मोठी बातमी : लस प्रमाणपत्रावरून पीएम मोदींचा फोटो काढून टाकण्याची याचिका केरळ हायकोर्टाने फेटाळली, याचिकाकर्त्याला 1 लाखाचा दंड


केरळ हायकोर्टाने मोठा निर्णय देताना ती याचिका फेटाळून लावली आहे ज्यामध्ये कोरोना लस प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवावा अशी मागणी करण्यात आली होती. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशी याचिका दाखल करण्यात आली असून त्याचा जनतेच्या हिताशी काहीही संबंध नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. Kerala HC dismisses plea seeking removal of PM Modi’s photo from vaccine certificate, fined 1 lakh on the petitioner


वृत्तसंस्था

कोची : केरळ हायकोर्टाने मोठा निर्णय देताना ती याचिका फेटाळून लावली आहे ज्यामध्ये कोरोना लस प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवावा अशी मागणी करण्यात आली होती. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशी याचिका दाखल करण्यात आली असून त्याचा जनतेच्या हिताशी काहीही संबंध नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

न्यायालयाने याचिकाकर्त्याला एक लाखाचा दंडही ठोठावला आहे. अशी याचिका दाखल करण्याची गरज नसल्याबद्दल न्यायालयाने नाराजीही व्यक्त केली. कोर्टाच्या म्हणण्यानुसार, केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा अर्ज दाखल करण्यात आला होता. पुढील ६ महिन्यांच्या आत याचिकाकर्त्याला एक लाखाचा दंड जमा करावा लागेल, असे आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.



दरम्यान, याआधीही केरळ उच्च न्यायालयाने या याचिकेवर प्रश्न उपस्थित केले होते. तेव्हाही लसीच्या प्रमाणपत्रावर देशाच्या पंतप्रधानांचा फोटो असेल तर त्यात लाज वाटायची काय बाब आहे, असे म्हटले होते. आता आज निकाल देताना न्यायालयाने ती याचिकाच फेटाळून लावली आहे. न्यायालयाचे म्हणणे आहे की, न्यायालयाकडे अनेक तातडीच्या बाबी आहेत, त्यामुळे अशा याचिकांना चालना देता येणार नाही.

दरम्यान, ही याचिका पीटर मायलीपारंबिल यांनी न्यायालयात दाखल केली होती. ते मूळचे कोट्टायम जिल्ह्यातील आहेत. त्यांनी याचिकेत म्हटले होते की, जेव्हा लोक लसीकरणासाठी पैसे देत आहेत आणि ते खासगी रुग्णालयातही या लसी घेत आहेत, तेव्हा लस प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो असणे हे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. मात्र, न्यायालयाने हे सर्व युक्तिवाद मान्य करण्यास नकार दिला आहे.

Kerala HC dismisses plea seeking removal of PM Modi’s photo from vaccine certificate, fined 1 lakh on the petitioner

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात