अखंड भारताचा महामानव : बहुआयामी आंबेडकर झगडले ते उद्धारासाठी…


प्रा. संजय साळवे
(नाशिक)

स्वामी विवेकानंदानी मन, मनगट आणि मेंदू यांच्या संतुलित विकासाला शिक्षण असे म्हटले आहे. ह्याच अर्थाने शिकण्याच्या, संघर्षाच्या आणि एकजुटीच्या डॉ. बाबासाहेब आंबडेकर मंत्राला पाहिले की समाजाच्या अनेक प्रश्नाची उत्तरे सापडतील ह्यात शंका नाही. The multifaceted Ambedkar fought to save dr ambedkar

घटना समितीमध्ये डॉ. आंबेडकर ह्यांनी अखंड हिंदुस्थान आणि जातीय ऐक्याची गर्जना केल्यानंतर हिंदू समाजाने त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. एखाद्या विषयाचे खोलवर संशोधन करण्याची त्यांची वृत्ती त्यांच्या एकूण बोलण्याला आणि कृतीला आकार देणारी ठरली. म्हणूनच आंबेडकरांच्या राजकारणाला नैतिक विचारांचे फार मोठे अधिष्ठान आहे हे हे विसरून चालता येणार नाही.

वाचन, चिंतन आणि लेखन हे खरं तर बाबासाहेबांचे आयुष्य. त्याच्या आधाराने समाजाच्या भावनांना आणि विचारांना जबरदस्त धक्का देत आपल्या आंदोलनातून एका अर्थाने वर्षानुवर्षे मंथन करायला त्यांनी हिंदू समाजाला भाग पाडले. आंबेडकरांनी न्यायावर आणि समतेवर आधारलेल्या धर्माची, तत्वज्ञानाची आणि संस्कृतीची दीक्षा दिली.आंबेडकरांच्या मनात कधीही सूड किंवा द्वेष नव्हता. ते कधीही समाजात ढोंग घेवून वावरले नाही. स्वतःला समाजाच्या द्वेषाला आणि निंदेला बळी पडावे लागले म्हणून आपल्या वाणीने आणि शब्दांनी देशाच्या अखंडतेला त्यांनी कधीही धक्का लागू दिला नाही.

दगडाला एकदा शेंदूर लावला म्हणजे तो खरवडून काढणे अत्यंत कठीण असं आंबेडकर म्हणायचे. आंबेडकरांनी आपली सद्सदविवेकबुद्धीने हिंदू समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न केले प्रसंगी लढा दिला तो याचसाठी की ज्ञानाच्या आणि संस्कृतीच्या पातळीवर दुर्लक्षित समाजाचा आत्मिक विकास व्हावा नुसता भौतिक नाही. ते काही जातीयवादी होते म्हणून काही त्यांनी संघर्ष केला नाही. स्वातंत्र्यानंतर आंबेडकरांनी लोकशाही आणि घटना सोडून कुठलेही राजकरण किंवा आंदोलन केले नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कुठल्या एका समाजाचे नसून संपूर्ण राष्ट्राचे आहेत. आंबडेकरांचे मोठेपण अमूल्य आहे. ते काही वारसा हक्काने, पद किंवा कुठल्याही पैशांनी पदरात नक्की पडलेले नाही. विपरीत परिस्थितीच्या विरोधात उभे राहून मिळवलेले हे मोठेपण आहे. आपल्या ध्येयापासून कुठेही विचलित न होताआपल्या अभ्यासाने, बुद्धीने आणि समाजाचे भलं करण्याची अग्निपरीक्षा आंबेडकरांना वारंवार द्यावी लागली.

बऱ्याची, वाईटाची, सुखाची, दुःखाची, वादळाची, मानाची आणि अपमानाची पर्वा न करता आंबेडकर झगडले ते उद्धारासाठी. आंबेडकरांच्या समर्थकांचे ऐक्य, सामर्थ्य आणि कडवेपणा हे निखाऱ्यावर भाजून निघाल्यानंतर वाट्याला आलेला वारसा आहे.

आंबेडकरांचे बहुआयामी व्यक्तिमत्व कुठल्या एका समाजापुरते मर्यादित नसून देशाच्या अखंडतेला, ऐक्याला साद घालणारे आहे. प्रेमाने, आदराने समाज जोडला जाऊ शकतो ह्यात कुठलीही शंका असण्याचे कारण नाही. कुठलाही अभिनिवेश न बाळगता “मी” बाजूला ठेवून आंबेडकरांनी संपूर्ण समाजाची चिंता वाहिली आहे. समाजाचे स्थितीचे आणि समस्यांचे सिंहावलोकन करत भविष्याचा वेध घेत आणि खोलवर आत्मपरीक्षण करत आंबेडकरांनी आपला मार्ग दाखवून दिला आहे. भावनेपेक्षा वास्तवाच्या वाटेवर आंबेडकर समजून घेणे अधिक आवश्यक आहे.

(सौजन्य: फेसबुक)

The multifaceted Ambedkar fought to save dr ambedkar

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण