परिपूर्ण आहारामुळेच वाढते उंची


दोन महिन्यांत उंची वाढवा, रिझल्ट मिळाला नाही तर पैसे परत, अशा अनेक जाहिराती आपण पाहिल्या असतील. पण शरीराची उंची वाढविण्यासाठी दोन महिन्यांतील कोर्सची नाही, तर परिपूर्ण पोषणमूल्य असलेल्या आहाराची गरज आहे. इंपेरिकल कॉलेज ऑफ लंडनने केलेल्या संशोधनानुसार शालेय जीवनात अपूर्ण आहार किंवा कमी पोषणामुळे दोन देशांतील विद्यार्थ्यांमधील उंचीत वीस सेंटिमीटरचा फरक पडल्याचे समोर आले आहे. The perfect diet only increases height

193 देशांमधील 19 वर्षांखालील सहा कोटी 50 लाख विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण यामध्ये करण्यात आले आणि विद्यार्थ्यांचे योग्य पोषण किंवा त्यांच्या आहाराचा दर्जा या सर्वेक्षणात तपासण्यात आला. या सर्वेक्षणात दोन देशांमधील 19 वर्षांच्या मुलींमध्ये आठ वर्षांचा तर, मुलांमध्ये सहा वर्षांच्या वाढीचा फरक दिसला आहे. स्पष्ट सांगायचे म्हटले, तर वयाच्या 19 वर्षी बांगला देशामधील मुलीची उंची जेवढी असेल, तेवढीच उंची नेदरलॅंडमधील अकरा वर्षांच्या मुलीची आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या सर्वेक्षणात विद्यार्थ्यांना देण्यात येणारा आहार, त्याचा दर्जा, त्यात सर्व पोषणमूल्य आहेत की नाही, हे तपासण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या उंचीबरोबरच स्थूलतेचेही निरीक्षण करण्यात आले.

1985 ते 2019 एवढ्या प्रदीर्घ कालावधीतील विद्यार्थ्यांच्या माहितीच्या आधारे शालेय स्तरावरील मुलांचा अभ्यास यात करण्यात आला. मागील 35 वर्षांमध्ये काही देशांमध्ये विद्यार्थ्यांच्या आहारात योग्य पोषणमूल्य आल्याने त्यांच्या उंचीत वाढ झाल्याचे समोर आले आहे. चीनमध्ये 2019 मधील मुलांची उंची ही 1985 च्या मुलाच्या उंचीपेक्षा आठ सेंटिमीटर जास्त असल्याचे समोर येते. तसेच सरासरी उंचीच्या बाबतीत चीनची 1985 मध्ये जागतिक क्रमवारी 150 होती. 2019 मध्ये चीन 65व्या स्थानावर आला आहे. अशाच प्रकारे ज्या देशांमध्ये चौरस आहार आणि योग्य पोषणमूल्य असलेला आहार दिला गेला, त्या देशांमधील मुलांची सरासरी उंची वाढत आहे. मागील पस्तीस वर्षांपासून ब्रिटनधील मुलांची उंची सर्वांत उत्तम असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे.

The perfect diet only increases height

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात