन करायला विसरू नका. लिक्विड फंडाकडून काही पैसे इक्विटी फंडामध्ये वळवा. तुमच्याकडे अतिरिक्त निधी उपलब्ध नसेल मात्र मार्केटमधील संधीचा फायदा घ्यायचा असेल तर एफडीतील काही रक्कम इक्विटीकडे वळवू शकता. मात्र, निश्चित उत्पन्न देणाऱ्या एफडी, पीएफ, पीपीएफ किंवा एनएससीसारख्या योजनांमध्ये मोठा हिस्सा गुंतवला असेल तर आणि तरच सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी इक्विटीकडे वळा. अॅसेट अॅलोकेशन योग्यप्रकारे केले असेल आणि गेल्या तीन ते चार वर्षात बाजारात मोठी गुंतवणूक केली असेल. शिवाय आणखी गुंतवणूक वाढवायची इच्छा नसेल तर शांत राहा.

बाजारात घडामोडी घडल्या म्हणून आपण देखील काहीतरी केले पाहिजेच असे नाही. बाजारातील परिस्थिती काही महिन्यात निवळेल तसा बाजार पुन्हा तेजीची वाट धरेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक थांबवू नका. सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे म्हणजेच एसआयपीतून सुरु असलेली गुंतवणूक सुरूच ठेवा किंवा एनएव्ही कमी झाल्याने त्यातील गुंतवणूक आणखी वाढवा.

Under no circumstances should you stop investing in a mutual fund

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात