विज्ञानाची गुपिते : चुंबकीय लहरींमुळे सौरडागांवरील प्रभामंडळ उष्ण

देशाच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-२ या अवकाश मोहिमेचे निष्कर्ष संशोधकांच्या हाती लागले असून यामध्ये सूर्याचे बाह्य आवरण आणि हेलिओफिजिक्सच्या अनुषंगाने नावीन्यपूर्ण माहिती उजेडात आली आहे. ऊर्जेच्या केंद्रापासून आपण जस जसे दूर जाऊ लागतो तसेच तापमान देखील कमी होऊ लागते पण या गृहीतकाला धक्का बसला असून सूर्यावर नेमके याच्या उलट घडून येत असल्याचे उघड झाले आहे. Secrets of Science: Magnetic waves cause the halo on the solar system to heat up

सौरडागांवरील प्रभामंडळ चुंबकीय लहरींमुळे प्रमाणापेक्षा अधिक उष्ण होत असल्याचेही स्पष्ट झाले. सौरडागांवरील शंभरहून अधिक सुक्ष्म सौरज्योतींची प्रथमच निरीक्षणे मिळविण्यात ‘इस्रो’ला यश आले आहे. मूळ ऊर्जेचा उगम आणि सूर्याशी संबंधित विविध पैलूंची आपल्याला सखोल माहिती असली तरीसुद्धा मानवी जीवनावर प्रभाव टाकू शकणाऱ्या अनेक घटना या आजही आपल्यासाठी एक मोठे रहस्य आहे. यातील बहुतांश घटना या सूर्याच्या बाह्य आणि उष्ण आवरणामध्ये घडत असतात त्याला कोरोना म्हणजेच प्रभामंडळ या नावाने ओळखले जाते, असे इस्रोकडून सांगण्यात आले. अतिनील किरणांचा उगम याच भागात होतो. चुंबकीय लहरींचे जन्मस्थान देखील हाच भाग मानला जातो.

कोरोनामध्ये मोठ्या प्रमाणावर भारित गॅसचा समावेश असतो याचे तापमान दहा लाख केल्विनपेक्षाही अधिक असते. हे सूर्यावरील दिसून येणारे पृष्ठभागाचे सर्वोच्च तापमान होय. नव्या निरीक्षणातून वेगळी माहिती हाती लागली आहे. नव्या निरीक्षणातून कोरोनाचा सर्वाधिक उष्ण असा भाग समोर आला आहे. सौर डागांवरील हा सर्वाधिक सक्रिय भाग म्हणून देखील ओळखल्या जातो. या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र अधिक प्रभावी असते. कोरोनात निर्माण होणाऱ्या उष्णतेमध्ये चुंबकीय क्षेत्राचा मोठा वाटा असतो, असे नव्या निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे. प्रभामंडळाचे तापमान वाढविण्यासाठी सुक्ष्म सौरज्योती (फ्लेअर्स) आणि आयोनाईज्ड होणारे मूलद्रव्ये कारणीभूत असल्याचे मानले जाते. कोरोनाच्या सक्रिय भागामध्ये काही विशिष्ट घटक तीन ते चारपटीने अधिक असल्याचे आढळून आले आहे. फोटोस्फेअरपेक्षा येथे या घटकांचे प्रमाण हे अधिक असते. येथे मॅग्नेशियम, ॲल्युमिनिअम आणि सिलिकॉन ही मूलद्रव्ये मोठ्या प्रमाणात असल्याचे निरीक्षणातून उघड झाले आहे.

Secrets of Science: Magnetic waves cause the halo on the solar system to heat up