राजकीय – आर्थिक भांडवलीकरण आणि निर्गुंतवणूक ; कोण? कुठे? काय? करताहेत!!??


देशात सध्या विविध राज्यांमध्ये राजकीय – आर्थिक भांडवलीकरण आणि निर्गुंतवणूक सुरू आहे. फक्त ती वेगवेगळ्या राजकीय पक्षांची वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहे. यापैकी सगळ्यात मोठी राजकीय गुंतवणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः करताना दिसत आहेत. ही राजकीय गुंतवणूक प्रामुख्याने सध्या उत्तर प्रदेशात सुरू आहे. काशी विश्वनाथ कॉरिडोरच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमापासून सुरू झालेले हे राजकीय भांडवलीकरण परवा शहाजानपूरमध्ये ६०० किलोमीटरच्या गंगा एक्सप्रेस वे च्या पायाभरणीचा निमित्ताने झाले. आज ते प्रयागराजमध्ये महिलांच्या महामेळाव्यात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महिलांच्या खात्यामध्ये इलेक्ट्रॉनिक सिस्टीम द्वारे थेट १००० कोटींची रक्कम जमा करतील. यानिमित्त हा मोठा महिला मेळावा उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने आयोजित केला आहे. Political – economic capitalization BJP, TMC, NCP and disinvestment of Shiv sena – Congress

– भाजपचे भरण – पोषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य प्रकल्प आणि सरकारी योजना यातून भाजपचे मोठे राजकीय भरण-पोषण सुरू आहे. मधल्या काळात गोव्याला 600 कोटी रुपयांची विकासकामांची भेट देऊन गोव्यातही पंतप्रधान मोदी यांनी राजकीय भांडवलीकरण करून घेतले आहे. पण सध्या तरी त्यांचे राजकीय भांडवली करण्याचे केंद्रबिंदू उत्तर प्रदेशात अधिक दिसत आहेत. यातली आर्थिक गुंतवणूक सुमारे सहा लाख कोटी रुपयांची आहे.

– तृणमूलचे राजकीय भांडवलीकरण

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे राजकीय भांडवलीकरण करत असताना सरकारी योजनांच्या माध्यमातून लाखो कोटी रुपये देत आहेत, तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तृणमूल काँग्रेसचे राजकीय भांडवलीकरण करत आहेत. यासाठी तृणमूल काँग्रेसचे परिवार मोठा करण्याची विश्वासार्हता हे त्यांचे वैयक्तिक भांडवल वापरले जात आहे. भाजपवर तोंडी तोफा डागण्यासाठीचे भाषणाचे भांडवलही त्याला उपयोगी पडत आहे आणि काँग्रेस मधून राजकीय निर्गुंतवणूक करून त्या तृणमूल काँग्रेसचे भांडवलीकरण करत आहेत. गोव्यात तर त्यांनी एरवी राष्ट्रवादी काँग्रेसचे आर्थिक भांडवलीकरण करण्यात कधीही कमी न पडणाऱ्या शरद पवार यांच्यावरही मात केली आहे. गोव्यातला राष्ट्रवादीचा एकमेव काँग्रेस आमदार फोडून त्यांनी राष्ट्रवादीची पुरती गोव्यात निर्गुंतवणूक करून तृणमूल काँग्रेस मध्ये थोडी राजकीय भांडवलाची भर घातली आहे.



– राष्ट्रवादी काँग्रेसचे आर्थिक भांडवलीकरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे आर्थिक भांडवलीकरण महाराष्ट्रात मजबुतीने सुरू आहे. शिवसेना आणि काँग्रेस यांच्यापेक्षा अनुक्रमे चौपट तसेच दुप्पट रक्कम राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार निधीच्या रुपाने आपल्या आमदारांनाच वाटली आहे. शिवसेनेला निधी वाटपात चौथ्या क्रमांकावर ढकलून शिवसेनेची सध्याच्या काळात आणि भविष्यकाळात राजकीय निर्गुंतवणूक कशी होईल याची तरतूदच निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करताना दिसत आहेत. शिवसेनेची आर्थिक रसद कमी करून त्यांची राजकीय निर्गुंतवणूक करण्याचा पुरता बंदोबस्त शरद पवारांनी केल्याचे दिसून येत आहे.

– शिवसेना – काँग्रेसची निर्गुंतवणूक

शिवसेना आणि काँग्रेस मात्र आपल्यातली निर्गुंतवणूक नेमकी कशी रोखायची त्यासाठी राजकीय आणि आर्थिक उपायोजना कशा करायचा यावर फार गांभीर्याने खल करताना दिसत नाहीत. शिवसैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. खासदार आणि आमदार उघडपणे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करत आहेत. पण मुख्यमंत्र्यांना शिवसेनेच्या या आर्थिक आणि राजकीय निर्गुंतवणूकीला तोड कशी काढायची?, हे समजेनासे झाले आहे…!!

त्यामुळे मग शिवसेनेचे नेते महाराष्ट्रातल्या शिवसेनेच्या आर्थिक आणि राजकीय निर्गुंतवणूकीवर तोडगा काढण्याऐवजी भाजपच्या कर्नाटकातल्या नेत्यांवर तोंडसुख घेताना दिसत आहेत. शिवसैनिकांना, शिवसेनेच्या आमदार-खासदारांना जे कळते ते शिवसेनेच्या नेतृत्वाला समजेनासे झाले आहे का?, हा प्रश्न पडावा एवढी गंभीर परिस्थिती शिवसेनेच्या आर्थिक आणि राजकीय निर्गुंतवणूकीतून उद्भवली आहे. येत्या महिना-दोन महिन्यांत त्याचे पडसाद आणि परिणाम शिवसेनेत उमटल्याशिवाय राहणार नाहीत, असे राजकीय निरीक्षक सांगत आहेत. काँग्रेस गळतीय. शिवसेनेतून गळती अवघड नाही…!!

– काँग्रेस तर निर्गुंतवणूक मोडवरच!!

काँग्रेस तर गेल्या काही वर्षांपासून निर्गुंतवणूक मोडवरच आहे. पक्ष नेहमी फुटतोय. गळतोय. नेते निघून गेलेत. काँग्रेस पक्षाचे राजकीय भांडवलीकरण तर केव्हाच संपले आहे. जे काही थोडे आर्थिक भांडवल उरले असेल, ते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे देशातल्या बड्या उद्योगपतींनीवर तोफा डागून स्वतःच संपुष्टात आणण्याची शक्यता आहे.

त्यामुळे देशाच्या राजकीय पटावर पंतप्रधान मोदी, ममता बॅनर्जी आणि शरद पवार हे वेगवेगळ्या प्रकारे आपल्या पक्षांचे राजकीय आणि आर्थिक भांडवलीकरण करताना दिसत आहेत, तर राहुल गांधी – प्रियंका गांधी आणि उद्धव ठाकरे हे अनुक्रमे काँग्रेस तसेच शिवसेनेची राजकीय – आर्थिक निर्गुंतवणूक नुसते बघत बसले आहेत, अशीच चिन्हे दिसत आहेत…!!

Political – economic capitalization BJP, TMC, NCP and disinvestment of Shiv sena – Congress

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात