Shivsena – NCP : भाजप – मनसेला काटशहासाठी शिवसेना – राष्ट्रवादी युतीची चर्चा; पण राष्ट्रवादीशी आघाडी करणाऱ्या पक्षांचा इतिहास काय सांगतो??


महाराष्ट्रात महापालिका आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पुढे ढकलण्यात आले असल्या तरी सगळे राजकीय पक्ष आपापल्या पातळीवर राजकीय गणिते मांडत आहेत. मुंबईसह महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भाजप – मनसे उघड अथवा छुप्या युतीची चर्चा रंगत असताना त्या संभाव्य युतीला काटशह देण्यासाठी शिवसेना – राष्ट्रवादी युती चर्चा सुरू झाली आहे. मात्र यातून चतुराईने काँग्रेसला वगळण्याचे मनसूबे आखले जात आहेत. Shivsena – NCP: BJP-MNS discuss Shiv Sena-NCP alliance for Katshah; But what does the history of the parties leading the NCP say??

– शिवसेनेची मते मनसे कापणार

भाजपा आणि मनसे यांच्यात उघड अथवा छुपी युती झाली तर शिवसेनेची मते कापले जातात हा उघड मांडला जाणारा ठोकताळा आहे, पण शिवसेनेची मते कापताना मनसे भाजप कडे जाणारी मते ही रोखू शकेल, असा राजकीय पंडितांचा होरा आहे.

– राष्ट्रवादी प्रामाणिकपणे काम करेल??

शिवसेनेला मुंबई महापालिकेत पुन्हा सत्ता मिळवायची असेल तर राष्ट्रवादीची युती करणे काहीअंशी लाभाचे ठरू शकते, असा काही शिवसेना नेत्यांचा होरा आहे. अर्थात राष्ट्रवादीने शिवसेना उमेदवारांसाठी प्रामाणिकपणे काम करणे ही त्याची पूर्वअट असेल आणि तीच सर्वात महत्त्वाची आहे…!! अन्यथा राष्ट्रवादीबरोबर युती करणाऱ्या पक्षांचा इतिहास आणि अवस्था बघितल्यावर शिवसेना राष्ट्रवादीला कितपत उपयोगी ठरू शकेल…?? याविषयी मूलभूत शंका उपस्थित होते.

– राष्ट्रवादी शिवसेनेला पोखरेल??

आपल्याशी युती करणाऱ्या पक्षांना कमकुवत करणे, आतून पोखरणे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य राहिले आहे. अशा स्थितीत मुंबईत राष्ट्रवादीचा काहीसा लाभ जरी शिवसेनेला मिळाला तरी पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, अहमदनगर यासारख्या महापालिकांमध्ये शिवसेनेच्या अस्तित्वावरच राष्ट्रवादी घाला घालू शकते, असे आत्तापासूनच राजकीय पंडित बोलू लागले आहेत. अशा स्थितीत 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका येईपर्यंत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची युती जरी झाली तरी शिवसेनेची मूलभूत राजकीय अवस्था कितपत बळकट राहील…??, याविषयी देखील शंका व्यक्त होत आहे.



राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस बरोबर आघाडी करून त्या पक्षाला आधी आपल्या बरोबरीत आणून ठेवले आणि नंतर खाली ढकलून दिले. हा नजीकचा राजकीय इतिहास आहे. अशावेळी सध्या बरोबरीत असलेल्या शिवसेनेची अवस्था राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कशी करेल…??, हे सांगायला फार मोठ्या राजकीय पंडितांची गरज नाही…!!

– शेकाप, लानिप आणि मार्क्सवादी

रायगड, सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्ष, लाल निशाण पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हे पक्ष कधी ना कधी तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केलेले पक्ष आज महाराष्ट्रात अस्तित्वहीन आहेत. त्यांची ही अवस्था शिवसेने विषयी बरेच काही “बोलून” जाते. त्यामुळे एका निवडणुकीतला कथित लाभ शिवसेनेसाठी दीर्घकालीन तोटा ठरू शकतो, असा इशारा राजकीय पंडित तेच असतील तर त्यामागे पूर्वानुभवाचा निश्चित आधार आहे हे मान्य करावे लागेल…!! पण प्रश्न त्या पुढचा आहे… भाजपला कोणत्याही स्थितीत हरवायचे हे धोरण असलेले शिवसेनेचे सध्याचे नेतृत्व हा सल्ला ऐकेल…??

Shivsena – NCP : BJP-MNS discuss Shiv Sena-NCP alliance for Katshah; But what does the history of the parties leading the NCP say??

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात