नेहरू इतिहासातून पुसता येणार नाहीत; पण नेहरू – गांधींनी इतिहास पुसला तर चालेल…!!


नेहरूंचा फोटो एका पोस्टरवर नसला तर त्यांचा इतिहास पुसला जातो, पण त्यांच्या निष्ठावंत इतिहासकारांनी इतिहासाची हजारो पाने पुसली तर ती चालतात. ही नुसती बौद्धिक दिवाळखोरी नाही, तर दांभिकता आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा एकतर्फी किंवा दुतर्फी नव्हे तर चौतर्फी इतिहास लिहून या दांभिकतेचा बुरखा टराटरा फाडण्याची पाडण्याची गरज आहे. Nehru historical erasing and Nehru historical writing; Hippocrates must be exposed


विनायक ढेरे

पंडित जवाहरलाल नेहरू इतिहासातून पुसता येणार नाहीत. नेहरूंच्या काही चुका असतील, पण त्यांचे योगदान देशासाठी नक्कीच आहे. नेहरूंचा द्वेष करणाऱ्यांना त्याचा जबाब घ्यावाच लागेल, अशी arguments करणारे विद्वान आता पुढे आले आहेत. आत्तापर्यंत नेहरू – गांधी परिवाराचे वंशज आणि त्यांच्याशी निष्ठा राखून असणारे शशी थरूर आणि जयराम रमेश यांच्यासारखे नेतेच नेहरूंची भलामण करण्यासाठी पुढे येत होते. पण आता सागरिका घोष आणि संजय राऊत यांच्यासारखे त्या परिवाराच्या कक्षेबाहेरील पत्रकार – लेखक देखील नेहरूंची भलामण करण्यासाठी पुढे आले आहेत.

नेहरुंचा इतिहास पुस्तक पुसता येणार नाही. नेहरूंनी निर्माण केलेली संपत्ती विकून सध्याचे सरकार मजा मारते आहे. नेहरू या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातले नायक होते. त्यांचा फोटो पोस्टर न छापून या सरकारने द्वेष केला आहे, असा युक्तिवाद संजय राऊत यांनी सामनातून केला आहे, तर सागरिका घोष यांनी नेहरूंच्या चुका असतील, त्यांच्या काही उणीवा असतील, पण त्यांचा इतिहास पुसता येणार नाही असा “घोष” केला आहे. हरकत नाही. या देशात अविष्कार स्वातंत्र्य आहे. कोणीही काहीही लिहू शकते. पण ते आणि तेच सत्य आहे, असे समजण्याचे कारण नाही.

कारण आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास “आपलेच सत्य” लादू पाहणाऱ्या लेखक – पत्रकारांच्या युक्तिवादा पलिकडचा आहे. प्रश्न एका पोस्टर वरून नेहरूंचा फोटो हटविण्याचा नाहीच आहे. एका पोस्टरवर नेहरू नसले म्हणून त्यांचे नाव पुसले जाईल, समजण्या एवढे सध्याचे सरकार दुधखुळे नाही. पण तसा समज करून देण्यात मूळात राजकीय भंपकगिरी आणि बदमाषी आहे. शिवाय नेहरूंच्या काही चुका असतील. उणीवा असतील असे नुसते लिहिणे निराळे आणि त्या चुकांचे नेमके मूल्यमापन करून त्याची जबाबदारी संबंधितांच्या पदरात टाकणे निराळे. नेहरूंच्या चुकांची किंमत खुद्द त्यांनी नव्हे, तर देशाने चुकविली आहे. किंबहुना देशाला चुकवावी लागली आहे. याचा हिशेब कोण देणार?? तो हिशेब घेण्याची गरज आहे. तो घेण्याचे सोडून किरकोळ टीका करून त्यांच्या चुकांवर पांघरूण घालायचे आणि नंतर नेहरूंच्या नेतृत्वाचे पोवाडे गायचे असला हा बौद्धिक दांभिकतेचा प्रकार आहे.



म्हणे नेहरूंचा इतिहास पुसता येणार नाही. पण नेहरूंनी इतिहास पुसला तर चालेल…!! त्यांच्याच नेतृत्वाखाली च्या सरकारने प्रोफेसर नुरूल हसन यांच्या नेतृत्वाखाली जी इतिहास संकलन – लेखन समिती नेमली होती, त्या इतिहास लेखन संकलन समितीने नेमके काय केले?? तर, देशाच्या हजारो सशस्र क्रांतिकारकांचा इतिहास पुसला. देशावर एकारलेल्या विचारसरणीचा इतिहास लादला. त्यातूनच मग “दे दी हमे आजादी बिना खड्ग बिना ढाल। साबरमती के संत तुने कर दिया कमाल।” असली भंपक गीते त्या काळातल्या विद्यार्थ्यांच्या माथी मारण्यात आली. तेव्हा नव्हता का इतिहास पुसला गेला?? तेव्हा नव्हता का हजारो सशस्त्र क्रांतिकारकांचा अपमान केला गेला?? सावरकर, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद या यांच्यासारख्या हजारो क्रांतिकारकांना पंडित नेहरूंच्या इतिहासात किती स्थान होते??

नेहरूंनी तर 1857 स्वातंत्र्य समराच्या शताब्दी महोत्सवात दिल्लीत झालेल्या सोहळ्यात सावरकरांशेजारी बसायला नकार दिला होता. हा तोच समारंभ होता, ज्यामध्ये सावरकरांच्या हस्ते भगतसिंगांच्या मातोश्रींचा आणि राजा महेंद्र प्रतापांसारख्या अनेक क्रांतिकारकांचा सत्कार करण्यात आला होता. आणि त्या समारंभाला उपस्थित राहायला नेहरूंनी नकार दिला होता.

हा इतिहास फार जुना नाही. तो नजीकच्या काळात घडाला आहे. सावरकरांची “ने मजसी ने” ही जगप्रसिद्ध कविता नुसती संगीतबद्ध केली, तर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारख्या उंचीच्या संगीतकारांना आपली आकाशवाणीची नोकरी गमवावी लागली होती. हा इतिहासही नव्या पिढीला जरा सांगितला पाहिजे ना…!!

एका पोस्टरवर नेहरूंचा फोटो नसला तर नेहरूंचे इतिहासातले नाव पुसले म्हणून थयथयाट करायचा. पण मग त्यांनी पुसलेल्या इतिहासाचे काय करायचे…?? नुसती डोळेझाक करायची?? त्यांच्या चुकांवर किरकोळ टीका करून आपण तटस्थ असल्याचे भासवून प्रत्यक्षात नेहरूंची
भलामणच करत राहायची??

ही नुसती बहुतेक दिवाळखोरीला नाही, तर बौद्धिक दांभिकता आहे. नेहरूंच्या निष्ठावंत इतिहासकारांनी देशात एक cancel culture तयार केले आणि त्या cancel culture ने सशस्त्र क्रांतिकारकांच्या द्वेष करणारी फौजच्या फौज तयार केली. त्या फौजेचा खरा इतिहास समोर आणण्याची गरज आहे. त्यांची ऐतिहासिक बदमाशी टराटरा फाडून काढण्याची गरज आहे…!! यापुढे इतिहासाच्या एकतर्फी नव्हे, दुतर्फी नव्हे, तर चौतर्फी लेखनाची खरी गरज आहे. म्हणजे लोकांच्या नजरेसमोर देशाचा खरा इतिहास उभा राहील आणि हे काम नेहरू निष्ठ इतिहासकारांच्या बौद्धिक कुवतेपलिकडचे आहे…!!

Nehru historical erasing and Nehru historical writing; Hippocrates must be exposed

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात