महाराष्ट्रात लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराच्या निमित्ताने एक वेगळीच लावणी सादर होताना दिसते आहे… नटरंग सिनेमाने “मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा”, ही लावणी गाजवली होती… त्याच धर्तीवर आधारित “मला बोलवा ना तरी, लता मंगेशकर पुरस्कारा”, अशी नवी लावणी आता राष्ट्रवादी काँग्रेस गाजवते आहे…!! Uddhav Thackeray and Sharad Pawar didn’t get invite at Lata Deenanath Mangeshkar award function; NCP leaders Unrest came in open
त्याचे झाले असे… लता दीनानाथ मंगेशकर पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंगेशकर कुटुंबियांनी जाहीर केला. त्याचा शानदार सोहळा मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात झाला. पण या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हजर नव्हते. म्हणजे त्यांना निमंत्रण दिले नव्हते. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचा त्यांच्या कुटुंबीयांचा कार्यक्रम आणि त्याला मुख्यमंत्र्यांना आणि शरद पवारांना निमंत्रण नाही… तरीही कार्यक्रम यशस्वी. त्याला मोठी प्रसिद्धी… हे पाहून जितेंद्र आव्हाड आधी खळवले… महाराष्ट्रात राहून प्रसिद्धी कमवायची आणि मुख्यमंत्र्यांना बोलवायचे नाही हा महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचा अपमान आहे, असे ट्विट करून त्यांनी चिडचिड केली…!!
पण त्या पलिकडे जाऊन शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांनी “सभ्य” भाषेत पण खोचक ट्विट केले. लतादीदींचे आणि पवार साहेबांचेही तितकेच जिव्हाळ्याचे संबंध होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पवार साहेब जर कार्यक्रमाला हजर राहिले असते तर अधिक चांगले झाले, असते असे रोहित पवार यांचे ट्विट आहे. (लतादीदींचे आणि पवार साहेबांचे उत्तम संबंध होते… हे सांगावे लागते… यातच सगळे आले.)
पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' मिळाल्याबद्दल पंतप्रधान @narendramodi साहेबांचं मनःपूर्वक अभिनंदन! शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आणि देशात प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव असलेले एकमेव नेते आदरणीय पवार साहेब यांच्याशीही गानसम्राज्ञी लतादीदी यांचे तेवढेच जिव्हाळ्याचे संबंध होते. pic.twitter.com/Q1qktSdukw — Rohit Pawar (@RRPSpeaks) April 24, 2022
पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' मिळाल्याबद्दल पंतप्रधान @narendramodi साहेबांचं मनःपूर्वक अभिनंदन! शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आणि देशात प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव असलेले एकमेव नेते आदरणीय पवार साहेब यांच्याशीही गानसम्राज्ञी लतादीदी यांचे तेवढेच जिव्हाळ्याचे संबंध होते. pic.twitter.com/Q1qktSdukw
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 24, 2022
जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार या दोघांचा ट्विट मधून राष्ट्रवादी काँग्रेस मधील खरी अस्वस्थता आज बाहेर आली आहे…!! महाराष्ट्रात आम्हालाही विचारा. कार्यक्रमाचे आम्हालाही निमंत्रण द्या, अशीच “मागणी” करण्याची वेळ राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आली आहे. आपल्याला न बोलवताही कार्यक्रम यशस्वी होतो, ही त्यांची खंत आणि चिडचिडही बाहेर आली आहे…!! खरं म्हणजे पवार साहेबांच्या प्रतिमेला त्यामुळे धक्का बसल्याची भीती त्यांना वाटते आहे…!!
वास्तविक पाहता या कार्यक्रमाला निमंत्रण नसण्याची घटना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय चतुराईने हाताळली. किंबहुना त्यांनी आपल्यातली राजकीय मुत्सद्देगिरी या निमित्ताने दाखवून दिली. एरवी पवारांना त्यांच्या पक्षातले नेते आणि “पवार मीडिया” “चाणक्य” म्हणत असतात. पण प्रत्यक्षातली “चाणक्यगिरी” या वेळी उद्धव ठाकरे यांनी दाखवली…!!
लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कार्यक्रमाला निमंत्रण नव्हते. मीडियाचा सगळा फोकस त्या कार्यक्रमावर होता. आपल्यावरचा लाईम लाईट हटला असता याची पक्की कल्पना आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नेमक्या त्याच वेळी शिवसेनेच्या फायर आजींना भेटण्याचा निर्णय घेतला. ते फायर आजींना त्यांच्या घरी जाऊन भेटले. लतादीदींनी विषयी चकार शब्द न काढता ते फायर आजींना भेटले. मीडियाने या भेटीला ही जोरदार प्रसिद्धी दिली. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे आपल्याला निमंत्रण नसण्याने शिवसेना पक्षप्रमुख म्हणून आपल्याला काही फरक पडत नाही, हेच एका भेटीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजकीय कृतीतून दाखवून दिले…!!
लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव टाकण्याच मंगेशकर कुटुंबीयांनी टाळले.त्यांची ही भूमिका अगम्य आहे.या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे.#निषेद pic.twitter.com/xVarHhGfou — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 24, 2022
लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव टाकण्याच मंगेशकर कुटुंबीयांनी टाळले.त्यांची ही भूमिका अगम्य आहे.या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे.#निषेद pic.twitter.com/xVarHhGfou
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 24, 2022
आणि नेमके हेच शरद पवारांना जमले नाही. त्यातूनच जितेंद्र आव्हाड यांची चिडचिड झाली आणि रोहित पवारांसारख्या तरुण आमदाराची तगमग आणि तडपड झाली…!! आधीच कोल्हापूरचा भव्यदिव्य कार्यक्रमाचा मीडियाने वेगळ्या प्रकारे विचका करून टाकला होता. कोल्हापूर बाहेर त्याला फारशी प्रसिद्धी देखील मिळाले नाही. मीडियाचे सगळे फुटेज शिवसेना आणि राणा कुटुंबाने खाऊन टाकले होते. त्यातच लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराच्या कार्यक्रमाचे निमंत्रण पवार साहेबांना नसण्याची भर पडली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांचा खरा तडफडाट झाला.
मंगेशकर कुटुंबियांनी आपल्याला राजकारण कळत नाही, अशी नेहमीच भूमिका घेतली आहे. ते राजकारणात नाहीत ही वस्तुस्थिती सुद्धा नाकारण्यात मतलब नाही. पण यांनी लता दीनानाथ मंगेशकर मोदींना देऊन जे साध्य केले, त्याला राजकारणात दुसरी तोड नाही…!! म्हणूनच पवारांची जी तगमग झाली, ती त्या नटरंग लावणी सारखी झाली. नटरंगची नटी “मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा”, म्हणत होती…!! पवारांचे चेले, “मला बोलवा ना तरी”, ही लावणी सादर करताना दिसत आहेत…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App