मेंदूचा शोध व बोध : शिकायला वयाचं बंधन नाही


मेंदू विकासाची प्रक्रिया आयुष्यभर चालू असते, थांबत नाही. म्हणूनच शिकायला वयाचं बंधन नाही. वयापरत्वे शिकण्याची गती व प्रगती मात्र व्यक्तिसापेक्ष आहे. बाळाच्या ज्ञानेंद्रिय विकासामध्ये बाळाला आधी स्पर्श आवाज, दृष्टी व गंध समजतो, चव उशिरा कळते. There is no age limit for learning

स्पर्शातून मुलं अनुभव घेत असतं, शिकतं असतं. बाळाची प्रगती जी आपल्याला दिसते त्याची प्रक्रिया मज्जा संस्थेत होत असते तिला मायलिनेशन म्हणतात. मेंदूच विकासात ह्याचा सहभाग महत्त्वाचा आहे.

मायलिनेशनमुळे मुलांमध्ये निर्णय क्षमतेचा विकास होत असतो. तुम्ही पहा साधारणतः दोन वर्षाच मुलं मी हे करणारच नाही, अमुकच करणार असे सांगायला लागतं. एक वर्षाच्या मुलामध्ये साधारण सातशे मज्जा तंतूचं जाळं तयार होतं.

बुद्ध्यांकाचे अनेक पैलू भावनिक, गणितीय, भाषीय, तार्किक, इ. क्षमता निर्माण होणं ह्या जाळ्यामुळे वा जोडणीमुळे शक्य होते. नर्व्ह सेल्समुळे नाही. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर नर्व्ह सेल्स हे हार्ड वेअर आहे तर हे जाळं, सॉफ्ट वेअर. ह्या सॉफ्ट वेअरमुळे व्यक्ती प्रगती करत असते. माणूस ज्ञानेंद्रिया व अनुभवाद्वारे शिकत असतो. मनेंद्रिय भावनिक बुध्द्यांकाचा पाया आहे.

आपण आपल्या वागणुकीतून, वर्तणुकीतून मुलांना जसे अनुभव देऊ तसे आपलं मुलं घडेल. मला राग येतो पण आवरता येत नाही, कळतं पण वळत नाही ही जी स्थिती आहे ती ह्या तंतूच्या जाळ्यात अडकली आहे. स्वभावाला औषध नाही असे म्हणून गप्प बसायचं का, नाही. हे एक प्रकारचं कौशल्य आहे आणि ते मिळवावं लागतं, अथक प्रयत्नाने व सातत्यपूर्ण सरावाने. मायलिनेशन पूर्ण झालं म्हणजे हार्ड वेअर तयार झालंय आणि अनुभव हे सॉफ्ट वेअर आहे ते अद्ययावत होत असतं.

There is no age limit for learning

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात